इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग १७

एकाच महाविद्यालयातील दोन प्रोफेसर्सची एक प्रेमकहाणी
दुसऱ्या दिवशी समीर आणि प्रिशा अनावधानाने बायोमेट्रिक अटेंडन्ससाठी थंब द्यायला सोबतच आले. दोघांच्याही नकळत हे घडले होते.दोघांच्याही मनात एकमेकांना पाहून
‘पाहुण्यांच्या गराड्यात
नजरेचा लपंडाव,
प्रेमाचा हा खरा खेळ
की उगाच खट्याळ बडेजाव?’
अशा काहीशा भावना डोकं वर काढत होत्या.

“ लेडीज फर्स्ट..”समीर तिथेच जरा मागे होत म्हणाला.

प्रिशाने हळूच मान खाली करत,त्याला प्रतिसाद देत,दिलखेचक हास्य करत मशीनमध्ये आपले थंब इम्प्रेशन दिले.समीर आपले थंब इम्प्रेशन देणार तोच वैभवी मॅडम तिथे आल्या अन् म्हणाल्या,
“ मी देखील लेडीज आहे सर!”

समीर आणि प्रिशाने चमकून मागे पाहिले. समीरने त्यांना पाहताक्षणी ओळखले आणि पुढे जाण्यास सांगितले.वैभवी मॅडमचे झाल्यावर समीरने आपली बायोमेट्रिक अटेंडन्स दिली.का कुणास ठाऊक? पण प्रिशाला मात्र ही गोष्ट जरा खटकली.

‘ मी आणि समीर असे एकत्र असताना किंवा बोलताना मध्येच ही वैभवी कुठून टपकते? हीची आपल्यावर पाळत तर नाही ना?’ हे विचार प्रिशाच्या मनात घोंघावू लागले.

“ चल प्रिशा.आपण जाऊया सोबत आपल्या डिपार्टमेंटकडे..” वैभवी मॅडम

प्रिशाला हलकेसे बाय करत समीर आपल्या डिपार्टमेंटकडे जाण्यासाठी निघाला.

तो आपल्या टेबलजवळ पोहोचला.

“ काय मग? कसे चालू आहे टर्मवर्कचे काम?” महेश सर

“ अजून सुरू झाले नाही पण वेळेत पूर्ण करेन.” समीर

“प्रिशा मॅडमच्या डिपार्टमेंटमध्ये तर तुमच्या किती चकरा होतात दिवसभर! मग अजून कसे सुरू झाले नाही तुमचे काम?”महेश सर

“ मी सांगितलं ना तुम्हाला! वेळेत पूर्ण करेन म्हणून. बाय द वे,तुमची बरी पाळत असते हो माझ्यावर.मी कुठे जातो, काय करतो हे तुम्हाला बऱ्याचदा माहित असते. ओह!एक मिनिट.तुम्हाला भाबड सरांनी यावेळी दुसरे काही काम दिले नाही वाटतं.”समीर

“ नाही.यावेळी मी फ्री बर्ड आहे.” महेश सर आनंदात म्हणाले.

“ह्ममम..काही काम दिले तरीही ते तुम्ही स्वतः न करता दुसऱ्याकडून करवून घेता अशी बऱ्याच शिक्षकांची तक्रार त्यांनी ऐकली असेल,म्हणून तुम्हाला सरांनी फ्री बर्ड केलंय तर..” समीर

“ म्हणजे? काय म्हणायचं आहे तुम्हाला?” महेश सर

“ समझने वाले को इशारा काफी हैं मेरे दोस्त| चला माझ्या लेक्चरची वेळ झाली.मी निघतो.” समीर

महेश सर समीरच्या बोलण्याचा विचार करत बसले.
‘हा ना नेहमीच माझ्या डोक्यावर तुरी ठेवून,मला खोचक बोलून असा निघून जातो.अरे सिनियोरिटी पण काहीतरी चिज असते यार! थांब,याला मी आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही पण त्यासाठी मी काय केले पाहिजे?’

एक तास होऊन गेला..

तेवढ्यात समीर आला,
“ क्या करू क्या ना करू,ये कैसी मुश्किल हाय!!”समीर

महेश सरांचा आणखीनच पारा चढला अन् ते तिथून निघून गेले.

“ आता यांना काय झालं?” समीर

महेश सर भाबड सरांकडे गेले.

केबिनला नॉक करत, “ सर..” महेश सर

“ येस,कम इन..” भाबड सर

“ सर,मला तुम्हाला एक सुचवायचे होते.” महेश सर

“ तुम्ही?अन् मला सुचवणार हा,हा,हा..”भाबड सर

“ सर?तुम्ही देखील मला हसताय?” महेश सर

“ म्हणजे? अजून कोण हसतं तुमच्यावर?” भाबड सर हसत हसत म्हणाले.

“ जाऊ द्या सर.” महेश सर तावातावानेच भाबडसरांच्या केबिन बाहेर पडले.

“ अहो सर,महेश सर..” भाबड सर आतून आवाज देत, उपहासाने हसत हसत म्हणाले.

तिकडे प्रिशा आपले लेक्चर घेऊन आली होती.तेवढ्यात वैभवी मॅडम तिच्याजवळ आल्या.

“ काय गं प्रिशा,तुझे हे काय चालले आहे?”वैभवी मॅडम

प्रिशा चपापली.

“ म्हणजे?मी नाही समजले मॅडम?” प्रिशा

“ नाही, हल्ली तू कधी इथे असतेस तर कधी तिथे.रिसर्च पेपर्स बनवणार आहेस की नाही? माहित आहे ना तुला, कंपलसरी आहेत ते! अन् त्यात माझाही एक तुलाच बनवावा लागतो.” वैभवी मॅडम


“ हो.” प्रिशा गंभीर होत म्हणाली.

“ देन बेस्ट लक डियर! बट हरी फास्ट!” वैभवी मॅडम

प्रिशा आता जाम टेन्शनमध्ये आली.वैभवी मॅडम
म्हणजे तिची सीनिअर कलिग.तिचे काम प्रिशाने करणे ठरलेलेच होते.त्यात प्रिशा प्रेमाच्या धुंदीत आहे हे वैभवी मॅडमने ओळखले होते.

‘हिला हा जो कोणी हॅण्डसम समीर आहे तो मिळतो कसा तेच मी पाहते.’ असा घातक ईर्ष्येचा विचार वैभवी मॅडमच्या डोक्यात शिजत होता.

प्रिशाचा फोन वाजला.समीर कॉलिंग असे येत होते. या मानसिक गोंधळात प्रिशाला फोन घ्यावा की नाही ते सुचले नाही.तिने सरळ फोन कट केला.हे नेमके वैभवी मॅडमने पाहिले अन् त्या मनोमन खुश झाल्या.

परंतु दुसऱ्यांवर जळणे ही फार वाईट गोष्ट असते कारण देवाकडे सगळ्यांच्या कर्माचा हिशोब असतो हे बहुतेक वैभवी मॅडम विसरल्या असाव्यात.

‘आता समीरच्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन हा नक्की काय काय डिपार्टमेंटल कामे करतो तसेच याचे लेक्चर्सचे वेळापत्रक याविषयी माहिती काढते.असेही माझी कामे तर ही प्रिशा करणार आहेच.मला भरपूर वेळ आहे यांच्या प्रेमाचा काडीमोड करायला,खरं म्हणजे यांचा अजून तयारही न झालेला लव्ह बाँड ब्रेक करायला.हा हा हा..’ वैभवी मॅडम उपहासाने हसत हसत स्वतःशीच दाचपुटपुटल्या.

वैभवी मॅडम काय करतील पुढे?काय होईल समीर आणि प्रिशाच्या लव्हस्टोरीचं?पाहूया पुढील भागात..तोपर्यंत स्टे ट्यूनड टू इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह..

भाग १७ समाप्त..

क्रमशः..

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे


🎭 Series Post

View all