Login

इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग २१

एकाच महाविद्यालयातील दोन प्रोफेसर्सची एक अलवार प्रेमकहाणी
“प्रिशा..प्रिशा..येस! फायनली तू बोललीस.मनातले ओठांवर आणलेस.हेच तर मला हवं होतं.”समीर

“ म्हणजे मी पुढाकार घ्यावा याचीच तू वाट पाहत होतास तर!” प्रिशा

“ ए , तू प्रत्येक गोष्टीत आपल्या दोघांना तोलून मापून का बघतेस? हे बघ,माझेही म्हणणे आता नीट ऐक.आपलं जे नातं आहे ना,ते प्रेमाचं आहे.तेही दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूंनी फुललेले.खरंच,माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय रिअली लव्ह यू..”समीर.

प्रिशा छान लाजली.

“हुश्श..इतक्या दिवस मला वाटलं की माझा हा सर्व एकतर्फी कारभार चालू आहे.”समीर

“ कारभार?”प्रिशा

“ म्हणजे प्यार व्यार गं..” समीर

“ किती सहज बोलतोस रे तू? “ प्रिशा.

(आपली कॉलर दोन्ही हातांनी नीट करत)“ मी असाच आहे.समजलं?”समीर

“ हम्म.. मग ती वनिता?”प्रिशा

“ प्रिशा,अजूनही तू तिथेच अडकून बसणार आहेस की पुन्हा जवळ येणार आहेस?” समीर प्रिशाच्या आणखी जवळ जात म्हणाला.

“ जा तिकडे..कोणी बघेल ना..”समीरला दूर लोटत प्रिशा म्हणाली.

“ अगं सगळे आपल्या आपल्या उद्योगात व्यस्त आहेत.कोणीही बघत नाहीये.” समीर

“हे सर्व आपल्या लग्नानंतर..समजले?”प्रिशा

“ घ्या.. आज ही प्यार का इजहार किया और मेरी प्रिशा शादी तक पोहोच गयी! तुझंही बरोबर आहे म्हणा.शादी का लायसेन्स पहले चाहिए बाद में ये सब!” समीर.

“ हा, हा,हा.. मीही तेच सांगितलं तुला.पण तुझे हेच सहज,गमतीदार बोलणे मला वेड लावते.”प्रिशा

“ए, हे ऐकून मला वेड चित्रपटातील एक डायलॉग आठवला,’ वेड तुझ्यातही आहे आणि माझ्यातही!’”समीर

प्रिशा पुन्हा हसू लागली.

“ अगं,हसतेस काय अशी? रितेशच्याच तर स्टाईलमध्ये म्हंटला मी हा डायलॉग..”समीर

“ अहो समीर कम रितेश साहेब,चला आपल्यातील याच वेडाला जरा तरतरी देऊ.तसं तर मी चहा घेऊन निघाले होते,तरीही कॉफी पिण्याची इच्छा होतेय.चल,आपण समोरच्या कॉफी शॉपमध्ये मस्त कॉफी घेऊया.”प्रिशा

“ ठीक आहे,जशी तुझी मर्जी माझी प्रिशा कम जेनेलिया!” समीर

दोघेही समोरच्या कॉफी शॉपमध्ये जायला निघाले.तेवढ्यात समोर साधारण प्रिशाच्याच वयाची एक व्यक्ती आली.

“ हॅलो,प्रिशा..”

“ तू? इथे काय करतोय?” प्रिशा

“ तू जे करायला आली होतीस तेच करायला आलो होतो.”

“ ओ मिस्टर, माईंड युवर लँग्वेज..” समीर

“तुझ्या या बॉयफ्रेंडला तू आपल्याबद्दल सांगितलेलं दिसत नाही!”

“ ॲम्म..ते ..मी..” प्रिशा

“ आता का अशी अडखळते आहेस?”

“ हॅलो,तू जो कोणी असशील त्याच्याशी मला काहीही घेणे देणे नाही.प्रिशाचा पास्ट काहीही असला तरीही आता ती माझी आहे. समजलं?”समीर

समीरचे हे बोलणे ऐकून प्रिशा सुखावली आणि त्याच्याकडे बघतच राहिली.

“वाह! आवडला मला तुमचा कॉन्फिडन्स,सॉरी म्हणजे तुमच्या लव्हस्टोरीचा क्लायमॅक्स..कुठून शोधलास ग् हा पठ्ठ्या?पण एवढं लक्षात ठेव मित्रा पिक्चर अभी बाकी हैं!”

समीर त्याच्याकडे रागाने बघत, प्रिशाचा हात हातात घेत त्या व्यक्ती समोरून जात, समोरच्या कॉफी शॉपमध्ये गेला.

ती व्यक्ती मात्र समीर आणि प्रिशाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उपहासाने हसू लागली.

प्रिशा देखील तिथे ती व्यक्ती अजूनही आहे का,हे बघू लागली.

कॉफी शॉपमध्ये आल्यावर,समीरने कॉफी आणि काही स्नॅक्स ऑर्डर केले.ऑर्डर येईपर्यंत दोघेही शांत बसले. इतका वेळ रोमँटिक मूडमध्ये असणारे समीर आणि प्रिशा,अचानक धीर गंभीर झालेले होते.

‘ अचानक समोर आलेला विराज काय करून गेला हे? समीरला आता माझ्याबद्दल ना ना संशय येणार!आता याच्या मनात माझ्याबद्दल अनेक प्रश्न आले असणार ..कसं सांगू पण मी त्याला याबद्दल?समीरचे मन खरंच मोठे आहे,कारण त्याने मला विराजसमोर छान सांभाळून घेतलं..’ प्रिशा विचार करू लागली.

तेवढ्यात कॉफीचे दोन कप त्यांच्यासमोर आले. समीर काहीही झालेले नाही या आविर्भावात
स्नॅक्स आणि कॉफी पिऊ लागला.ते पाहून
प्रिशा गांगरून गेली.ती तशीच कॉफी पिऊ लागली.काहीही खाण्याची किंवा पिण्याची इच्छा आता प्रिशाला राहिली नव्हती.कशीतरी ही कॉफी पोटात ढकलावी म्हणून ती एकदम फास्ट घोट गिळू लागली.समीर या बद्दल काहीतरी बोलेल अशी धाकधूक तिचा मनात हुरहूर करू लागली.

“ स्नॅक्स घे ना..”समीर

“ आ..नको मला..”प्रिशा

“ बरं आता संध्याकाळचे ८ वाजत आलेत.मी तूला घरी सोडतो.”
समीर

“नको,मी जाईन एकटी..”
प्रिशा

“ ऐकत जा प्रिशा.आजूबाजूचे वातावरण मुलींसाठी बिलकुल ठीक नाही, त्यात रात्री तर नाहीच नाही.म्हणून मी तुला घराच्या शेजारी कोणालाही कळणार नाही अशा जागेवर सोडवतो.”समीर

याला कसे काय आपले घर माहित?या विचाराने प्रिशा अचंबित झाली.तरीही काहीही न बोलता, तोंडाला स्कार्फ बांधत प्रिशा समीरच्या गाडीवर बसली.

‘ का आला विराज माझ्या आयुष्यात परत? हे देवा,माझे प्रेम फुलण्याआधीच त्याची नजर का लागली ?समीरने सुद्धा विराजबद्दल मला काहीही विचारले नाही.त्याच्या मनात माझ्याबद्दल असलेले प्रेम त्याला रोखत असणार ..ते काहीही असो,पण मी समीरला आता विराजबद्दल सारे काही सांगणार.. गैरसमजुतीतून उगाच काहीही फाटे नको फुटायला..’ या विचारांत असताना तिचे घर आलेसुद्धा.समीरने तिला सोडवले.

हॉलमध्ये वसुधाताई, विनयराव,हर्षु टीव्ही बघत बसलेले होते.त्यांच्याकडे न पाहता प्रिशा आत,थेट बेडरूममध्ये गेली.सगळ्यांना वेगळेच वाटले.

वसुधाताई प्रिशाच्या बेडरूममध्ये आल्या..

कोण आहे हा विराज? प्रिशाचा एक्स की आणखी कोणी?समीरला याबद्दल प्रिशा कशी सांगेल?वसुधा ताईंना याबाबत काही माहिती आहे का? आज झालेल्या प्रेमाच्या साक्षात्कारामध्ये चिंब भिजल्यावर प्रिशा आणि समीर आणखी कुठली वादळे सहन करतील?

जाणून घेण्यासाठी स्टे ट्यूनड टू,’ इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह..’

क्रमशः