इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग २२

एकाच महाविद्यालयातील दोन प्रोफेसर्सची एक अलवार प्रेमकहाणी
“ प्रिशा? अशी रूममध्ये का निघून आलीस डायरेक्ट?तुला उशीर झाला म्हणून कॉल करणार होते बाबा पण मीच म्हंटलं कधी नव्हे ती फ्रेंड्सला भेटायला गेलीय.म्हणून डिस्टर्ब नको करायला.” वसुधाताई

प्रिशा एकटक कुठेतरी बघत शांत बसलेली होती खरी पण मनात असंख्य विचारांनी तिला घेरले होते.त्यामुळे वसुधाताई आल्यात आणि काही बोलत आहेत हे तिला कळलेच नाही.

“प्रिशा, अगं कुठे हरवलीस?”वसुधाताई प्रिशाच्या समोर येत म्हणाल्या.

इतका वेळ मनात चाललेले वादळ आता
प्रिशाला पेलवेना.शेवटी तिचा अश्रूंचा बांध कोसळला आणि आईला मिठी मारत,जोरात फुंदके देत ती रडू लागली.

“ ए वेडाबाई,काय झालंय? हे बघ उगाच असं रडून मला टेन्शन देऊ नकोस.जो काही प्रॉब्लेम असेल तो आपण सॉलव्ह करूया ना..” वसुधाताई

तरीही प्रिशा आईला घट्ट पकडुन रडतच होती.

प्रिशाची समजूत काढत,तिचे डोळे पुसत,तिच्यासमोर बसून वसुधाताई म्हणाल्या,
“ बाळा,कुठल्याही गोष्टीचा त्रास करून घेणे चांगले नाही.सांग बघू काय झालयं ते?”

“ आई,आज तो विराज भेटला मला विद्यानिकेतन बागेत!”प्रिशा

“ काय?” वसुधाताई

“ हो. खरं तर मी समीरला भेटायला गेले होते पण विराज अचानक माझ्या समोर आला.” प्रिशा

“बापरे! आणि हा समीर कोण?”वसुधाताई
आता पर्यंतचा समीरचा, प्रिशा सोबतचा प्रवास तिने आईला सांगितला.

“प्रिशा,खरं तर मी मागेच ओळखलं होतं की तुझं काहीतरी सुरू आहे.हे बघ,आपण साधे लोकं आहोत.त्यामुळे असल्या लफड्यांत पडू नकोस. हे प्रेम बिम सारे थोतांड आहे हे तुला या आधी विराजने दाखवून दिले आहे.तरीही तू असे का केलेस?”वसुधाताई

“ आई पण समीरचे माझ्यावर खरंच प्रेम ..”प्रिशा

“ बास! मी तुझं काही एक ऐकणार नाही आता.त्या विराजने पैशांसाठी तुझ्यावर प्रेम केले.आपल्या जाळ्यात ओढून तुझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.तुझे नशीब बलवत्तर म्हणून तू यातून वाचलीस.कसे बसे आपण यातून सुटलो आणि तू पुन्हा हेच करत आहेस?ते काही नाही समीरचा विषय इथेच सोडून दे आणि मूव्ह ऑन कर.आम्ही तुझ्यासाठी वर संशोधन करायला सुरु करतोय आणि आम्ही ठरवलेल्या मुलाशीच तुझे लग्न होईल.” वसुधाताई

“ आई, अगं असे कसे बोलू शकते तू?” प्रिशा

“ मग कसे बोलू सांग ना? त्या विराजने एवढे सारे होऊन सुद्धा किती त्रास दिला आपल्या सर्वांना. नंतर नंतर तर तो घरी येऊन तुमच्या मुलीला पळवून नेईल अशा धमक्या देत होता.सुदैवाने माझ्या पी. एस. आय आतेभावाने प्रकरण मार्गी लावले,त्याला चांगला पोलिसी खाक्या दाखवला आणि तो या एरीयातून निघून गेला.” वसुधाताई

“ पण आज मला तो पुन्हा आपल्याच एरीयात,विद्यानिकेतन बागेत भेटला.”प्रिशा

“ काय? म्हणजे आता जोशी गुरुजींकडे जाऊनच मार्ग निघेल..” वसुधाताई

“ काय हे आई? ते गुरुजी काय करतील यात?” प्रिशा

“ प्रिशा,तू जन्मल्यापासून सुख उपभोगले की
मग त्यानंतर तीव्र दुःख भोगलेले आहेस.जोशी गुरुजींनी मला दर वेळी तुला सावरण्याचा,तुझ्या वेदना कमी करण्याचा मार्ग दाखवला,धीर दिला.म्हणून त्यांच्याकडे आता आपल्याला जावेच लागेल.माझ्या भावाला देखील मी याबद्दल कल्पना देते.”वसुधाताई

“ पण या आधी तू मला जोशी गुरुजींकडे कधीही नेलं नाही आणि याबद्दल कधीही सांगितले नाही.”प्रिशा

“ आता तू मोठी झाली आहेस.सुजाण झाली आहेस.म्हणून चार गोष्टी त्यांच्याकडून तूही समजून घे आणि तसे वाग.तेव्हाच तुझा मानसिक त्रास कमी होईल.” वसुधाताई

प्रिशाची पाठ थापटत,तिला दिलासा देत
वसुधाताई आपल्या रूममध्ये गेल्या.

प्रिशाची मनःस्थिती अशीही बरी नव्हती.तिला समुपदेशनाची तीव्र गरज होती पण त्याहीपेक्षा समीरशी याबाबत मोकळे बोलण्याची तिची खूप इच्छा होती.काय करावे? आधी गुरुजींकडे जाऊन या परिस्थितीतून मार्ग काढावा अन् मग समीरशी गुपचुप बोलावे असे तिने ठरवले.

असंख्य विचारांच्या विळख्यात तिला झोप लागून गेली.एव्हाना वसुधाताईंनी विनयरावांना सगळ्या गोष्टींची कल्पना दिली. विनयराव डोक्याला हात लावून बसले.

“ हे बघा,असे निराश होऊ नका.ज्या गोष्टी घडायच्या असतात त्या होतातच..” वसुधाताई

“ पण त्या विराजने आपल्याला धडा शिकवला तरीही हिला अक्कल आली नाही? कशी काय प्रेमात पडली त्या समीरच्या? ओह..एक मिनिट.. हा तोच तर नाही ज्याने आम्हाला एकदा चहा पाजला होता? हो तोच आहे हा समीर..” विनयराव

“ म्हणजे तुम्ही त्याला भेटले आहात याआधी?” वसुधाताई

“ अगं प्रिशाने कॉलेजमधील एक कलिग् आहे अशी ओळख मला सांगितली होती.त्यामुळे मला लक्षात आले नाही..” विनयराव

“ बरं जाऊ द्या.आता आपण आपल्या लेकीच्या भवितव्यासाठी काहीतरी उपाय शोधून काढू.मी उद्याच जोशी गुरुजींकडे जाऊन येते.ते शोधतील काहीतरी उपाय, काढतील काहीतरी मार्ग. माझा भाऊ आशूतोष देखील आपल्याला मदत करेल.तोवर तुम्ही मात्र टेन्शन घेऊ नका.प्लीज..”वसुधाताई

“ टेन्शन कसे नको घेऊ? तरणीताठी मुलगी, तिच्यामागे लागलेले विराज नावाचे ग्रहण आणि आता हा समीर.. मला तर आता काहीच सुचत नाहीये ..”विनयराव

काय होईल आता पुढे? विराज,समीर आणि प्रिशा या प्रेमाच्या चक्रव्यूहातून प्रिशा सुटेल?तिच्या वाट्याला सुख येईल की दुःख येईल? काय सांगतील जोशी गुरुजी?जाणून घेण्यासाठी स्टे ट्यूनड टू धिस क्लासिक लव्हस्टोरी..


क्रमशः

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

🎭 Series Post

View all