Login

इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग २३

दोन प्रोफेसर्सची एक प्रेमकहाणी
“ तुमच्या मुलीच्या भाग्यात लग्नानंतर सुख आहे पण तोवर जरा काळजी घ्यायला लागेल.” जोशी गुरुजी

वसुधाताईंनी चिंताक्रांत होऊन प्रिशाकडे पाहिले.ती देखील जोशी गुरुजींच्या वक्तव्याने घाबरली आणि खाली पाहू लागली.वसुधाताईंच्या डोळ्यासमोर केविलवाणी प्रिशा आणि उपहासाने हसणारे विराज आणि समीर असे चित्र दिसू लागले.आपल्या मुलीला अजून काय काय सहन करावे लागेल?काय होईल या सगळ्यांत तिचे?असे ना ना प्रकारचे वाईट,नकारात्मक विचार त्यांच्या मनात येऊ लागले.अचानक त्यांच्या डोळ्यांसमोर अंधारी आली आणि त्यांना तिथेच भोवळ आली.त्या प्रिशाच्या बाजूला धाडकन खाली पडल्या.

“ आई,आई..”प्रिशा जोरात किंचाळली आणि निपचित पडलेल्या वसुधाताईंना हलवू लागली.

जोशी गुरुजी आणि त्यांचे सहकारी देखील घाबरले.त्यांच्यापैकी एकाने प्रिशाजवळ पाणी दिले. प्रिशाने वसुधाताईंच्या डोळ्यांवर पाणी मारले.वसुधाताईंना जाग आली.

“ वसुधाताई,सत्य ऐकायची हिंमत ठेवा आणि त्यास सामोरे जा.इथे बसलेले सर्व नागरिक याबाबत सुज्ञ आहेत अशी मी आशा करतो.हलक्या काळजाचे लोक इथे येण्यास सक्त मनाई आहे.प्रिशा,आईला घरी घेऊन जा.”जोशी गुरुजी

अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या वसुधाताईंना प्रिशा डॉ.विशाल यांच्याकडे घेऊन आली.डॉ.विशाल,म्हणजे एक उमदे व्यक्तिमत्व.प्रिशा व तिच्या कुटुंबीयांचा फॅमिली डॉक्टर.बऱ्याचदा तर प्रिशाची आई तसेच वडिलांचे रेगुलर चेक अप करण्यासाठी तो घरी देखील येत असे.प्रिशा,दिसायला देखणी,गुणी, हुशार, नावाजलेल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक असल्याने विशालच्या मनात कधीचीच होती पण तिला तसे डायरेक्ट सांगण्याची त्याची हिंमत नव्हती.तो घरी आल्यावर प्रिशा असली की त्याला छान वाटायचं पण तिच्याशी त्याची जास्त जवळीक नव्हती.प्रिशाच्या मनात
एक हुशार, होतकरू फॅमिली डॉक्टर एवढीच त्याची इमेज होती.त्यामुळे दोघे बोलले तरीही आई बाबांबद्दलच बोलत असत,फार काहीही नाही.

प्रिशाने रिसेप्शनला चौकशी केली.
“डॉ.विशाल आहेत का?”

“ हो मॅडम. अपॉइंटमेंट घेतलीये का?”

“ नाही.त्यांना सांगा प्रिशा बेहरे आल्यात म्हणून.प्लीज जरा अर्जंट आहे.”प्रिशा

“ ओके.”

रिसेप्शनिस्टने विशालला कॉल केला,त्याने प्रिशाला आत येण्यासाठी परवानगी दिली.

प्रिशाने आईला काय झाले आहे हे विशालला सांगितले.

“ हम्म..थांब मी काकूंना चेक करतो.” डॉ.विशाल

“ बरं..” प्रिशा

“तसं सगळं ठीक आहे.हा केवळ एक ॲन्झायटी अटॅक होता.त्यांना दोन तीन एनरझाल पॅकेट्स लिहून देतो आणि काही गोळ्या देतो.घरी गेल्यावर काहीतरी खाल्यावर त्यांना या गोळ्या द्या.”डॉ.विशाल

“ ओके.”प्रिशा

“पण नेमकं असं काय घडलं? ज्यामुळे काकूंना असे झाले?”डॉ.विशाल

“ अ.. हर्षुला कमी मार्क्स पडले,त्याचे तिने टेन्शन घेतले त्यामुळे तिला असा त्रास झाला. बाकी काही नाही पण नक्की घाबरण्यासारखे काहीही नाही ना?” प्रिशा

“ काकू असं टेन्शन घेत जाऊ नका.ओह! तुम्हाला प्रिशाच्या लग्नाचे देखील टेन्शन आहे का?”डॉ.विशाल

आता मात्र वसुधाताई आणि प्रिशा एकमेकींकडे बघून आणखी गंभीर झाल्या.

“ डोन्ट वरी! मी आहे ना!”डॉ.विशाल

वसुधाताई आणि प्रिशाने डॉ.विशालकडे चमकून पाहिले.प्रिशा तर जास्तच गोंधळात पडली.

“ नाही,नाही..सॉरी म्हणजे मी एखादा नवरदेव सुचवेन किंवा शोधेन प्रिशासाठी!”डॉ.विशाल

वसुधाताई लाजरी प्रिशा आणि डॉ.विशाल यांचे लग्न मनात मांडे खाल्यागत कल्पनेत लावून मोकळ्या देखील झाल्या.त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे वलय निर्माण झाले.

“ आई, अगं एकाएकी अशी काय स्मितहास्य देऊ लागलीस गालातल्या गालात?”प्रिशा

“काही नाही.तुम्ही काय म्हणत होतात डॉक्टर? आमच्या प्रिशासाठी नवरदेव नक्की शोधा बरं,अगदी तुमच्या सारखा!”वसुधाताई

डॉ.विशाल तर खूप सुखावले.त्यांनी एक अलगद प्रेमळ कटाक्ष प्रिशाकडे टाकला पण तिचे त्यांच्याकडे मुळीच लक्ष नव्हते.डॉ.विशाल जरासे हिरमुसले.

परिस्थिती सावरत प्रिशा म्हणाली,

“ आई, चल आता आपल्याला निघायला हवं!”

“ हो हो..येते हं डॉक्टर..” वसुधाताई

“थँक्यू डॉक्टर..” प्रिशा

वसुधाताईंना घेऊन प्रिशा घरी आली.तिने त्यांना छान
आल्याचा चहा केला आणि सोबत ग्लुकोज बिस्किट्स खायला दिले.त्यांचे सारे काही झाल्यावर प्रिशा म्हणाली,

“ आई,काय गरज होती तुला डॉ विशाल यांना असे बोलायची?”प्रिशा

“ काय करू मग सांग ना?ऐकलं नाहीस गुरुजी काय म्हणाले ते?”वसुधाताई


“ ऐकलं आई मी सर्व.अन् पुढे जोशी गुरुजी काय सांगणार या आधीच तुला काय झाले होते मग ?”प्रिशा

“ते सोड. ऐक..तो समीर जाऊदे अन् तो विराज देखील जाऊ दे.मला तर वाटतं हे डॉ विशाल छान आहेत तुझ्यासाठी.आपल्याच समाजाचे आहेत ते!”वसुधाताई

“ तुला कसे काय माहित?”प्रिशा

“मी मागे एकदा विचारलं होतं त्यांना!”वसुधाताई

“ आई,सध्या हे विचार तुझ्या डोक्यातून काढून टाक बघू.आता तुला आरामाची गरज आहे.झोप निवांत..” प्रिशा

प्रिशाने आईला बेड तयार करून तिथे झोपवलं आणि ती आपल्या बेडरूममध्ये आली.ती आपल्या आरशात बघून स्वतःशी पुटपुटू लागली.

‘ आज कॉलेजला सुट्टी घेतली ते एक बरंच झालं.माझ्या मनात आता ना भावनांचे इतके कंगोरे तयार झाले आहेत ना की हा गुंता मला सुटता सुटत नाहीये.एकीकडे मी ज्याच्यावर खरं प्रेम करते तो समीर,दुसरीकडे तो गुंड विराज आणि आता हे नवीन आईने सुचवलेले डॉक्टर..काय होणार आहे माझं? हा तिढा सुटून माझं लग्न कधी होईल समीरशी?’

असे अनेक यक्षप्रश्न प्रिशाला सतावू लागले.

आता काय होईल पुढे? प्रिशाचे लग्न कधी होईल?कोण असेल तिचा जोडीदार? समीर यातून तिला काही मार्ग सुचवेल?जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..

क्रमशः