इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग २५

एकाच महाविद्यालयातील दोन प्रोफेसर्सची एक प्रेमकहाणी

वैभवी मॅडमने आज पहिल्यांदाच प्रिशाचा रुद्रावतार पाहिला अन् त्या अस्वस्थ झाल्या.त्या प्रचंड घाबरलेल्या होत्या.

‘असंही कळीच्या नारदाजवळ जास्त काही बोलून किंवा आपली एनर्जी वाया घालवून काय उपयोग?’, असा विचार करून प्रिशा आता शांत झाली.तिने वैभवी मॅडम आणि तिच्या टेबलमध्ये असणारा पडदा झटक्याने,फणकाऱ्यातच ओढून घेतला अन् आपल्या टेबलवर जाऊन बसली. आपल्या मनात इतके दिवस असलेली खदखद व्यक्त झाल्याने तिला एकदम हलकं हलकं वाटत होतं.

या सगळ्या स्ट्रेसमध्ये तिला डोकेदुखी सतावू लागली. ताजेतवाने वाटण्यासाठी तिने कॅन्टीनमध्ये फोन लावला आणि एक चहा मागवला.थोड्या वेळातच कॅन्टीन मधील एक मदतनीस चहा घेऊन आला.आज बऱ्याच दिवसांनी तिला तिचे फेवरेट बिस्किट्स खावे वाटले.
काही अर्जन्सी असेल, वेळ मिळाला नसेल तर भूक भागवण्यासाठी, तिच्या बॅगमध्ये अगदी शाळेत असल्यापासून एक बिस्कीटपुडा आई टाकत असे. तिने तिची पर्स चाचपडली.बॅगमध्ये ते बिस्किट्स पाहून तिला आनंद झाला.

त्या बिस्किटांसोबत एक ग्रीटिंग कार्ड देखील तिच्या हाताला लागले.ते समीरने तिला दिलेले होते.त्या दिवशी विद्यानिकेतन बागेमधून कॉफी शॉपमध्ये विराजशी दोन दोन शब्द झाल्यावर ,प्रिशाचा मुड ऑफ असताना समीरने तिच्यासमोर ते ठेवले होते,अन् तिने ते न बघताच आपल्या बॅगेत घातले होते हे तिला अचानक आठवले.तिने ते वर काढले.ग्रीटिंग कम लव्हलेटर होते ते..

‘हा समीर माझ्या आयुष्यात आला आणि मी त्याच्या प्रेमाचा वर्षावात चांगलीच वाहवत गेले.’प्रिशा मनोमन बोलली. अशावेळी चहा आणि आवडीचे बिस्किट्ससुद्धा तिला ताजेतवाने करण्यास अयशस्वी ठरले.तिने ते तसेच घशात ढकलले.

आज तिचे एकच प्रॅक्टिकल होते.कसेबसे उरकून ती पुन्हा आपल्या विषयाच्या नोट्स काढण्यात बिझी झाली.

थोड्या वेळातच कॉलेज सुटले आणि ती बाबांसोबत घरी आली.जेवणाच्या टेबलवर ती आज गप्प-गप्पच होती.एव्हाना विनयराव आणि वसुधाताई देखील तिची परिस्थिती समजत असल्याने गप्पच होते.

तेवढ्यात हर्षु मध्येच बोलला,
“ इतना सन्नाटा क्यों हैं भाई?”

“ ए चुपचाप तुझं तुझं जेवण कर.आवर लवकर..” प्रिशा रागातच म्हणाली.

“ हो ग ताई चील.. किती तो राग नाकाच्या शेंड्यावर? ज्यादा काम केलंस की कोणाशी ब्रेक्अप झालं तुझं?”हर्षु

तेवढ्यात प्रिशाने हर्षुच्या अंगावर हात उगारला आणि जोरात किंचाळत म्हणाली,
“हर्षु..”

वसुधाताईंनी प्रिशाला सावरत खाली बसवले.प्रिशा प्रचंड चिडलेली असल्याने भरल्या ताटावरून उठून थेट बेडरूममध्ये गेली.

आपल्या मुलीची अशी अवस्था कुठल्याही आई - वडीलांना कधीच पाहवत नाही. तरीही तिला स्वतःला सावरायला वेळ मिळावा म्हणून विनयराव आणि वसुधाताई शांतच राहिले.हर्षु,एक बिनधास्त, भोळा मुलगा असल्याने तो मात्र या साऱ्या गोष्टींपासून दूर,त्याच्या त्याच्या छोट्या जगात मदमस्त होता.त्यामुळे ताईने हात उगारल्याचे त्याला थोडे वाईट वाटले,पण नंतर तो हे सारे विसरून गेला आणि आपल्या बेडरूममध्ये जाऊन झोपला.

प्रिशाला काय करावे ते सुचत नव्हते.’आपण एवढे चिडक्या स्वभावाचे कधीच नव्हतो.खरंच काय झालं आहे आपलं,आपल्या व्यक्तिमत्त्वाचं?’मनोमन निराश होत प्रिशा गहन विचारांत गुंतली.

“ खरं सांग, जसं तू आज म्हणालीस तसं तू समीरच्या प्रेमात वाहवत गेलीस की खरंच प्रेम आहे तुझं त्याच्यावर?” कोणीतरी असे बोलल्याचा तिला भास झाला.

तिने मागे वळून पाहिले. तिच्या कपाटाच्या आरशात तिचेच प्रतिबिंब, दर्पण तिला हा खडा सवाल विचारत होते.क्षणभर तर ती खूप घाबरली.तिने पुन्हा त्या आरशात स्वतःला पाहिले.

“ घाबरु नकोस प्रिशा,मी तुझे मनातील अस्तित्व आहे,तुझेच प्रतिबिंब आहे..” प्रिशाचे दर्पण

प्रिशा अचंबित होऊन बघू लागली.

“ तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस..”प्रिशाचे दर्पण

“ हो,हो आहे माझे प्रेम समीरवर.बाकी कोणावरही नाही..ना त्या विराजवर नाही त्या विशालवर..मला समजत नाही की हा इतका सरळ सोपा निर्णय मला इतका त्रास का देतोय?” प्रिशा

“ अगं वेडाबाई,सगळ्या गोष्टी स्पष्ट बोलून सॉर्ट करता येतात.एकदा तू समीरशी याबद्दल सगळं बोलून तर बघ.. कदाचित् यातून तुला काही मार्ग सापडेल..”
प्रिशाचे दर्पण

“ असं होऊ शकतं?बरं झालंच तर त्याला विराज आणि विशालबद्दल ना ना शंका येतील?त्या दोघांचे आणि माझे काहीतरी सुरू होते,असे त्याला वाटले तर?” प्रिशा

“ मग हेच तर तू त्याला स्पष्ट सांग ना,की माझे तुझ्यावर आणि फक्त तुझ्यावरच प्रेम आहे म्हणून..”प्रिशाचे दर्पण

“ हो पण जोशी गुरुजींनी सांगितले तसे त्याला किंवा मला आमच्या लग्नाआधी त्रास होणारच! म्हणजे ना,मी स्वतः कितीही त्रास झेलू शकते पण समीर मात्र यात किंचितही भरडला जाऊ नये,असे मला वाटते.” प्रिशा

“ ते सगळं खरं आहे पण प्रारब्धसुद्धा काहीतरी भोगल्याशिवाय समाधान,आनंद देत नसतो,कारण काहीतरी मिळवायचे असेल तर त्यासाठी संघर्ष करावाच लागतो.समजलं?”प्रिशाचे दर्पण

प्रिशाला,आपल्या अंतर्मनाचे मत पटेल?समीरला सगळं खरं खरं सांगितल्यावर काय असेल त्याचा निर्णय?पाहूया पुढील भागात..स्टे ट्यूनड..

क्रमशः

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे


,

🎭 Series Post

View all