मागील भागात आपण पाहिले की प्रिन्सिपल सरांनी डायरेक्ट रिझाइन लेटर हातात दिल्याने प्रिशा खूप व्यथित होते आणि सरळ घरी जाते.हे शहर सोडून आई तिला मावशीकडे जा म्हणून सांगते.आता पाहूया पुढे..
रडत रडतच प्रिशा आपल्या खोलीत गेली.
‘आईने सांगितलेला हा पर्याय माझ्यासाठी पळवाट
तर ठरणार नाही?खरंच मी जायला हवे का मावशीकडे?मग समीर?’
‘आईने सांगितलेला हा पर्याय माझ्यासाठी पळवाट
तर ठरणार नाही?खरंच मी जायला हवे का मावशीकडे?मग समीर?’
प्रिशाच्या मनातील विचार तिला अजिबात स्वस्थ बसू देत नव्हते.प्रिशाचा राजीनामा,कुठलीही शहानिशा न करता आज ज्या पद्धतीने प्रिन्सिपल सरांनी तिच्या हातात राजीनामा दिला ते खरंच खूप वेदनादायी होते. वैभवी आणि महेश सर यांनी जे केले ते तर वाईट होतेच पण अशा लोकांना देवानेही साथ द्यावी याचा प्रिशाला खूप राग येत होता.
अचानक तिला राग अनावर झाला.ती उठली.समोर टेबलावर असलेली सगळी मेडल्स तिने हवेत भिरकावली. सगळी पुस्तके अस्ताव्यस्त केली.तेवढ्यात तिचे लक्ष तिला मिळालेल्या बेस्ट टीचर ट्रॉफीकडे गेले.ती त्या ट्रॉफीजवळ आली.ती ट्रॉफी उचलून खाली फेकणार तोच कोणीतरी म्हणाले,
“ थांब..हे योग्य नाही.”
तिने मागे वळून पाहिले.
“हर्षु, एवढा मोठा झालास का तू मला रोखायला? योग्य,अयोग्य सांगायला?”प्रिशा
“हर्षु, एवढा मोठा झालास का तू मला रोखायला? योग्य,अयोग्य सांगायला?”प्रिशा
“ सॉरी ताई.मी तुझ्या एवढा मोठा नाही.वयाने नाही आणि कर्तुत्वाने तर नाहीच नाही पण ताई हे जे सगळं तू करते आहेस ते खूप चुकीचे आहे.”हर्षु
“तुझी बडबड ऐकायला मला वेळ नाही.जा इथून.”प्रिशा
"ताई अशी रागावू नकोस ना.."हर्षु
हर्षु प्रिशाजवळ गेला.तिचा हात हातात घेऊन तिला त्याने मायेने गोंजरले.तिच्यापेक्षा लहान असूनही भाऊ असल्याचे कर्तव्य करत तो पुढे म्हणाला,
" ताई,मी सगळं बघतोय तू,आई आणि बाबा कशातून जात आहात ते..फक्त मी त्याबद्दल उघड न बोलता सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न करतोय आणि वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करतोय.हे बघ ताई, रागराग करून काहीही होणार नाही,त्यामुळे तुलाच जास्त त्रास होईल.त्यापेक्षा आईने सांगितले तसे तू थोडा दिवस ब्रेक घे कामातून..तुला सांगू? आमचे सर नेहमी म्हणतात जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.त्यामुळे झालेल्या गोष्टींवर विचार करत कुढत बसण्यापेक्षा मनाला थोडे दिवस रिलॅक्स होऊ दे.मी तुझ्यापेक्षा लहान असलो तरीही माझे फक्त एवढेच ऐक. बास.. तुला तिथून आल्यावर जो निर्णय घ्यायचा तो घे.हवं तर मी आई बाबांना त्यावेळी पटवेल कसाही..पण आता तू कसलंही टेन्शन घ्यायचं नाही."

आपला भाऊ आज पहिल्यांदा एवढे समजूतदारपणे बोलत असलेले पाहून तिला खूप बरे वाटले.आई बाबांसोबत आता हर्षु देखील आपला आधार आहे हे तिला समजले.बाबांनंतर भाऊ किती हक्काचा असतो हे तिला आज पटले.
" बरं,हर्षु.चालेल."प्रिशाचा राग आता गळून पडला होता.
" प्रॉमिस?"हर्षु
" प्रॉमिस!"प्रिशा डोळ्यांतील अश्रू पुसत म्हणाली.
तिने हर्षुला पुन्हा जवळ घेतले आणि म्हणाली,
" तू जा आता.अभ्यासाला बस."प्रिशा
" तू जा आता.अभ्यासाला बस."प्रिशा
" ओके,ताई.."हर्षु
तो तिथून निघून गेला.
तो तिथून निघून गेला.
प्रिशा स्वमग्न होत विचारांत हरवली..
'आपल्याला ब्रेक हवा आहेच.समीरला भेटून मनातलं सगळं सांगावं का?त्या दिवशी विद्यानिकेतन बागेत जे घडलं ते सुद्धा मी त्याला सगळं सांगावं का? हो सांगायलाच हवं.उद्या जर मी खरंच मुंबईला गेले तर? माझ्या मनातील ही घालमेल तरी दूर होईल.खरं तर माझं समीरवर खूप प्रेम आहे आणि मला माहित आहे त्याचेही माझ्यावर खूप प्रेम आहे.बागेतील घटनेबद्दल किती काकुळतीला येऊन त्याला सगळं समजून घ्यायचं होतं..पण मीच त्याला त्या दिवशी टाळलं. बास आता! ही गुंतागुत कुठेतरी सोडवायला हवी.तरीही मी समीरला सोडून मुंबईला कशी जाऊ शकेन?'

तिने मोबाईल हातात घेतला.समीरला फोन लावला.रिंग जात असूनही तो फोन उचलत नव्हता.असे दोन - तीन वेळा झाले.लेक्चर घेत असेल म्हणून फोन उचलत नसेल असे प्रिशाला वाटले.तिने थोड्या वेळाने फोन करायचे ठरवले.
तेवढ्यात वसुधाताईंनी आवाज दिला,
"प्रिशा, ए प्रिशा.."
तेवढ्यात वसुधाताईंनी आवाज दिला,
"प्रिशा, ए प्रिशा.."
" आले ,आले.."
प्रिशा बाहेर आली.
प्रिशा बाहेर आली.
" हे घे नैवेद्याचे ताट.आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार.तुझ्याकडुन दुसरे काही नाही,नैवेद्य जरी दाखवणे झाले तरीही चालेल.देवीला तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा सांग.तुझे गाऱ्हाणे देवीपुढे मांड.यापुढील आयुष्य छान जाऊ दे असे सांग."
वसुधाताईंनी सांगितल्याप्रमाणे तिने नैवेद्य ठेवायच्या आधी पाण्याचे स्वस्तिक काढले.त्यावर नैवेद्याचे ताट ठेवले आणि त्याभोवती पाणी फिरवले.
'नैवेद्यम् स्वाहा!' असे म्हणत देवीला आर्जव केले.आपल्या मनातील सर्व भावनांना देवीपुढे मोकळे केले.समीरशी भेट होऊ देण्यासाठी काहीतरी कर असे म्हणत तिने देवी मातेपुढे दंडवत घातला.
'नैवेद्यम् स्वाहा!' असे म्हणत देवीला आर्जव केले.आपल्या मनातील सर्व भावनांना देवीपुढे मोकळे केले.समीरशी भेट होऊ देण्यासाठी काहीतरी कर असे म्हणत तिने देवी मातेपुढे दंडवत घातला.
ती उठली आणि आईकडे गेली.वसुधाताईंनी तिला प्रेमाने वाढले.खरं तर मनःस्थिती बरी नसल्याने तिला काहीही खावेसे वाटत नव्हते; तरीही वसुधाताईंनी तिला आपल्या हातांनी घास भरवत जेवू घातले.
ती आपल्या रूममध्ये गेली.पुन्हा एकदा समीरला फोन लावला.यावेळी मात्र रिंग गेली आणि समोरून आवाज आला,
" हॅलो.."
" हॅलो.."
" हॅलो समीर.."प्रिशा
" सॉरी मॅडम.मी रमेश.हा फोन असणारा जो मुलगा आहे त्याचा अपघात झाला आहे.समर्थ इंजिनिअरिंग कॉलेज समोरच त्यांचा अपघात दुपारी १.३० वाजता झाला."
" काय?कसा आहे तो? बरा आहे का? कुठे आहे तो?"
प्रिशा प्रचंड हादरली.
प्रिशा प्रचंड हादरली.
"मॅडम,तुम्ही पँनिक होऊ नका.अपघात जरा भीषण होता पण त्याला हॉस्पिटलमध्ये आणले आहे."
" तुम्ही आधी त्याच्या घरी कळवले का?"प्रिशा
" नाही कळवू शकलो मी.त्यांनी पासवर्ड लाऊन स्क्रीन लॉक केलेले होते.नशीब तुमचा फोन आला आणि मी तुम्हाला सारे कळवले.तुम्ही प्लीज टेन्शन न घेता त्यांच्या घरी सांगाल का?"
" हो सांगते.तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे त्याला?"प्रिशा
" सुराणा हॉस्पिटल."
" ठीक आहे.आलेच मी."प्रिशा
" मॅडम,तो सारखा आई,आई म्हणून विव्हळत होता.त्यामुळे आईला देखील आणा त्याच्या."
" हो."प्रिशा
त्या माणसाने फोन ठेवला.
'कसे हाताळायचे हे ?काय ठरवले होते आणि काय झाले?समीरच्या घरच्यांना कसे सांगू मी? काहीही गंभीर झाले नसेल ना त्याला?'
अशा अनेक विचारांनी प्रिशा पुन्हा व्यथित झाली.
अशा अनेक विचारांनी प्रिशा पुन्हा व्यथित झाली.
आता काय होईल? प्रिशाला समीर मिळेल? त्यांचे समज गैरसमज दूर होतील?त्यांची भेट होईल की आणखी काही वाढून ठेवले आहे नियतीने त्यांच्या नशिबात?
पाहूया पुढील भागात..
तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
(वाचकांनो, काही वैयक्तिक कारणांमुळे भाग उशिरा पोस्ट केला त्याबद्दल क्षमस्व.इथून पुढे नियमित पोस्ट करण्याचा प्रयत्न करते..तुमच्या या कथेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद..असेच प्रेम करत रहा या कथेवर..)
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे.