Login

इम्परफेक्टली परफेक्ट बाँड ऑफ लव्ह - भाग ३४

दोन प्रोफेसर्सची एक संघर्षमय प्रेम कहानी..

मागील भागात आपण पाहिले की समीर आणि प्रिशा एकमेकांपासून दूर जाऊनही नियती त्यांना पुन्हा एकदा एका कॉलेजच्या इंटरव्यूनिमित्त एकत्र आणते. आता पाहूया पुढे..

समीर आणि प्रिशा आत गेले. कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणाले,
“यू बोथ आर सिलेक्टेड. वेलकम टू अवर कॉलेज.."

दोघं नि:शब्द उभे राहिले. नशिबाने पुन्हा त्यांना एका छताखाली आणलं होतं पण या वेळी त्यांच्या मधे फक्त आठवणी नव्हत्या, एक धोका आणि विराजचा अनोळखी कट होता जो अजून संपलेला नव्हता.

त्या कॉलेजच्या भिंतींमध्ये पुन्हा सुरू होणार होती,
प्रेम,रहस्य आणि बदला यांची नवी कथा..

काही दिवस गेले.कॉलेजमध्ये नव्या सेमिस्टरची लगबग सुरू झाली होती.प्रिशा इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटमध्ये नव्या विद्यार्थ्यांना शिकवत होती, तर समीर केमिकल इंजिनीअरिंगच्या लॅबमध्ये मग्न होता.दोनही विभाग वेगळे असले तरी नियती त्यांना वारंवार समोर आणत होती,
कधी स्टाफ रूममध्ये, कधी कॉरिडॉरमध्ये, तर कधी त्या जुन्या कॉलेज कॅन्टीनमध्ये.

एका संध्याकाळी प्रिशा घरी आली.वसुधाताई थोड्या आजारी वाटत होत्या.
“आई, उद्या आपल्या फॅमिली डॉक्टरला बोलवू या का?” तिने विचारलं.

“हो, विशालला फोन लावते. खूप दिवस झाले भेट घेतली नाही त्यांची.. रूटीन चेक अप होऊन जाईल.”

एके दिवशी दुपारी वातावरण अगदी शांत होते.
वसुधाताईंनी रूटीन चेकअपसाठी डॉक्टर विशालला फोन केला.

“डॉ विशाल..आम्ही प्रिशाच्या मावशीकडेच आहोत सध्या, मुंबईला.तुमचा इकडे चक्कर होणार होता ना आज.. त्यामुळे घरी या माझ्या तपासणीसाठी..",त्या म्हणाल्या.

“हो, मी धावती भेट देतो." विशाल हसत म्हणाला.

अपेक्षेपेक्षा कमी वेळात तो आला, पण वसुधाताई बाहेर मार्केटला गेलेल्या होत्या.

घरात फक्त प्रिशा होती.दरवाज्याची बेल वाजली.

“डॉक्टर विशाल?” प्रिशाने थोडं स्मित करत विचारले.

“हो.तुझ्या आईने रूटीन चेकअपसाठी बोलावलं होतं.आई कुठे आहेत?”

“थोड्या वेळात येईल ती. बस ना. तुला काही हवंय? चहा, कॉफी?"

" नाही.तू बस ना..तुझे काम चालू दे.."

प्रिशा विद्यार्थ्यांचे सराव पेपर्स चेक करत बसली होती.

क्षणभर सगळं सामान्य वाटत होतं, पण हळूहळू विशालच्या वागण्यात बदल जाणवायला लागला.त्याच्या नजरेत काहीतरी अस्वस्थ, असामान्य वाटायला लागलं.

अचानक डॉ विशाल तिच्या अगदी जवळ आला.प्रिशाच्या मनात भीतीची पहिली शिरशिरी उठली.
ती मागे सरकली. “डॉक्टर, तुम्ही ठीक आहात ना?”

उत्तराऐवजी विशालचा आवाज थंड पडला.
“तू माझ्याशी बोलणं टाळतेस, पण मला सगळं माहीत आहे प्रिशा. तुझ्याभोवती घडणाऱ्या सगळ्या गोष्टींचं कारण तूच आहेस. सोड ना हे सगळं..मी आहे ना तुझ्यासाठी.."

काही क्षणांनी प्रिशाला जाणवलं, त्याच्या बोलण्यात काहीतरी गडबड आहे.त्याच्या नजरेत तिला आता वासना दिसत होती.

“विशाल, तू ठीक आहेस ना? प्लीज लांब हो.” ती पुन्हा म्हणाली.

“हो,पण तू ठीक नाहीस प्रिशा,” त्याने मंद आवाजात म्हटलं, “तुझ्याभोवती घडणारं सगळं काही फक्त अपघात नाही.”

प्रिशा थबकली. ती अजून दूर होत म्हणाली,
“काय म्हणायचं आहे तुला?”

विशालच्या डोळ्यांत एक क्षण गूढ झळाळी आली.
“विराजला ओळखतेस ना तू?”

प्रिशाच्या अंगावर शहारा आला.
तो पुढे म्हणाला, “कधी कधी प्लॅन बी साठी डॉक्टरच पुरेसा असतो.”

प्रिशा स्तब्ध झाली.विशालने तिच्या अंगावर झडप घेतली. प्रिशाने जोरदार प्रतिकार करत त्याला दूर लोटले.

तो पुन्हा तिच्या जवळ येऊ लागला. प्रिशा जीवाच्या आकांताने म्हणू लागली,
" हे बघ विशाल,तू एक डॉक्टर आहेस.तू माझ्यासोबत असे करू शकत नाहीस."

विशाल एखाद्या सायको सारखा म्हणाला,
" तूच कारणीभूत आहेस माझ्या अशा वागण्याला.तुझी आई देखील मला जावई म्हणून पसंत करते.तू का त्या समीरच्या मागे पळते आहे? माझ्यात काय कमी आहे?"

विशाल अजूनही तिच्या जवळ येत वासनांध नजरेने तिचे शरीर न्याहाळू लागला.

" लांब हो म्हटलं ना तुला.."

" आजवर तुला मी किती चान्स दिले पण नाही..तू केवळ त्या समीरची माळ जपत आलीस आणि अजूनही तेच करते आहेस.तू एक तर माझीच होशील नाही तर कोणाचीच नाही.विराज सुद्धा गेला तिकडे उडत.."

त्याने तिला आतल्या खोलीत उचलून नेले.एक किंकाळी, फुटलेली वस्तू, आणि शांततेचा काळोख.

त्याने तिच्या तोंडात कागद कोंबला.तो तिला ओरबाडत राहिला.त्याच्या पाशवी अत्याचारासमोर तिचा प्रतिकार फिका पडला आणि काही क्षणांत होत्याचे नव्हते झाले.

दोन दिवसांनी..

वसुधाताईंच्या हातात पोलिस रिपोर्ट आला.
प्रिशा हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आली, तिच्या डोळ्यांत भीती आणि तुटलेपण होतं.

“आई...” असा शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडला. वसुधा ताई तिच्या जवळ आल्या.

त्या दिवसानंतर तिचं आयुष्य पुन्हा एकदा उद्ध्वस्त झालेलं होतं पण या वेळेला ती गप्प बसणार नव्हती. तिच्या आत आता एक नवी ताकद जन्म घेते, न्याय मिळवण्याची.

“या वेळेस मी पळणार नाही, आई. जे काही घडलं त्याचा शेवट मीच करणार,” ती निर्धाराने म्हणाली.

“डॉ. विशाल” आणि “विराजचा प्लॅन बी” यांचं गूढ एकत्र उकलण्यात प्रिशा यशस्वी होईल? आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरुद्ध प्रिशा काय पाऊल उचलेल? या संपूर्ण घटनेचा समीरवर काय परिणाम होईल? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे

(वाचकहो एखाद्या मनुष्याच्या आयुष्यात संकटांची मांदियाळी एक झालं की एक सुरूच असते कारण ती व्यक्ती या सर्व संकटांना पुरून उरणार असते. बिचाऱ्या प्रिशा सोबत असे घडले यावर तुमचे काय मत आहे? धक्का बसला ना तुम्हाला?)


0

🎭 Series Post

View all