मागील भागात आपण पाहिलं की डॉक्टर विशालच्या भयानक कृत्याने प्रिशाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं पण या वेळेस ती गप्प बसली नाही, ती लढायचं ठरवते. आता पाहूया पुढे..
हॉस्पिटलमध्ये प्रिशाच्या खोलीत मंद प्रकाश होता. मॉनिटरवर प्रिशाच्या श्वासांची नाजूक रेघ अधूनमधून हलत होती. त्यातला टीक टीक आवाज सतत चालू होता त्यामुळे सभोवताली वेगळाच तणाव निर्माण झालेला होता.
तिच्या बाजूला बसलेल्या वसुधाताईंच्या डोळ्यांत अजूनही न थांबलेलं अश्रुरूपी दुःख होतं. त्याच वेळी दरवाज्याजवळ पावलांची चाहूल ऐकू आली.
तो समीर होता.दरवाज्यात उभा असलेला तो, चेहऱ्यावर राग, वेदना आणि अश्रूंनी मिसळलेला निर्धार लीलया पेलत होता.
“प्रिशा…” तो हळू आवाजात म्हणाला.
प्रिशा घाबरली, तिने डोळे मिटले. ती अजूनही त्या भयानक घटनेच्या सावलीतून बाहेर आलेली नव्हती.तिने समीरचा आवाज ओळखला पण तरीही उदासीनतेमुळे ती नाखुश होती, दुःखी होती.
“तू, का आलास?” ती थरथरत्या आवाजात म्हणाली.
“कारण तू एकटी नाहीस प्रिशा,” समीरने जवळ येत म्हटलं,
“मी होतो, आहे आणि पुढेही राहीन तुझ्यासोबत.”
“मी होतो, आहे आणि पुढेही राहीन तुझ्यासोबत.”
प्रिशाने नजर खाली केली.
“नाही समीर..मी आता तशी राहिले नाही.मी तुटलेय.मला जोडण्याचा प्रयत्न करू नको.माझ्यातलं सगळं संपलंय. मी तुला अशी.. शी ss.. माझी मलाच किळस येतेय.त्यामुळे माझा नाद सोड.”
“नाही समीर..मी आता तशी राहिले नाही.मी तुटलेय.मला जोडण्याचा प्रयत्न करू नको.माझ्यातलं सगळं संपलंय. मी तुला अशी.. शी ss.. माझी मलाच किळस येतेय.त्यामुळे माझा नाद सोड.”
समीरचा आवाज थरथरला. तो म्हणाला,
“थांब! एक शब्द जरी अजून बोललीस तर बघ ..तुला असं वाटलंच कसं की मी तुला तुझ्या जखमांमुळे सोडेन? तसं असेल तर तो माझ्यासाठी मृत्यू असेल प्रिशा.”
“थांब! एक शब्द जरी अजून बोललीस तर बघ ..तुला असं वाटलंच कसं की मी तुला तुझ्या जखमांमुळे सोडेन? तसं असेल तर तो माझ्यासाठी मृत्यू असेल प्रिशा.”
त्याने आपल्या खिशातून छोटं मंगळसूत्र बाहेर काढलं. तेच मंगळसूत्र, जे त्याने काही वर्षांपूर्वी तिच्यासाठी विकत घेतलं होतं पण कधी देऊ शकला नव्हता.त्या मंगळसूत्राचा छोटासा काचकडा प्रकाशात लख्ख चमकत होता.
“समीर, असं करू नकोस. लोकं काय म्हणतील?” ती अश्रूंनी भरलेल्या आवाजात म्हणाली.
“लोकं?” समीर उपहासात्मक हसला, पण त्या हास्यामागे रडणारा आवाज दडलेला होता.
“जग काहीही म्हणो, पण तू माझी आहेस. तुझं मन तुटलं असेल पण माझं प्रेम अजूनही तसंच आहे. माझं हे प्रेम तुझ्या शरीरावर नाही, तुझ्या आत्म्यावर आहे.”
प्रिशाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
“पण मी आता अपवित्र झालेय समीर. माझ्याशी असं बोलू नकोस.प्लीज हे सगळं थांबव.”
“पण मी आता अपवित्र झालेय समीर. माझ्याशी असं बोलू नकोस.प्लीज हे सगळं थांबव.”
समीरने तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं,
“प्रिशा, अत्याचाराने कुणाचं पावित्र्य हिरावून घेतलं जात नाही.अत्याचार फक्त अपराध्याचा चेहरा उघड करतो आणि तू अजूनही माझ्यासाठी तितकीच निर्मळ आहेस जेवढी आधी होतीस.”
“प्रिशा, अत्याचाराने कुणाचं पावित्र्य हिरावून घेतलं जात नाही.अत्याचार फक्त अपराध्याचा चेहरा उघड करतो आणि तू अजूनही माझ्यासाठी तितकीच निर्मळ आहेस जेवढी आधी होतीस.”
त्याने तिच्या हातावर हात ठेवला आणि तिच्या संमतीची वाट न पाहता हळूच तिच्या गळ्यात ते मंगळसूत्र बांधलं.
क्षणभर सगळं स्तब्ध झालं.घड्याळाची टिकटिकही जणू काही थांबून हा क्षण गोठवू पाहू लागली.प्रिशा नि:शब्द राहिली. काही क्षणांनी ती ओक्साबोक्शी रडू लागली.
“का इतकं प्रेम करतोस माझ्यावर?” ती म्हणाली.
डोळ्यातून ओघळत आलेलं पाणी हलकेच पुसत समीर हसला.
“कारण तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. तुझ्या जखमांसह तुला स्वीकारणं म्हणजे माझं प्रेम पूर्ण होणं आहे.”
ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून मनसोक्त रडत राहिली.खूप रडून झाल्यावर ती म्हणाली,
“समीर,मला पुन्हा जगायचंय, पण मला ना खूप भीती वाटते.”तिला पुन्हा रडू येऊ लागले.
“समीर,मला पुन्हा जगायचंय, पण मला ना खूप भीती वाटते.”तिला पुन्हा रडू येऊ लागले.
समीरने तिचे अश्रू पुसले.
“आता भीती नाही राहणार प्रिशा कारण आता मी आहे, तुझ्या प्रत्येक लढाईत, प्रत्येक वेदनेत.”
इतका वेळ दरवाज्याजवळ बाहेर उभ्या वसुधाताईंच्या डोळ्यांतही आसवे होती, पण या वेळी ती दुःखाची नव्हती तर आशेची होती.
त्या दोघांना पाहून त्यांनी हळू आवाजात म्हटलं,
“देवाने जे तोडलं, ते प्रेमानं पुन्हा जोडलं जातंय..”
“देवाने जे तोडलं, ते प्रेमानं पुन्हा जोडलं जातंय..”
समीरच्या मांडीवर डोकं ठेवून प्रिशा झोपून गेली होती.रात्र गडद होत चालली होती.थोड्या वेळातच त्या हॉस्पिटलच्या खोलीत पहाटेचा प्रकाश पसरला.
हा प्रकाश म्हणजे द्योतक होता- आशेचा, प्रेमाचा आणि नव्या सुरुवातीचा.
आता मात्र या प्रेमकथेत फक्त भावना उरणार नव्हत्या.
तर न्याय, बदला आणि विराजच्या कटाचा शेवट ठरणार होता.प्रिशा आणि समीरचा प्रतिशोध आता सुरू झाला होता,जिथं प्रेमाचं रूपांतर होणार होतं एका निर्मळ व अभेद्य शक्तीमध्ये..
तर न्याय, बदला आणि विराजच्या कटाचा शेवट ठरणार होता.प्रिशा आणि समीरचा प्रतिशोध आता सुरू झाला होता,जिथं प्रेमाचं रूपांतर होणार होतं एका निर्मळ व अभेद्य शक्तीमध्ये..
तिकडे डॉ विशाल तुरुंगात कैद होता.त्याने केलेला गुन्हा अक्षम्य होताच शिवाय त्याच्या पेशाला काळिमा फासणारा होता पण त्याला त्याचे काहीही वाटत नव्हते. प्रिशाची अब्रु लुटून त्याला जग जिंकल्याचं फिलिंग आलं होतं.तेवढ्यात तिथे त्याच्यासमोर एक व्यक्ती आली आणि म्हणाली,
" प्लॅन बी म्हणजे प्रिशावर बलात्कार असं मी काही सांगितलं नव्हतं..का केलंस तू असं? ती माझी होती,तरीही तू केवळ स्वतःचा हक्क समजून फायदा घेतलास?"
वाचकहो,कोण आहे ही व्यक्ती? ओळखा पाहू? स्टे ट्युन्ड टू धिस लव्ह टेल..
वाचकहो,कोण आहे ही व्यक्ती? ओळखा पाहू? स्टे ट्युन्ड टू धिस लव्ह टेल..
क्रमशः
©® सौ. प्रियंका शिंदे बोरुडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा