मागील भागात आपण पाहिले की प्रिशा आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढते आणि न्यायालयात तिच्या बाजूने निकाल लागतो.एक लढाई तर ती जिंकली होती पण समीरची आई सुलभाताई यांचं मन ती जिंकू शकेन का हे आता पाहुया..
न्यायालयातून विजय मिळवून आल्यानंतर काही दिवसांनी, समीर आणि प्रिशा त्यांच्या एका छोट्या घरात स्थायिक झाले. सगळी जुनी जळमटं पुसून एक नव्या आयुष्याची सुरुवात करायची असे प्रिशाने ठरवले. तिच्या जखमा भरल्या नव्हत्या, पण केलेला निश्चय इतका ठाम होता की ती त्या जखमांना तोंड देणं शिकली होती आणि त्यामुळे ती त्यांना लपवत नव्हती.त्या जखमांचं रूपांतर ती स्त्रीशक्तीत करत होती.
एका सकाळी, समीरचा फोन वाजला.
“आई होती, ती तुला भेटायला येणार आहे.” फोन झाल्यावर त्याने हळू आवाजात सांगितलं.
“आई होती, ती तुला भेटायला येणार आहे.” फोन झाल्यावर त्याने हळू आवाजात सांगितलं.
प्रिशाच्या हातातील पाण्याचा ग्लास एका जागेवरच थांबला. ती काही क्षण नि:शब्द राहिली, पण चेहऱ्यावर हसू आणत म्हणाली,
“ठीक आहे, मी तयार आहे.”
“ठीक आहे, मी तयार आहे.”
दुसऱ्या दिवशी दुपारी दरवाज्याची बेल वाजली.सुलभाताई आत आल्या अगदी साध्या साडीमध्ये, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा शांतपणा नव्हता.
त्या प्रिशाकडे पाहत क्षणभर काही बोलल्या नाहीत.
“कशी आहेस आई?” समीरने विचारलं.
“बरी आहे. तू कसा आहेस?” त्यांनी उत्तर दिलं पण तेही प्रिशाकडे न बघता.
प्रिशाने नम्रपणे नमस्कार केला,
“नमस्कार करते आई.”
“नमस्कार करते आई.”
सुलभाताईंनी मान डोलावली, पण त्या काहीही बोलल्या नाहीत.त्यांनी तिला आशीर्वाद देखील दिला नाही.थोड्या वेळानंतर त्यांनी थेट मुद्द्याला हात घातला,
“समीर, तू हिच्याशी लग्न केलंस हे ठीक आहे.नाही म्हणजे मला माहिती आहे तू चांगल्या हेतूने केलंस पण हा जो समाज आहे ना, तो शांत बसत नाही.लोक बोलतात रे.. रोज नवीन प्रश्न विचारतात,' तुमच्या मुलाने त्या मुलीशी लग्न का केलं ? आपल्या समाजात मुली नव्हत्या का?' खरं सांगू?त्यांच्या आवाजात चीड नव्हती, पण एक प्रकारची बीभत्सना होती."

“आई, लोक काय बोलतात याची मला पर्वा नाही.मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे कारण ती बळी नाही, एक योद्धा आहे.” समीर म्हणाला.
सुलभाताईंच्या डोळ्यांत पाणी आलं.
“मला हे समजते रे समीर पण एक आई म्हणून मला भीती वाटते. आयुष्यभर तिला लोक बोट दाखवतील आणि तुला टोमणे मारतील.मला तुमचं हे दु:ख बघवणार नाही.”
“मला हे समजते रे समीर पण एक आई म्हणून मला भीती वाटते. आयुष्यभर तिला लोक बोट दाखवतील आणि तुला टोमणे मारतील.मला तुमचं हे दु:ख बघवणार नाही.”
प्रिशा शांतपणे पुढे आली,
“आई, तुमचं म्हणणं मला कळतंय पण तुम्हीच मला एक सांगाल का? समजा जर मी गप्प बसले असते, न्याय मागितला नसता, तर तुम्ही मला सून म्हणून स्वीकारलं असतं ?”
“आई, तुमचं म्हणणं मला कळतंय पण तुम्हीच मला एक सांगाल का? समजा जर मी गप्प बसले असते, न्याय मागितला नसता, तर तुम्ही मला सून म्हणून स्वीकारलं असतं ?”
सुलभाताई नि:शब्द झाल्या. त्यांच्या डोळ्यांत अपराधाची छटा उमटली.काही क्षणांचं मौन सगळ्यांना स्तब्ध करून गेलं.
मग सुलभाताईंनी हळू आवाजात म्हटलं,
“मला वाटतं, माझ्यातच काहीतरी कमतरता आहे प्रिशा. तू तुझ्या ठिकाणी बरोबर आहेस पण हे सगळं पचवायला मला वेळ लागेल.तरीही मी प्रयत्न नक्की करेन.”
“मला वाटतं, माझ्यातच काहीतरी कमतरता आहे प्रिशा. तू तुझ्या ठिकाणी बरोबर आहेस पण हे सगळं पचवायला मला वेळ लागेल.तरीही मी प्रयत्न नक्की करेन.”
प्रिशाने डोळ्यातलं पाणी पुसत, त्यांचा हात हलकेच धरला आणि म्हणाली,
“मला तुमचं पूर्ण स्वीकारणं नको आहे आई. फक्त तुम्ही माझ्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा.मी तुम्हाला निराश करणार नाही.”
“मला तुमचं पूर्ण स्वीकारणं नको आहे आई. फक्त तुम्ही माझ्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा.मी तुम्हाला निराश करणार नाही.”
सुलभाताईंनी तिच्या हातावर हात ठेवला.त्या काहीही बोलल्या नाहीत पण त्यांच्या डोळ्यांत पहिल्यांदाच प्रिशा बद्दल आज थोडं ममत्व दिसलं.
त्या रात्री सुलभाताई निघून गेल्या.समीरने खिडकीतून त्यांना जाताना पाहिलं.
प्रिशा म्हणाली,
“त्या पूर्णपणे बदलतील का हे मला माहित नाही, पण त्यांनी आज माझं ऐकलं एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे."
“त्या पूर्णपणे बदलतील का हे मला माहित नाही, पण त्यांनी आज माझं ऐकलं एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे."
समीर हसत म्हणाला, “हो. काही बदल वादळासारखे नसतात, तर ते शांत झुळकीसारखे असतात पण तरीही ते आयुष्य बदलून टाकतात.”
दोन आठवड्यांनी बातम्यांमध्ये एक न्यूज आली.
“प्रिशा समीर देशमुख यांनी अत्याचारग्रस्त महिलांसाठी ‘पुनर्जन्म’ नावाची संस्था स्थापन केली.”
“प्रिशा समीर देशमुख यांनी अत्याचारग्रस्त महिलांसाठी ‘पुनर्जन्म’ नावाची संस्था स्थापन केली.”
त्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी सुलभाताई स्वतः मुख्य पाहुण्या म्हणून आल्या.मंचावर प्रिशा भाषण देताना म्हणाली,
“आज माझ्या मागे एक आई उभी आहे जी माझ्या जखमा पाहून नाही, तर माझ्या लढाईचा सन्मान करण्यासाठी इथे आली आहे.”
“आज माझ्या मागे एक आई उभी आहे जी माझ्या जखमा पाहून नाही, तर माझ्या लढाईचा सन्मान करण्यासाठी इथे आली आहे.”
प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या आणि सुलभाताईंनी मंचावर येऊन प्रिशाला मिठी मारली.
त्या म्हणाल्या,
“ आज मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की माझ्या घरात सून नाही तर, मुलगी आली आहे.”
“ आज मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की माझ्या घरात सून नाही तर, मुलगी आली आहे.”
समीर दूर उभा राहून हसला.प्रिशाच्या डोळ्यांत स्वीकाराच्या विजयाचे अश्रू चमकत होते.
आता पुढे काय होणार? कथेत आता नवा ट्विस्ट डोकं वर काढत होता.ओळखा पाहू? आपल्या या संस्थेत काम करताना प्रिशाला पुन्हा तिच्या भूतकाळाशी जोडलेला एक चेहरा भेटणार आहे की आता तिचं आयुष्य खऱ्या अर्थाने शांततेकडे वळणार आहे?
जाणून घेऊया पुढील भागात..
तोपर्यंत स्टे ट्युन्ड..
तोपर्यंत स्टे ट्युन्ड..
क्रमश:
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा