मागील भागात आपण पाहिले की पुनर्जन्म या संस्थेत प्रिशाला तिच्यावर झालेल्या अत्याचाराचे एक सत्य विराज पाठवतो. ही गोष्ट ती समीरला न सांगता थेट विराजला भेटून येते. त्यामुळे तिच्यात आणि समीरमध्ये तणाव निर्माण होतो.आता पाहुया पुढे..
रात्रीच्या पावसानंतरचा सकाळचा थंड वारा खिडकीतून आत येत होता.प्रिशा जागी होती, कारण डोळ्यांत झोप नव्हती.समीरची अवस्था देखील याहून वेगळी नव्हती.अजूनही तो तिच्याशी बोलला नव्हता आणि म्हणूनच
तो अबोला,ती अस्वस्थ शांतता तिचं मन पोखरून काढत होती.

तिने ठरवलं. विराजने सांगितलेल्या सत्याचा पाठपुरावा करायचाच.संस्थेच्या ऑफिसमध्ये ती विराजच्या फाइल्स तपासत होती.तेवढ्यात एक कागद तिच्या नजरेस पडला..
त्यात ' विशालला मेडिकल कौन्सिलमधून वाचवण्यासाठी दिलेली शिफारस' अशा नावाचं एक पत्र होतं.त्याखाली एक स्वाक्षरी होती.
ती प्रिशाने तपासली आणि ती हादरली.
ती प्रिशाने तपासली आणि ती हादरली.
ती स्वाक्षरी होती 'सुलभा देशमुख' यांची..
प्रिशाला काही क्षण शब्दच सुचले नाहीत.ती त्या कागदावरून बोटं फिरवत स्वतःशीच कुजबुजली,
“हे कसं शक्य आहे ?आई?”
“हे कसं शक्य आहे ?आई?”
त्या दिवशी संध्याकाळी ती थेट सुलभाताईंच्या घरी गेली.
सुलभाताई देवघरात आरती करत होत्या.प्रिशा थेट मुद्द्याला हात घालत, आवाज कंपित पण ठाम ठेवत म्हणाली,
“आई,ही स्वाक्षरी तुमची आहे का?”

सुलभाताईंनी फाइल उघडली.त्यात ते स्वाक्षरी केलेलं पत्र पाहून त्यांचा चेहरा क्षणात बदलला.
त्या खुर्चीत बसल्या आणि म्हणाल्या,
“हो प्रिशा. ही माझीच स्वाक्षरी आहे.”
“हो प्रिशा. ही माझीच स्वाक्षरी आहे.”
प्रिशाचे डोळे पाणावले,
“मग हे का केलं तुम्ही? तुम्ही त्या माणसाला वाचवलंत ज्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं!”

सुलभाताईंचा आवाज थरथरला,
“तू समजतेस तसं अजिबात नाहीए गं. मी विशालला ओळखत होते कारण तो माझ्या शिकवणीमध्ये टॉपर विद्यार्थी होता शिवाय समीरच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी त्याने आपल्या शहरात बरीच मदत केली होती. त्या मदतीची परतफेड म्हणून मी शिफारस केली. परंतु मला कल्पनाही नव्हती की ते शिफारस पत्र तुझ्यावर झालेल्या अत्याचारासाठी मागवण्यात येत आहे म्हणून..मला वाटलं असेल त्याचे काही वेगळे प्रकरण..म्हणून मग मी जास्त खोलात न जाता त्यावर सही केली.त्यावेळी मला काहीही कल्पना नव्हती की त्या कुकर्मामागे हा राक्षस दडलेला आहे नाहीतर मी असे काहीही केले नसते."
सुलभाताई खूप काकुळतीने बोलत होत्या.

प्रिशा नि:शब्द झाली.सुलभाताई पुढे म्हणाल्या,
“पण जेव्हा मला सगळं कळलं, तेव्हा माझा माझ्यावरच विश्वास बसेना. म्हणूनच मी सुरुवातीला तुला सून म्हणून स्वीकारू शकले नाही कारण माझ्याच चुकांमुळे तुला त्या प्रकरणासाठी कोर्टातील कामकाजात त्रास सहन करावा लागला."

त्यांच्या डोळ्यांत अपराधगंड आणि वेदना स्पष्ट दिसत होती.
प्रिशा हळूहळू जवळ आली आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली,
“आई, तुम्ही दोषी नाही.दोष त्या परिस्थितीचा आहे, त्या प्रणालीचा आहे जिथे योग्य माणूस आणि राक्षस ओळखता येत नाही.तुम्ही झालेल्या घटनेसाठी स्वतःला दोष दिलात आणि मला दूर ठेवून स्वतःही अशी मूक शिक्षा सहन करत राहिलात."

सुलभाताईंनी प्रिशासमोर हात जोडले,
“मला माफ कर प्रिशा. मी त्या दिवसापासून रोज देवाला एकच मागणं मागते की माझ्या चुकांमुळे तुला कधीही पुन्हा त्रास होऊ नये."

त्यांच्या त्या शब्दांवर प्रिशा पुढे आली आणि त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाली,
“आई, तुम्ही मला दूर ठेवलंत म्हणून मी आज इथे उभी आहे.कदाचित तो वेदनेचाच प्रवास माझ्या लढाईचं बळ ठरला.”

दोघीही शांत बसल्या.आज पहिल्यांदा त्या सासू-सून नव्हत्या, तर दोन जखमी स्त्रिया एकमेकांना समजून घेत आई आणि मुलीच्या नात्याने जवळ आल्या होत्या.
समीर दारात उभा होता.त्याने सर्व ऐकलं होतं.
त्याच्या डोळ्यांत पाणी आलं.
त्याच्या डोळ्यांत पाणी आलं.
तो पुढे येऊन दोघींना म्हणाला,
“कधी कधी सत्य नात्याला तोडायचा प्रयत्न करतं, पण विश्वासाचा एक तुकडा त्या नात्याला पुन्हा जोडतो.”

त्याने प्रिशाचा हात धरला,
“मला माफ कर प्रिशा.मी तुझ्यावर रागावलो, पण खरं सांगू का? कारण आज तुला गमावायची भीती मला माझ्या प्रेमापेक्षा मोठी वाटली होती.”

प्रिशा भावुक होऊन म्हणाली,
“मलाही माफ कर समीर.मी तुझ्यापासून सत्य लपवलं पण एक वचन मला दे की इथून पुढे प्रत्येक वेळी आपण एकमेकांसाठी एकत्र उभे राहणार आहोत, हो ना?”

सुलभाताईंनी दोघांचा हात एकत्र ठेवला,
“आता कुठलीही सावली तुम्हाला वेगळं करू शकणार नाही.”

त्या रात्री पहिल्यांदाच तिन्ही मनं शांत झोपली पण दूर कुणीतरी जुन्या फाइल्समध्ये फेरफार करत होतं कारण
कोणीतरी होतं ज्याला प्रिशाच्या “पुनर्जन्म” संस्थेचा वाढता प्रभाव नको होता.

एक एक अडथळे पार करत प्रिशा आणि समीर एकत्र येत आहेत.परंतु पुढे येणारे एक संकट आणखी गंभीर असेल का? काय वाटतं तुम्हाला? जाणून घेऊया पुढील भागात..
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा