तोतया वारसदार (पर्व २ रे) भाग ११

“तुम्हाला जेंव्हा जखमी अवस्थेत घरी नेलं. तेंव्हा तुमच्या शरीरावर युनिफॉर्म होता, मग त्या माणस?

 तोतया वारसदार

पात्र रचना

सारंग         - वकील,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

डॉ प्रशांत       - डॉक्टर,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

किरीट         - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

निशांत        - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता

नयना         - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर  

महादेवराव      - घराण्याचा मूळ पुरुष.

सखारामपंत     - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक

विश्वनाथ       - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक.

कौशिक        - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला.

दिनकर       - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून

               कानपूरला गेला

चंद्रकांत गोखले                - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर

उज्ज्वला                    - चंद्रकांत गोखल्यांची बायको.

विश्वास                     - चंद्रकांत गोखल्यांचा मुलगा अमेरिका.

स्वानंदी                     - विश्वास ची बायको.

सुनील                      - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.

नर्मदा आणि गोदावरी – महादेवरावांच्या मुली, लग्न होऊन चिपळूण आणि नंतर

पुण्यास स्थलांतर पण पुण्याच्या प्लेग मधे दोन्ही कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली.

रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला

स्थायिक

रेवती          सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला

स्थलांतर.

अक्षय साने     - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय

सहावी  पिढी. सुरतला स्थायिक.

अंबिका        सखाराम पंतांची मुलगी  अकाली मृत्यू.

कावेरी         रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न

श्रीरंग         कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या  वेळेस सैन्यात गेला.

सीता, सरिता जान्हवी    – श्रीरंग च्या मुली.

शंकरन               - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा.

विनायक       भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक

व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.

जय           व्यंकटेशचा मुलगा.

रोहन          - सौमित्रचा मुलगा

लक्ष्मण आणि वर्षा      - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.

  गोकर्णला स्थायिक.

वसुधाबाई             - लक्ष्मणची आई.

विश्राम आणि अनिल           - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -गंगाधर –

सहावी पिढी.

  साताऱ्याला  स्थायिक.

दिनेश आणि प्रांजल            - विश्रामची मुलं. सातारा

विनय                       - अनिलचा मुलगा सातारा.

विश्वंभर                     - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर.

माधव                      - विश्वंभर – राजाराम – माधव. तंजावरला

 स्थायिक

वसुंधरा                      - माधवची बायको.

चिन्मय आणि विवेक           - माधव ची मुलं.

हेमांगी                      - चिन्मयची बायको. 

कावेरी                      - महादेव – विश्वनाथ- कावेरी. विश्वास परांजपे शी लग्न.

वसंतराव परांजपे                     कावेरी परांजप्यांचे आताचे वंशज

प्रभावती                            वसंतरावांच्या पत्नी

त्र्यंबक                             वसंतरावांचे काका.

गोविंद                             वसंतरावांचा धाकटा भाऊ.

श्रीकांत आणि विक्रम            -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात. 

सुधाकर गोखले         निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.

विशाखा               सुधाकररावांची बायको.

बबन                 - सारंग सरांचा चपराशी

सुभाष गोखले          -बबनचा मित्र. कटातला भागीदार. तोतया वारसदार

अविनाशराव           - निशांतचे वडील.

जयश्री                - निशांतची आई.

भाग  ११        

भाग १०  वरुन पुढे वाचा .......   

  

“बांग्लादेश मधे तुम्ही काय करता?” – ऑफिसर.

“माझं कपड्याचं  छोटसं दुकान आहे.” – अविनाश.

“तुम्ही तर आता भारतात आला आहात. मग दुकान बंद आहे का?”- ऑफिसर.

“नाही, माझा एक चांगला मित्र आहे तो सध्या सांभाळतो आहे.” – अविनाश.

“तुम्ही जेंव्हा विमानातून उडी मारली तो दिवस कोणचा होता?” – ऑफिसर.

“रविवारची रात्र म्हणजे सोमवारची पहाट होती.” – अविनाश.

“तुमची तर स्मृति गेली होती, मग हे तुम्हाला कसं कळलं?” – ऑफिसर.

“माझ्या बायकोने सांगितलं.” – अविनाश.

“काय सांगितलं?” – ऑफिसर.

“मी जेंव्हा हकीम चाचांना सापडलो तो सोमवारचा दिवस होता म्हणून.” – अविनाश.

“तुम्ही झाडावर फक्त एकच रात्र लोंबकळत होता?” – ऑफिसर.

“सर, मला माहीत नाही. बायकोने जे सांगितलं त्यावर मी विश्वास ठेवला.” – अविनाश.

“तुमच्या चाचांना इंडियन ट्रूप केंव्हा येणार आहे हे माहीत होत?” – ऑफिसर.

“त्यांना कसं कळणार? मला सुद्धा लास्ट मिनीट ला कळलं की आज ड्रॉप आहे म्हणून. मग आम्हाला  ब्रीफ केल्या गेलं आणि रात्री ड्रॉप.” – अविनाश.

“हे पण तुमच्या बायकोनेच सांगितलं?” – ऑफिसर.

“नाही हे मला नंतर हळू हळू गोष्टी आठवत गेल्या, तेंव्हा लक्षात आलं.” – अविनाश.

“तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी झाडावरून रेस्क्यू केलं, याचा अर्थ त्यांना माहीत होतं की इंडियन आर्मी केंव्हा येणार आहे ते. आणि म्हणूनच ते शोधायला सकाळी सकाळी जंगलात आले. बरोबर आहे न?” – ऑफिसर.

“हकीम चाचांना माहीत असण्याचं काहीच कारण नव्हतं. ते त्या परिसरातले नावाजलेले हकीम होते, रोजच्या प्रमाणे जडी बुटी गोळा करायला जंगलात गेले होते. मी त्यांना दिसलो, हा योगा योग. पाकिस्तान लष्कराने  पाहीलं असतं तर आज मी पाकिस्तानच्या जेल मधे असतो.” – अविनाश.

“बांग्लादेश आणि भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, मग सरकारला तुमच्या बद्दल सूचना का दिली नाही?” – ऑफिसर.

“हे मी कसं सांगू? मुळात मी भारतीय सैनिक आहे, हेच मला माहीत नव्हतं. हकीम चांचांनी सर्वांना सांगितलं होतं की मी त्यांचा दूरचा भतिजा आहे म्हणून. मलाही तेवढंच माहीत होतं.” – अविनाश.

“तुम्ही कधी तुमच्या कुटुंबा बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही? तुम्ही तुमच्या घरी न राहता चाचा कडे राहात होता हे तुम्हाला विचित्र वाटलं नाही?” – ऑफिसर.

“एकतर पहिली दोन वर्ष मी स्वत:ला त्यांचाच मुलगा समजत होतो, मग एक दिवस बोलता बोलता कोणी शेजारी आले होते, त्यांनी माझ्या घरा बद्दल चौकशी केली. मग मी चाचांना त्या बद्दल विचारलं. तेंव्हा चाचांनी माझा म्हणजे सुलतानीचा इतिहास सांगितला. पाकिस्तानी फौजेनी आमचं घर उद्ध्वस्त केलं होतं आणि माझी बायको आणि बहीण लापता होती. मी जीव वाचवण्यासाठी पळत होतो, तेंव्हा वाघाने माझ्यावर हल्ला केला म्हणून मी एवढा जबर जखमी झालो होतो.” – अविनाश.

“हूं, तुम्ही जेंव्हा मिशन वर गेला, तेंव्हा तुमच्या बरोबर काय काय सामान दिलं होतं, म्हणजे काही तर दिलं असेल न?” – ऑफिसर.

“मला जेवढं आठवतंय तेवढं सांगतो. एक स्टेन गन होती, तिचे दोन मॅगझिन होते आणि एक लोड केलेलं होतं. थोडे चॉकलेट आणि सुका मेवा होता. एक स्पेयर शूज आणि मोजे होते. तीन ग्रेनेड होते, आणि एक पिस्तूल. आणि एक पाण्याची बाटली. एवढं सामान माझ्या पाठीवरच्या बॅग मधे होतं.” – अविनाश.

“ती बॅग कुठे आहे? ती पण तुमच्या बरोबर चाचांनी आणली का?” – ऑफिसर.

“नाही जेंव्हा पॅरॅशूट फाटून हेलकावे घेत होतं तेंव्हा ती निसटून जंगलात पडली. पुढचं मला माहीत नाही. त्या पुढचे सहा महीने मी शुद्धीवर नव्हतो.” – अविनाश.  

“तुमच्या हकीम चाचांनी त्या बॅगचा शोध घेतला असेलच न? ती गन आणि पिस्तूल आणि मॅगझिन कुठे आहे? जमा केले का?” – ऑफिसर.

“नाही त्यांना या सगळ्यांची काही कल्पनाच नव्हती. ते सगळं मला आत्ता काही दिवसांपूर्वी आठवलं. त्याबद्दल मी सलमाला विचारलं, पण याबद्दल तिला काहीच माहीत नाहीये.” – अविनाश.

“तुम्ही भारतीय आर्मी मधे ऑफिसर होता हे कोणा कोणाला माहीत आहे?”- ऑफिसर

“फक्त सलमा. आणि हकीम चाचा, पण चाचांचा स्वर्गवास झाला आहे. अजून कोणी नाही.” – अविनाश.

आणि बाकीचे जे चार लोकं होते, ज्यांनी तुम्हाला उचलून घरी नेलं त्यांना?” ऑफिसर

“त्या बद्दल मला काही माहिती नाही. कोणी तशी ओळख पण दिली नाही.” -अविनाश

“तुमचा जीव वाचवल्या बद्दल त्यांना धन्यवाद द्यायची इच्छा झाली नाही? – ऑफिसर.

“सर, मी सहा महीने शुद्धीवर नव्हतो, त्यानंतर कीती तरी महीने नुसता वेदनेने तळमळत होतो. माझी विचार शक्ति कामच करत नव्हती.” – अविनाश.

“हे तुम्हाला कोणी सांगितलं? बायकोने?” – ऑफिसर.

“नाही हे मी स्वत: अनुभवलं आहे.” – अविनाश.  

“बांग्लादेश सरकार मधे तुमची कोणाशी ओळख आहे? कधी कोणाला भेटला आहात का?” – ऑफिसर.

“कोणीच ओळखीचं नाही.” – अविनाश.

“तुम्हाला जेंव्हा जखमी अवस्थेत घरी नेलं. तेंव्हा तुमच्या शरीरावर युनिफॉर्म होता, मग त्या माणसांनी लढाई संपल्यावर आणि शेख मूजीब अध्यक्ष झाले, तेंव्हा सरकारला का कळवलं नाही?” – ऑफिसर.

“मी बेशुद्ध होतो, आणि मग सुलतानी म्हणूनच वावरत होतो. माझा युनिफॉर्म आणि टोकन बद्दल कोणीच काही सांगितलं  नाही. ते आत्ता आठवणी जाग्या झाल्यावर सलमाने सांगितलं.” – अविनाश.

“तुमच्या पासून ही गोष्ट का लपवून ठेवली?” – ऑफिसर.

“माझी स्मृति गेली होती त्यामुळे या गोष्टीं मला सांगण्यात काही अर्थ नाही असं त्यांना वाटलं.” – अविनाश.

“आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं?” – ऑफिसर.

“माझ्या बायकोने, सलमाने. आणि ते ही आता माझी स्मृति परत आल्यावर.”– अविनाश.

“तुम्ही भारतीय सैनिक आहात हे तुम्हाला आठवत नव्हत, पण चाचांना तर माहीत होतं. त्यांनी का सरकारला कळवलं  नाही?” – ऑफिसर.

“मी सुलतानी म्हणूनच आयुष्य जगत होतो, त्यामुळे मी कोणाला काही विचारण्याचा प्रश्नच माझ्या मनात कधी आला नाही. चाचांनी का कळवलं नाही हे सांगता येणार नाही. आता ते नाहीयेत.” – अविनाश.

“ओके. मिस्टर सुलतानी, आता पुरतं एवढंच. तुम्ही गेलात तरी चालेल. तुमच्या बरोबर जे आले आहेत, त्यांना आता पाठवा.” – ऑफिसर.

“या बसा. नाव काय तुमचं? आणि काय करता?” – ऑफिसर.

“मी विश्राम गोखले. अविनाशचा लांबचा चुलत भाऊ. साताऱ्याला असतो आमचं सोन्या चांदीचं मोठं दुकान आहे तिथे.” – विश्राम.

“तुम्ही सुलतानीला कधी पासून ओळखता?” – ऑफिसर.

“अविनाश बद्दल आम्हाला गेल्या वर्षी कळलं, पण प्रत्यक्ष भेट तो नागपूरला आल्यावरच झाली.” – विश्राम.

“गेल्या वर्षी कळलं म्हणजे? कोणी सांगितलं? सलमाने?” – ऑफिसर.

“नाही, आम्हाला सलमाचं नाव सुद्धा माहीत नव्हतं. निशांत बांग्लादेशला जाऊन आल्यावर त्याने आम्हाला अविनाश आणि सलमा बद्दल सांगितलं.” – विश्राम.

“निशांत कोण?” – ऑफिसर.

“प्रायवेट डिटेक्टिव.” – विश्राम.

“डिटेक्टिव? त्याचं काय काम होतं? तो कशाला बांग्लादेशला गेला होता?” - ऑफिसर.

“सर ही एक थोडी मोठी आणि कॉम्प्लेक्स कथा आहे. असं थोडक्यात नाही सांगता येणार.” – विश्राम.

“ओके, तुम्ही सांगा आम्ही ऐकतो आहे.” - ऑफिसर.

मग विश्रामनी आत्ता पर्यन्त पाठ झालेली सर्व कथा उलगडून सांगितली. म्हणाला,

“असं आहे साहेब, निशांत सगळी चौकशी करून एकतरपूरला गेला होता. त्यांच्या जवळ अविनाशचा जुना फोटो होता, पण तो डिटेक्टिव असल्याने त्याला पटकन साम्य दिसलं. पण अविनाशने  तेंव्हा साफ नाकारलं. मग निशांत हात हलवत परत आला.” – विश्राम.

“मग काय झालं?” – ऑफिसर.

“निशांतच्या भेटी नंतर मात्र हळू हळू अविनाशला काही प्रसंग आठवायला लागले. मग सलमाने त्याला त्याचा युनिफॉर्म आणि टोकन दाखवलं. मग मात्र त्यांच्या स्मृतीत झपाट्याने सुधार होत गेला. आणि शेवटी त्यांनी इथे यायचा निर्णय घेतला.” – विश्राम

“हे निशांत कुठे असतात?” – ऑफिसर.

“अमरावतीला.” – विश्राम.

“सुलतानीची बायको सलमा, ती पण भारतात आली आहे का?” – ऑफिसर.

“हो, दोघं बरोबरच आले आहेत. त्यांचा तीन महिन्यांचा व्हीजा आहे.” – विश्राम.

“समजा सुलतानीचा अर्ज स्वीकारल्या गेला, तर ती वापस जाणार आहे का?” – ऑफिसर

“त्यांचा सुद्धा नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या करिता विदेश मंत्रालयाकडे अर्ज केला आहे.” – विश्राम.

त्यांचे डीटेल आम्हाला हवे आहेत. त्यांचा पत्ता काय आहे?” – ऑफिसर.

“जो अविनाशचा आहे तोच.” विश्रामने तो पत्ता आणि फोन नंबर लिहून दिला.

“ओके, मला निशांतचा पण पत्ता आणि फोन नंबर द्या.” – ऑफिसर.

विश्रामने निशांतचा पत्ता आणि फोन नंबर दिला.  

चौकशी संपली. रात्रीचे  ८ वाजले होते.

“इतका वेळ तुला काय विचारात होते? सहा तास? आणि तरीही तू टेंशन मधे दिसत नाहीस.” – विश्राम.

मग अविनाशने त्याला काय काय विचारलं त्याचा गोषवारा दिला.

“बस इतकंच?” हे तर तासा भरात आटपायला हवं होतं.” – विश्राम.

“तेच तेच प्रश्न फिरून फिरून विचारात होते. वैताग होता, पण सारंग सरांबरोबर बरीच उजळणी केल्या मुळे माझ्या उत्तरात काही विसंगती त्यांना शोधता आली नाही, हे ही खरं.” – अविनाश.

दुसऱ्या दिवशी दोघेही नागपूरला आले. निशांतला फोन करून सलमा बद्दल विचारपूस केली तेंव्हा तो म्हणाला की “तुम्हीच या इथे. दोन दिवस पाहुणचार घ्या. थोडे ताजे तवाने व्हा. मग आहेच चौकशीची पुढची फेरी.”

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com