तोतया वारसदार (पर्व २ रे) भाग १६ (अंतिम)

DNA टेस्ट साठी व्यंकटेश आणि सौमित्र लंडनहून आले होते. ती पण टेस्ट पार पडली. आता अविनाश पूर्ण वेळ श??

 तोतया वारसदार

पात्र रचना

सारंग         - वकील,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

डॉ प्रशांत       - डॉक्टर,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

किरीट         - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

निशांत        - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता

नयना         - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर  

महादेवराव      - घराण्याचा मूळ पुरुष.

सखारामपंत     - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक

विश्वनाथ       - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक.

कौशिक        - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला.

दिनकर       - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून

               कानपूरला गेला

चंद्रकांत गोखले                - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर

उज्ज्वला                    - चंद्रकांत गोखल्यांची बायको.

विश्वास                     - चंद्रकांत गोखल्यांचा मुलगा अमेरिका.

स्वानंदी                     - विश्वास ची बायको.

सुनील                      - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.

नर्मदा आणि गोदावरी – महादेवरावांच्या मुली, लग्न होऊन चिपळूण आणि नंतर

पुण्यास स्थलांतर पण पुण्याच्या प्लेग मधे दोन्ही कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली.

रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला

स्थायिक

रेवती          सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला

स्थलांतर.

अक्षय साने     - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय

सहावी  पिढी. सुरतला स्थायिक.

अंबिका        सखाराम पंतांची मुलगी  अकाली मृत्यू.

कावेरी         रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न

श्रीरंग         कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या  वेळेस सैन्यात गेला.

सीता, सरिता जान्हवी    – श्रीरंग च्या मुली.

शंकरन               - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा.

विनायक       भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक

व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.

जय           व्यंकटेशचा मुलगा.

रोहन          - सौमित्रचा मुलगा

लक्ष्मण आणि वर्षा      - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.

  गोकर्णला स्थायिक.

वसुधाबाई             - लक्ष्मणची आई.

विश्राम आणि अनिल           - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -गंगाधर –

सहावी पिढी.

  साताऱ्याला  स्थायिक.

दिनेश आणि प्रांजल            - विश्रामची मुलं. सातारा

विनय                       - अनिलचा मुलगा सातारा.

विश्वंभर                     - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर.

माधव                      - विश्वंभर – राजाराम – माधव. तंजावरला

 स्थायिक

वसुंधरा                      - माधवची बायको.

चिन्मय आणि विवेक           - माधव ची मुलं.

हेमांगी                      - चिन्मयची बायको. 

कावेरी                      - महादेव – विश्वनाथ- कावेरी. विश्वास परांजपे शी लग्न.

वसंतराव परांजपे                     कावेरी परांजप्यांचे आताचे वंशज

प्रभावती                            वसंतरावांच्या पत्नी

त्र्यंबक                             वसंतरावांचे काका.

गोविंद                             वसंतरावांचा धाकटा भाऊ.

श्रीकांत आणि विक्रम            -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात. 

सुधाकर गोखले         निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.

विशाखा               सुधाकररावांची बायको.

बबन                 - सारंग सरांचा चपराशी

सुभाष गोखले          -बबनचा मित्र. कटातला भागीदार. तोतया वारसदार

अविनाशराव           - निशांतचे वडील.

जयश्री                - निशांतची आई.

भाग  १६  (अंतिम)      

भाग १५  वरुन पुढे वाचा .......

किती वेळ लागतो हो बंगाली शिकायला? म्हणजे अविनाश केंव्हा शिकला?” – अधिकारी.

“दोन एक वर्ष लागली असतील. म्हणजे कामापूरतं यायला लागलं होतं.” – सलमा.

“ठीक आहे. आता आठ वाजले आहेत, बरीच रात्र झाली आहे. तुम्ही जाऊ शकता. उद्या पुन्हा तुम्हाला यावं लागेल. तुमच्या बरोबर अविनाश आणि निशांत आले आहेत, त्यांना पण उद्या बरोबर घेऊन या. त्यांच्याशी पण उद्या संवाद साधायचा आहे.” – अधिकारी.

हॉटेल वर तिघा जणांची चर्चा चालली होती. आज पण भाषे संदर्भात बरेच प्रश्न विचारले त्यांनी. म्हणजे बाकी प्रश्न पण विचारात होते, पण ओघा ओघाने भाषे बद्दल पण विचारात होते. अविनाशला बंगाली कोणी शिकवलं हे विचारात होते. खूप विचार आणि चर्चा करूनही त्यांचा भाषेवर का कटाक्ष आहे हे त्यांना समजत नव्हतं. शेवटी जे व्हायचं असेल ते होईल असा विचार करून सर्व झोपायला गेले.

दुसऱ्या दिवशी तिघंही आर्मी ऑफिस मधे. सलमाला आत बोलावलं होतं आणि अविनाश आणि निशांतला बाहेरच थांबायला सांगितलं.

“या सलमा मॅडम सुरवात करायची?” आर्मी ऑफिसर.

“साहेब, किती दिवस चालणार आहे ही चौकशी?” – सलमा.

“सरकारी काम आहे. निश्चित दिशा आणि गतीने काम चालू आहे. आता चौकशी जवळ जवळ संपतच आली आहे. सुलतानी हाच अविनाश गोखले आहे याची आम्हाला खात्री पटली आहे. आणि तुम्ही त्यांच्या पत्नी आहात, या बद्दल आम्ही कधी संशय घेतलाच नाहीये. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. रीलॅक्स.” – आर्मी ऑफिसर.

“मग एवढा वेळ का लागतो आहे? साहेब, आम्हाला भारतात येऊन ५ महीने झाले आहेत, आमचा व्हीजा एकदा रिन्यू झालेला आहे, पुन्हा होईल की नाही हे माहीत नाही. व्हीजा संपला, तर आम्हाला परत जावं लागेल. आणि मग आमच्या हातात काहीच उरणार नाही.” – सलमा.

“तुम्ही कशाला काळजी करता आहात? तुमचा व्हीजा एक वर्षा करिता रिन्यू करण्या साठी आम्ही आधीच पावलं उचलली आहेत. हा व्हीजा संपायच्या आत तुमचा  व्हीजा रिन्यू होईल.” – आयबी अधिकारी.

“म्हणजे ही चौकशी वर्ष भर चालणार आहे? आत्ताच तर तुम्ही म्हणालात की चौकशी जवळ जवळ संपतच आली आहे म्हणून, मग वर्ष कशाला?” – सलमा.

“हो बरोबर आहे, पण दोन टेस्ट अजून बाकी आहेत. एक अविनाश गोखल्यांची आणि एक तुमची. त्यांच्या साठी थोडा वेळ लागणार आहे. इतकंच.” – अधिकारी.

“कोणच्या टेस्ट? आम्हाला कळू शकेल?” – सलमा.

“हो, तुमच्या परवानगी शिवाय या टेस्ट होणारच नाहीयेत. अविनाश ची DNA टेस्ट होईल. त्यासाठी इंग्लंड वरुन त्यांच्या भावांना यावं लागणार आहे. त्यात थोडा वेळ जाऊ शकतो.” – अधिकारी.

“आणि दुसरी टेस्ट? जी मला द्यावी लागणार आहे ती?” – सलमा.

“ते सांगतो, पण त्या आधी मला सांगा, सुलतानी दुकानात १० वाजता जायचा, त्यांच्या अगोदर किमान एक तास तरी तुमच्या बरोबर घालवत असेल न?” – अधिकारी.

“आम्ही दोघंच होतो न घरात त्यामुळे तो घरात असतांना आम्ही बरोबरच असणार. पण तुम्ही असं का विचारता आहात? हे तर सगळी कडे असंच असणार आहे.”– सलमा.

पण अधिकाऱ्याने तिच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही. तो म्हणाला,

“म्हणजे सकाळचा एक तास, सुलतानी दुपारी जेवायला यायचा तेंव्हा अर्धा तास आणि रात्री १० वाजता घरी आल्यावर एक तास. असे अडीच तास तुम्हाला मिळायचे. बरोबर?”

“मला काही समजत नाहीये. कशासाठी अडीच तास?” – सलमा म्हणाली, तिचा आवाज जरा चिडखोर झाला होता. तिला कळतच नव्हतं की गाडी कुठल्या दिशेने चालली आहे ते. काल पासून असंच “बे सिर पैर” प्रश्न विचारणं चाललं होतं.

“ठोकळ मानाने सुलतानी तुम्हाला रोज अडीच तास मराठी शिकवायचा. तेवढं तुम्हाला पुरेसं होतं. बरोबर ना?” – अधिकारी.

“हे सगळं काय चाललं आहे? कालपासून मराठी मराठी करता आहात?” – सलमा.

“शांत, सलमा मॅडम शांत व्हा. तुम्ही विसरता आहात, चौकशी आमची नाही, तुमची चाललीय. त्यामुळे उत्तरं तुम्ही द्यायची आहेत. नसेल द्यायची तर तसं स्पष्ट सांगा. आम्ही तशी नोंद करू. पण उत्तरांच्या ऐवजी प्रश्न विचारायचे नाहीत.” – अधिकारी.  

“हो, पुरेसा वेळ होता.” – सलमा वैतागाने म्हणाली. पण आता ती जरा घाबरली पण होती. आता अधिकारी ज्या आवाजात बोलला, तो अतिशय कोरडा होता, आवाजात किंचित जरब पण होती.

“तुम्हाला गुजराती भाषा येते?” – अधिकारी.

आता मध्येच ही गुजराती कुठून आली, सलमा विचारात पडली की या लोकांना आपल्या कडून नेमकं हवंय तरी काय? पण आता प्रश्न विचारण्याची सोय राहिली नव्हती. “नाही” – सलमा.

“कधी ऐकलीय?” – अधिकारी.

“नाही.” – सलमा.

“आता तुमच्या टेस्ट बद्दल. तुम्हाला गुजराती भाषेची टेस्ट द्यावी लागणार आहे. तयार आहात?” – आधिकारी.

“मला गुजराती येतच नाही मग मी टेस्ट कशी देणार?” सलमा.  

“बरोबर आहे. त्यासाठी आम्ही एका  टिचर ची नेमणूक करणार आहोत. तो तुम्हाला रोज अडीच तास असे सहा महीने गुजराती शिकवणार आहे.” – अधिकारी.

“पण का? मी गुजराती का शिकायचं?” – सलमा.

“काय झालं, की आम्ही तुमचं भाषा कौशल्य पाहून खूप प्रभावित झालो, आणि आम्ही त्याचा उल्लेख आमच्या साहेबांकडे केला. हे ऐकून ते म्हणाले की ही व्यक्ति आपल्या डिपार्टमेंट साठी फारच उपयुक्त आहे. तुम्ही त्यांच्या शिकवणीची सोय करा आणि सहा महिन्यांनी टेस्ट घ्या. त्या पास झाल्या, तर डिपार्टमेंट मधे घ्या.” – अधिकारी.

“मला नोकरीची आवश्यकता नाहीये, पण फक्त सहा महिन्यात एखादी भाषा शिकणं कसं शक्य आहे?”– सलमा.

“तुम्हाला सहज शक्य आहे. मॅडम तुम्ही सहाच महिन्यात अस्खलित मराठी बोलायला शिकला. मग गुजराती शिकायला काय प्रॉब्लेम आहे?” – अधिकारी.

सलमा जागच्या जागीच थिजली. भीतीची एक शिरशिरी पाया पासून मस्तकापर्यंत गेली. आयबी काय प्रकरण आहे, याचा नमूना तिला बघायला मिळाला होता. पुढे काय होणार, याची तिला काहीच कल्पना करता येत नव्हती.

“मग मॅडम काय म्हणता? करायची सुरवात?” – अधिकारी.

सलमा आता विचार करत होती. निशांत म्हणाला होता की नकार दिला तरी चालतं.

“नाही, मला नोकरीची आवश्यकता नाहीये, त्यामुळे माझी तयारी नाही.” – सलमा.

“तयारी नाही की सहा महिन्यात भाषा शिकता येणार नाही?” – अधिकारी.

सलमाने काही उत्तर दिलं नाही.

“मॅडम खोटं बोलण्याचं काय कारण होतं?” – अधिकारी.

“मी काय खोटं बोलले?” – सलमा.

“सहा महिन्यात मराठी शिकले असं म्हणालात.” – अधिकारी.

“सहा महिन्यात शिकले असं मी कधीच म्हंटलं नाही.” – सलमा.

“तुम्ही म्हणालात की निशांत येऊन गेल्यावर अविनाशला मराठीची आठवण यायला लागली आणि नंतर त्यांच्याकडून तुम्ही मराठीचे धडे घेतले.” – अधिकारी.

“हो.” सलमा हो म्हणाली आणि तिच्या लक्षात आलं की यांचा अर्थ सहाच महीने होतो. आता पुढे काय वाढून ठेवलं आहे, या भीतीने तिची गाळण उडाली.

“अविनाशची स्मृति कधी परत आली? १९८६ च्या आसपास?” – अधिकारी.

“तुम्हाला कोणी सांगितलं?” सलमा म्हणाली, आणि तिने जीभ चावली. तिने पुन्हा एकदा माती खाल्ली होती. अधिकारी हसला. म्हणाला,

“सलमा मॅडम आता सर्व खरं खरं सांगून टाका, आम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत, हे आता पर्यन्त तुमच्या लक्षात आलंच असेल.” – अधिकारी.

सलमा गप्प.

“तुम्ही मराठी अस्खलित बोलता, त्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही. अविनाशची स्मृति परत यायला लागल्यावर इतकी वर्ष तुम्ही दोघांनी काय केलं ते सांगा. भारतात येण्याचा निर्णय घ्यायला तुम्ही इतका वेळ का घेतला?” – अधिकारी.

“आम्ही लगेच भारतात यायचं प्लॅनिंग केलं आणि आलो.” – सलमा.

“केंव्हा सुरू केलं प्लॅनिंग?” – अधिकारी.

“निशांत येऊन गेल्यावर अविनाशची स्मृति परत आली म्हणून त्यानंतरच भारतात यायचं ठरवलं.’ – सलमा म्हणाली, पण आता तिच्या बोलण्यात फारसा आत्मविश्वास नव्हता.

अधिकाऱ्याने, निशांत आणि अविनाशला आत बोलावलं.

“सलमा मॅडम तुम्ही ही गोष्ट आमच्या पासून का लपवली? सहा महिन्यात तुम्ही मराठी शिकल्या, ही गोष्ट शेंबडं पोर सुद्धा ऐकणार नाही. हे बघा पुन्हा सांगतो, तुमच्या भाषेशी आम्हाला काहीच घेणं देणं नाहीये. स्मृति परत आल्यावर इतकी वर्ष तुम्ही का थांबलात एवढंच आम्हाला सांगा.” – अधिकारी म्हणाला

सलमा काही बोलली नाही, तिने अविनाशकडे पाहीलं.

“ओके अविनाश तुम्ही सांगा.” – अधिकारी.

अविनाशला कळून चुकलं की आता खरं सांगावंच लागेल. तो म्हणाला,

“साहेब, खरं सांगायचं तर आम्हाला काही सुचतच नव्हतं कोणाला विचारायची पण सोय नव्हती. म्हणून आम्ही गप्प बसलो. सलमा म्हणाली, की अजून सगळ्या गोष्टी आठवे पर्यन्त आपण कोणालाच काही सांगायला नको. जसं चाललं आहे तसंच चालू देऊ. आम्ही पैसेवाले नव्हतो, त्यामुळे आम्ही भारतात येण्या साठी पैसे साठवत होतो. अशी काही वर्ष गेली, मग अचानक निशांत आला, त्याने मला ओळखलं, त्याच्या बरोबर बोलतांना जाणवलं की आता भारतात जाण्याची वेळ आली आहे. पण निशांत सारख्या अनोळखी माणसावर एकदम कसा  विश्वास ठेवायचा, या विचाराने आम्ही त्याला नाही म्हणून सांगितलं. पण नंतर आमची घालमेल सुरू झाली आणि आम्ही इथे येण्याचा निर्णय घेतला. इथे आल्यावर निशांत आणि सारंग सरांशी बोलू आणि जर सर्व ठीक वाटलं तर नागरिकत्व मिळवण्या साठी हालचाल करू असं ठरवलं.” – अविनाश.

अविनाश, सलमा आणि निशांतला तिथेच सोडून तिघं ऑफिसर दुसऱ्या खोलीत गेले.

“काय म्हणता गोडबोले? तुमचं रीडिंग काय आहे?” – अधिकारी.

“खरं बोलतो आहे साहेब, मी लक्ष पूर्वक बघत होतो. तुम्ही पण काही शहानिशा केलीच असेल ना?” – गोडबोले.

“हो आमच्या बांग्लादेश मधल्या कॉनटॅक्ट ने क्लीन चिट दिली आहे. ही माणसं कुठल्याही वेड्या वाकड्या व्यवहारात गुंतली नाहीयेत असा नि:संदिग्ध रीपोर्ट दिला आहे.” – अधिकारी.

“आम्ही त्यांच्या सहकाऱ्यांशी पण बोललो आणि त्याचा कमांडर म्हणजे कर्नल राहेजा, जे आता मेजर जनरल म्हणून रिटायर झाले आहेत, त्यांच्याशी पण बोललो. सर्वांनीच अविनाश बद्दल खूपच चांगला रीपोर्ट दिला आहे.” – आर्मी ऑफिसर.

आर्मी आणि आयबी कडून सकारात्मक रीपोर्ट गेल्यावर, अविनाश आणि सलमाला नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

DNA टेस्ट साठी व्यंकटेश आणि सौमित्र लंडनहून आले होते. ती पण टेस्ट पार पडली. आता अविनाश पूर्ण वेळ शेती कडे बघणार होता, त्यामुळे विनयचा मार्ग पण मोकळा झाला, आता तो फॅक्टरी साठी वेळ देऊ शकत होता. सर्वांचीच आयुष्य आता पुन्हा एकदा मार्गी लागली होती. पुढच्या वर्षीच्या दिवाळीत पुन्हा स्नेह संमेलनाची वाट होती.

                    ******समाप्त.******

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com