Login

शब्दांच्या शोधात

The story revolves around Priya's struggle with feeling disconnected and uninspired. She experiences a sense of detachment and tries to comprehend her own emotions. An encounter with Rani prompts Priya to reflect inwardly, emphasizing the significance of connection in overcoming isolation.
आज लिहायचं असूनही शब्दच मिळत नव्हते , असं का होत असेल बरं ? भावना व्यक्त होण्यासाठी आज शब्दांची साथच मिळत नव्हती . सर्व काही हवे तसे आणि नेहमी सारखेच होतं . कदाचित नेहमीच्या गोष्टी मध्ये बदल नव्हता . मग या शब्दांचे रुसण्याचे कारण तरी काय असावं . या सगळ्या विचारात अंतर्भूत झालेले प्रिया मात्र सगळ्या घरातील कामे उरकून नेहमीसारखी आपली लिखाणाची आवड जपत बसली होती . काहीतरी होतं जे तिला टोचत होतं पण व्यक्त करता येत नव्हतं .
सागराच्या तळाशी लपून बसलेल्या शिंपल्यात असणारा मोती शोधणे सुद्धा सोपे नाही का? पण या जाणून बुजून दडलेला शब्दांना कसे शोधावे बरं ? किती वेळा लपाछपीचा खेळ चालू राहणार. हे म्हणजे असं झालं पूर्ण शाई असणारा पेन कोऱ्या पेपरला त्याच्या मनात काय चालू आहे ते सांगायलाच तयार नाही आणि पेपरला मात्र त्याचं कारणच माहित नाही ? बिचारा पेपर करणार तरी काय ?
प्रिया झुल्यावर बसून विचार मग्न होती. हळूहळू तिच्या चेहऱ्याची मुद्रा गंभीर होत चालली होती आणि आपले वेळापत्रक न चुकता फॉलो करणारी , प्राधान्य पूर्वक गोष्टी ठरवून त्यावर निर्णय घेणारी हुशार मुलगी होती . स्वकेंद्रीत आणि आयुष्य आनंदाने जगणारी होती.
रवीशी लग्न करून चार वर्षे झाली होती. पण आता तिला रवी नोकरीला गेल्यावर एकटी पडायला लागली होती या चार महिन्यात तिला सर्व काही सुरळीत चालू असूनही मन काही कशातच रमत नव्हते हा सगळ्यांचा परिणाम असावा की प्रियाचे शब्दही तिच्या न कळत असणाऱ्या एकट्यापणात राहून गेले होते. मनाच्या सखोल दरीत उडी मारलेल्या शब्दांना परत वर येण्याचा कोणताच मार्ग सापडत नव्हता का ? की त्यांना वरच यायचं नव्हते ? मी म्हणजे माझे शब्द ते माझ्यापेक्षा वेगळे कसे असू शकतील असं म्हणणारी प्रिया विचारात हरवून गेली होती. प्रियाची मनस्थिती काहीतरी वेगळीच होती . यावेळी तर तिला स्वतःला समजून घेणे थोडेसे कठीण जात होते.
तेवढ्यात डोरबेल जोर जोरात वाजू लागली आणि तिने दरवाजा उघडला . तर समोर उभी असणारी राणी धोबीवाली म्हणते ." अहो मॅडम कब से आपकी डोर बेल बजा रही हू , मुझे अभी दुसरी बिल्डिंग मे जाके भी उन लोगों की भी कपडे देणे हे , मेरा कितना टाइम खराब हो गया l आप क्या कर रही थी? 15 मिनिट खडी हू मै l आज तो मुझे बहुत सारा काम है l येलो आपके कपडे मे तो चली l " प्रिया मात्र एका क्षणासाठी राणीच्या चेहऱ्यावरचे सगळे हावभाव आणि तिच्या कामाची असणारी लगबग पाहत होती.
तिने राणीने हातात ठेवलेले कपडे घेऊन दरवाजा बंद करून घेतला आणि तिला आजूबाजूला असणाऱ्या वस्तुस्थितीची जाणीव झाली तरी तिच्या मनात विचार आला . एकटेपणापेक्षा तर अंधार बरा अंधारात आपण अंधार होत नाही. बाकीच्या वस्तू नाहीशा होतात पण एकटेपणा तर आपण एकटे होऊन जातो आणि बाकीच्या वस्तू तर आहे तशाच राहतात.
0