Login

सर्वात भारी भारताच्या पोरी!

भारतीय महिला क्रिकेट संघ विश्वचषक विजेता!
शीर्षक: सर्वात भारी भारताच्या पोरी!

१३ वी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ही ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर २०२५ होणार असे जाहीर केले होते. ही स्पर्धा चौथ्यांदा भारतात आयोजित केली होती. ह्या आधी भारताने १९७८, १९९७ आणि २०१३ मध्ये आयोजित केली होती.महिला क्रिकेट स्पर्धेत एकूण आठ संघाचा समावेश होता.

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, भारत, श्रीलंका, पाकिस्तान, न्यूझीलंड, आणि बांगलादेश ह्या देशांचा समावेश होता. उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलिया संघाला हरवल्यावर सर्व भारतीयांच्या आशा ह्या उंचावल्या होत्या.
सगळीकडून होणारा पाठिंबा हा त्यांना अंतिम फेरी जिंकण्यासाठी गरजेचा होता, हे आता २ नोव्हेंबर २०२५ रोजी पूर्ण क्रिकेटचे स्टेडियम गच्च भरलेले पाहून समजत होते.

कोणी मोबाईलवर, कोणी टीव्ही वर तर कोणी रविवार निमित्त बाहेर गेले असेल तर जिथे कुठे स्क्रीन असेल तिथे क्रिकेटचा हा सामना बघत होते. रेडिओ वर म्हणा, टीव्ही वर म्हणा की अगदी मोबाईलमध्ये कोणतेही ॲप उघडले की भारतीय महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत पोहोचली आहे, ह्याबद्दल मेसेजेस दिसत होते.

ऑस्ट्रेलियाचा संघ हा गतविजेता आहे, एकही सामना न हरणाऱ्या ह्या संघाला जेव्हा त्यांचे अंतिम फेरीत जाणे संपुष्टात आले, तेव्हा भारतीय संघाची ताकद काय आहे हे समजले.

अंतिम फेरीत तर दक्षिण आफ्रिका हे मोठे आव्हान भारताला होते. आधीच्या झालेल्या सामन्यामध्ये त्यांनी हरवले होते. त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली आहे हे सर्वांना माहीत झाले होते. आपल्या संघाकडून काही चूक होऊ नये, म्हणून सर्वजण प्रयत्न करतील असे खेळ सुरू व्हायच्या आधी वाटले होते.

सामना हा दुपारी तीन वाजता सुरू होणार होता. तर पावसामुळे उशिरा सुरू झाला. स्टेडियममध्ये तब्बल दोन तास क्रिकेटप्रेमी सामना सुरू होण्याची वाट बघत होते. दोन तासाने सामना सुरू झाली. नाणेफेक मध्ये दक्षिण आफ्रिका संघ जिंकला आणि त्यांनी गोलंदाजी निवडली.

भारताला आधी जास्त धावा काढण्याचे आव्हान होते. आधी शंभर धावांपर्यंत एकही खेळाडू बाद झाला नव्हता. नंतर पुढे खेळाडू बाद झाले आणि भारताने २९८ धावा काढून दक्षिण आफ्रिकेला ते पूर्ण करण्याचं आव्हान केले.

इथे दक्षिण आफ्रिका ह्यांची फिल्डिंग आणि आधीच्या सामन्यामध्ये स्मृती, जेमिमा, दिप्ती आणि कर्णधार हरमनप्रीत ह्यांनी चांगली कामगिरी केली होती, पण शेवटच्या फेरीत मात्र त्या आधी सारखी कामगिरी करू शकल्या नाहीत. शेफाली वर्मा हिने एका बाजूने संघाची बाजू सावरत चांगल्या पद्धतीने खेळ सुरू ठेवला अमनज्योतही १२ धावांवर बाद झाल्याने नंतर ऋचा घोषनं अखेरच्या काही षटकांत फटकेबाजी केल्यामुळं भारताच्या धावा ६ बाद २९८ पर्यंत धावा पोहोचल्या.
आधी तर ३००- ३५० धावा सहज काढल्या जातील असे वाटत असताना आपले बळी(विकेट्स) गेल्याने ३०० च्या आता धावसंख्येचा आकडा समोर आला.

शेफाली वर्मा हिने धावा काढून नंतर कर्णधार हरमनप्रीत ह्यांनी तिला गोलंदाजी करायला सांगितली.तिने तिच्यावर टाकलेली जबाबदारी नीट पार पाडली. ज्या वेळेस दक्षिण आफ्रिका संघाचे खेळाडू बाद होण्याची आवश्यकता होती तेव्हा दीप्ती शर्मा (०५),शेफाली वर्मा (०२), श्री चरणी (०१) अनुक्रमे त्यांनी फलंदाजांना बाद केले.

दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार असलेल्या लॉरा वोल्वार्ड ह्यांनी शतक पूर्ण केले होते, पण ते शतक त्यांना विजयापर्यंत पोहोचवू शकले नाही. अंतिम सामना जिंकणे, जसे भारताची इच्छा होती तशीच ती दक्षिण आफ्रिका ह्यांची सुद्धा होती.

दक्षिण आफ्रिकेला दिलेले २९९ धावांचे आव्हान ते पूर्ण करू शकतील, असे सुरुवातीला वाटत असताना भारताच्या गोलंदाजांनी विरुद्ध संघाच्या फलंदाजी करणाऱ्या स्पर्धकांना पूर्ण बाद केल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

भारताच्या महिलांनी चुकांमधून शिकून अंतिम फेरीत दाखल होऊन विश्वचषक स्पर्धेत विश्वचषक जिंकून इतिहास रचला. शेफालीने तिची ऐनवेळी केलेली निवड किती योग्य होती, हे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही करून दाखवून दिले.

विरुद्ध संघाच्या डोळ्यांत सामना हरल्याचे तर विजेता संघाच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू होते.दोन्ही संघाच्या कर्णधारांनी दोन्ही संघाच्या खेळाचे कौतुक केले.

२ नोव्हेंबर २९२५ हा दिवस सुवर्ण अक्षरात कोरला जाणार, कारण अनेक विक्रम त्यादिवशी भारतीय महिला क्रिकेट संघाने बनवले आहेत.

जिंकणे कधीच सोपे नसते, पण जिंकण्याचे स्वप्न बघणे आणि ते सत्यात उतरवणे हे शक्य होऊ शकते, ही प्रेरणा भारतीय महिला संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकून सर्व महिलांनाच नाहीतर पुरुषांना सुद्धा दिली आहे.

जसे भारतीय महिला कर्णधार हरमनप्रीत ह्यांनी सांगितले की, ही तर फक्त सुरुवात आहे. अजून आपल्याला पुढे जायचे आहे आणि जिंकायचे आहे, पण हा सामना जिंकणे खूप गरजेचे होते, असे सांगितले तसेच इथून पुढेही भारतीय महिला क्रिकेट संघाने अशीच चांगली कामगिरी करावी आणि आपल्या भारतीय देशाचे नेतृत्व करत उच्च स्थान गाठावे हीच इच्छा सर्व भारतीय व्यक्त करत आहेत.

भारतीय महिलांनी
रचला इतिहास नवा
स्वप्नाकडे बघण्याचा
दिला दृष्टिकोन नवा

जिंकण्याची इच्छा
संघाने पूर्ण केली
भारतीयांची मान
अभिमानाने उंच झाली

प्रत्येक खेळाडूंचे
दिसले अफाट कष्ट
विरुद्ध संघाचे केले
सर्व डाव खेळून नष्ट

मोठ्या विश्वचषकावर
कोरले भारताचे नाव
भारतीयांच्या मनाचा
जिंकून घेतला ठाव

भारत महिला संघ
आमचा जगात भारी
सर्वांना दाखवली
अष्टपैलू आहे नारी

© विद्या कुंभार

(पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट संघावर लेख लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच हा माझा पहिलाच कोणत्याही खेळाविषयी लिहिण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे समजून घ्यावे. भारतीय संघाबद्दल लिहिण्याचा उद्देश असल्याने त्यावर जास्त भर टाकला आहे.)

प्रस्तुत लेखाचे अधिकार हे, लेखिकेकडे आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे कॉपी (कॉपी पेस्ट करुन पोस्ट, युट्यूब मार्फत) केल्यास कारवाईस पात्र असेल.
0

🎭 Series Post

View all