*श्रावणमास*
श्रावणमासा बद्दल काय सांगावं! या महिन्याची महतीच इतकी आहे की हा महिना जणू मोकळ्या कपाळावर लावलेला अगदी सुगंधी चंदनाचा टिळाच वाटतो. ऊन - पावसाच्या खेळाचा असा काही डाव रंगतो की सारी सृष्टी क्षणात वेगवेगळे रंग दाखवते. अनेक कवी, कवियत्री यांच्या कवितेत श्रावण अगदीच लहान बिजासारखा अंकुरतो आणि हळू हळू वाढत जाऊन शेवटी अगदी प्रौढ होतो.
नित्य निरागस भासणारा श्रावण मास मला तरी सात्विकतेचा कळस वाटतो. या मासात उत्साह आणि आनंद हा अगदी शिगेला पोहोचलेला असतो. याच कारण म्हणजे श्रावणातील विविध सण-उत्सव. नागपंचमी, मंगळागौर, स्वातंत्र्य दिन श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि बरेच. व्रतवैकल्ये व नियमांचा असा हा श्रावण.
नैसर्गिक रित्या सुद्धा हा महिना फारच गोंडस आहे कारण एखाद्या खोडकर मुलासारखा क्षणात ऊन क्षणात पाऊस! त्या लख्ख उन्हासोबत कोसळणाऱ्या त्या सोनेरी सरी!
सौम्यपणा धारण केलेला हा श्रावणमास एखाद्या नववधूप्रमाणे भासतो. उन्हाळ्यात ओसाड आणि अगदीच विरळ झालेल्या डोंगराला, रानाला हिरवळीने नटवून सोडणारा हा श्रावण वर्षातून महिनाभर आपल्या वाट्याला येतो आणि खूप काही शिकवून जातो. पारंपारिक पद्धती ज्या वर्षभर कुलपात बंद असतात. त्या श्रावणामध्ये आपल्याला पाहायला, जपायला मिळतात. रानभाज्यांना तर उधाण आलेलं असतं. तेरड्याच्या फुलांची रांगोळी दारात आवर्जून काढली जाते. ओसंडून वाहणारी नदी या काळात अगदी झुळझुळ वाहायला सुरुवात करते.
पावसाने जे रौद्ररूप घेतले असते ते जाऊन अगदी कृपेची रिमझिम बरसात सुरू असते. कोणी म्हणतं की या काळामध्ये देवता निद्रावस्थेत असतात म्हणजे देवांनी सुद्धा आरामदायक शयन करण्यासाठी श्रावणाचेच चयन केले आहे.

निसर्गाने हळूच कुस बदललेली असते इतकं मात्र जाणवतं. प्रसन्न वातावरण आणि खूप सारी लगबग घेऊन हा श्रावण येतो. ब्रम्हांडात काय होतं याचं ज्ञान नसेल कदाचित आपल्याला. मात्र घरोघरी सर्व स्वच्छता आणि देवी-देवतांच्या आगमनाची तयारी होण्यास सुरुवात होते.
इंद्रधनुच्या सात रंगांचे दर्शन देणारा हा श्रावण हसवतो,रडवतो भुलवतो आणि आपलंस ही करतो. अकरा महिने जे सुगंधी मृगजळ आपण शोधत असतो ते म्हणजे हा श्रावण. सूर्याच्या कोवळ्या किरणांचा वर्षाव पृथ्वी अलगद स्वतःच्या सर्वांगावर झेलते आणि साजरा होतो चैतन्य सोहळा. एक अशी ऊर्जा या काळात आपल्याला अनुभवायला मिळते जी प्रचंड सात्विक आहे आणि तिचा प्रभाव अगदी मरगळलेल्या मनावर सुद्धा प्रसन्नतेचा ठसा उमटवून जातो. अनेक कवींच्या काव्यात हा श्रावण स्वतःच अस्तित्व ठोसपणे टिकवून आहे.
जसे नैवेद्याचे जे परिपूर्ण ताट असते त्यातील मोदक हा आकर्षक आणि चविष्ट पदार्थ असतो. तसेच बारा मासांच्या नैवेद्याच्या ताटातील सगळ्यात सुरेख आणि चवदार असा श्रावण आहे. त्याची चव चांगली नाही तर तुम्ही काहीच अनुभवलं नाही अशाप्रकारे माझ्या मनाने तुलना केलेली आहे.
सण सोवळे
ऊन कोवळे
आला श्रावण
क्षणात कळे
ऊन कोवळे
आला श्रावण
क्षणात कळे
---------------
धन्यवाद
उन्नती सावंत*श्रावणमास*

उन्नती सावंत
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा