खोलीत खूप अंधार पसरलेला होता. खोलीत वस्तू इतस्तत: पसरलेल्या होत्या . फरशीवर एक मुलगी झोपलेली होती . तिचे काही कुरळे केस तुटून फरशीवर इतस्ततः विखुरले होते .तिचे कपडे खूप मळलेल्या अवस्थेत होते . तिचे डोळे खूप थकलेले जाणवत होते . कपडे काही ठिकाणी फाटलेले होते . खोली तशी लहान होती . त्या खोलीला एकही खिडकी नव्हती . पण दार मात्र खूप साऱ्या वस्तूंनी आतून बंद होती . टेबल , खुर्ची , मोठे मोठे बॉक्स त्या दाराला चिकटून ठेवलेले होते .बाहेरून कोणी न येण्यासाठीची ही व्यवस्था होती . थोड्यावेळाने ती उठली . तिच्या शरीरात काडीचीही शक्ती उरली नव्हती .
कशीबशी ती उठली आणि आजूबाजूला पाहू लागली . ती त्या खोलीत खूप दिवसापासून होती . तिला त्या खोलीत सी. सी. टी. व्ही. कॅमेरा दिसला . तेवढ्यात तिच्या डोक्यात एक कल्पना आली . ती कागद आणि पेन शोधू लागली . तिला त्या पसरलेल्या वस्तू मधून एक कार्ड शीट आणि पेन सापडला . मोठ्या अक्षराने ती त्या कार्ड शीटवर लिहू लागली . लिहून झाल्यावर तिने त्या कार्ड शीटला कॅमेरा समोर धरले . तिला आशा होती की कॅमेऱ्यामधून तिला कोणीतरी पाहील आणि तिला मदत करेल .
' हेल्प मी प्लिज 'हा संदेश तिने लिहिलेला होता.
काहीवेळ ती कार्ड शीट कॅमरासमोर धरून उभी होती . पण त्याचा काही उपयोग झाला नाही . शेवटी थकून तिने कार्ड शीट खाली ठेवले .इतक्यात तिला बाहेर कोणी तरी आल्याचा आवाज येऊ लागला . बुटाचा आवाज हळू हळू मोठा होत होता . ती वेळ न घालवता दाराला लावलेल्या वस्तूंना धरू लागली . बाहेर आलेला माणूस बाहेर दाराला धक्का मारू लागला . आतून ती मुलगी सगळी ताकत लावत होती . पण बाहेरील माणूस खूप जोर लावू लागला . आतील वस्तू त्याच्या लावलेल्या ताकतीने हलू लागल्या . तिला कसही करून त्याला आत येऊ द्यायचं नव्हतं . ती खूप घाबरली होती . पण बाहेरील माणूस दार उघडण्यात यशस्वी झाला . तो दारापुढील वस्तूंना बाजूला करू लागला . त्याच्या चेहऱ्यावर काळा कपडा गुंडाळलेला होता . हातात काळे हातमोजे , कपडेही काळे होते . तो हळू हळू तिच्या जवळ येऊ लागला. ती खाली कोसळली होती . ती रडत खूप विनवण्या करत होती . तिच्या अंगात शक्ती उरलेली नव्हती . तो तिच्या जवळ गेला . तिच्या केसांना पकडले आणि ओढत घेऊन जाऊ लागला .
तिला खूप वेदना होत होत्या . ती वेदनेने किंचाळत होती. पण तिच्या आवाजाने त्याला काहीही फरक पडत नव्हता . तो तिला तसेच ओढत एका खोलीत घेऊन आला . तिथे खूप सारे कॉम्पुटर होते . त्या कॉम्पुटरवर सतत काही संदेश येत होते . खोलीमध्ये अंधार पसरलेला होता . त्या व्यक्तीने खोलीतले एक बटन दाबले. सगळीकडे प्रकाश पसरला . त्या कॉम्पुटर जवळ खूप हत्यारे पडलेली होती . चाकू , तलवार , स्क्रू ड्रायव्हर अशी कित्येक हत्यारे तिथे होती . हे पाहून ती अजून घाबरली . ती त्याच्या पायाला धरून विनवण्या करू लागली .
ती - " मी पाया पडते . प्लिज मला सोड."
त्याला काहीही फरक पडत नव्हता. तो कॉम्प्यूटरकडे पाहू लागला . त्यावर एक संदेश आलेला होता.
' मेक हर ब्लाइंड '
त्या संदेश पुढे पस्तीस बिट कॉइन दिसत होते .
हे पाहताच त्या व्यक्तीने तिला ओढत कॉम्प्युटरच्या कॅमेरा जवळ आणले. त्याने पुढील स्क्रू ड्राइवर घेतला आणि तिच्या एका डोळ्यात खुपसला . ती मोठ्याने ओरडू लागली . पण त्याला काहीही फरक पडत नव्हता . तिच्या डोळ्यातून आता रक्त वाहू लागलं. त्याने स्क्रू ड्रायव्हर दुसऱ्या डोळ्यात खुपसला. ती आणखी मोठ्याने ओरडू लागली . हे करून तो परत कॉम्पुटरकडे पाहू लागला . ती तशीच किंचाळत होती . तिथे आणखी एक संदेश आला .
' आय वॉन्ट हर हार्ट '
त्या संदेश पुढे एक हजार बिट कॉइन झळकत होते . हा संदेश पाहताच त्याने चाकू घेतला आणि वेळ न घालवता तिच्या छातीत खुपसला . तिच्या ओरडण्याचा आवाजात आणखी भर पडली . काहीवेळात तिचे किंचाळणे बंद झाले. तिच्या आत्म्याने शरीर सोडले होते . पण तो माणूस थांबला नाही . तो तिच्या छातीवर वारंवार घाव घालू लागला आणि ह्रदय बाहेर काढले . कॉम्प्युटरवर संदेश अजूनही येत होते . पण तिचे फक्त शरीर उरलेले होते .
------------------------------------------------
सकाळची वेळ होती. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते . अमित वर्तमानपत्र वाचत खुर्चीवर बसला होता . अमित शहरातील उत्तम गुप्तहेर म्हणून प्रसिद्ध होता . कित्येक मर्डर केसेस त्याने सोडवल्या होत्या . फ्लॅटमध्ये तो एकटाच राहत होता .
इतक्यात दारावरची बेल वाजली . तो उठला आणि दार उघडले . समोर एक वयस्कर महिला उभी होती .
अमित -" अरे वर्षा काकू तुम्ही ? या ना आत ."
त्याने त्यांना आत घेतले .
अमित -" काकू बसा. तुमच्यासाठी चहा आणतो ."
वर्षा -" अरे नको .. तू बस तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे ."
ती गंभीर आवाजात म्हणाली .
अमित -" बोला ना."
तो खुर्चीवर बसत म्हणाला . त्याने काकूंच्या गंभीर आवाजावरून ओळखले की काम खूप गंभीर आहे .
वर्षा -" अमित ... रिया गायब आहे ."
त्या हुंदके देत म्हणाल्या .
अमित -" काय ??"
त्यालाही धक्का बसला .
अमित -" किती दिवस झाले ती बेपत्ता आहे ?"
वर्षा -" पाच दिवस झाले ."
तिच्या गालावरून अश्रू वाहू लागले .
अमित -" काकू तुम्ही शांत व्हा ."
अमित तिला शांत करू पाहत होता .
अमित -" तुम्ही पोलिस स्टेशनला गेला होतात का?"
वर्षा -" हो ... पण काहीच उपयोग झाला नाही ."
रिया अमितची कॉलेज पासून जिवलग मैत्रीण होती . अमित अनाथ असल्याने वर्षा त्याला आईसारखी वागणूक देत होती .जेंव्हा पासून अमित गुप्तहेरगिरी मध्ये शिरला होता , तेव्हापासून तो रियापासून दूर झाला होता . त्यांचे बोलणे व्हायचे, पण परत ते आपापल्या कामात मग्न होत असत .
अमितला अचानक ही खबर आल्याने काय करावे हेच कळत नव्हते . त्याला पोलीस स्टेशनला भेट द्यायची होती . त्याला रियाच्या केसबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची होती .
अमित -" रिया आणि तुमची भेट कधी झाली ?"
वर्षा -" त्या रात्री रोजच्या सारखं आम्ही गप्पा मारल्या आणि झोपी गेलो ."
अमित -" मग ?"
वर्षा -" जेव्हा सकाळी मी उठले, मला एक पत्र सापडलं . त्यात लिहिलं होतं ' काळजी करू नको . मी काही तासात येते .' पण त्यानंतर ती आलीच नाही ."
एवढं म्हणत ती रडू लागली .
अमित -" काकू शांत व्हा . मी आहे ना ."
तो तिला शांत करू पाहत होता . ती शांत झाल्यावर तो उठला आणि त्याच्या खोलीत गेला . काहीवेळात तो तयार होऊन आला .
अमित -" काकू चला .."
काहीवेळात ते दोघेही पोलीसस्टेशनला पोहचले . पोलीसस्टेशन तसे खूप गजबजलेले होती . कैदी जेल मध्ये होते . हवालदार तक्रार लिहून घेत होते . अमित पोलीसस्टेशनमध्ये शिरताच सगळ्यांची नजर त्याच्यावर पडली . सगळे त्याच्याकडे पहात होते .
दोघेही थेट इन्स्पेक्टरच्या केबिनमध्ये शिरले . इन्स्पेक्टर अमितला पाहताच स्मित करत म्हणाला .
पाटील ," या या जेम्स बॉण्ड ..."
अमित ," ते राहू देत सर ... रिया मेहता हिच्या बद्दल काही माहिती मिळाली का ?"
अमित आणि वर्षाला पाहत ते म्हणाले .
पाटील -" बसा बसा ..."
दोघे बसताच पाटील म्हणाले .
पाटील -" अमित ... काही अपडेट्स आहेत का ?"
पाटील -" लोकेशन एकाच जागेवर दाखवत आहे ."
अमित -" कुठलं ?"
पाटील -" त्यांच्या घरचं ..."
अमित -" काय ???"
पाटील -" हो ... पण तिथं काही सापडत नाहीये .."
अमित उठला . त्याला ही काही कळेना
***********************************
क्रमशः
ऋषिकेश मठपती
पुढील भाग लवकरच ..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा