चॅम्पियन ट्रॉफी 2025
शीर्षक :- इंटरनेटच मायाजाळ
"अवनी, एवढा वेळ फोनकडे बघत बसशील तर अभ्यास कधी करशील?"आईची हाक तिच्या कानावर आली.
तसं अवनीने घाईघाईने मोबाईल स्क्रीन लॉक केला आणि म्हणाली,
"हो आई, बस आता पाच मिनिटं…"
पण ते "पाच मिनिटं" कधी दोन- तीन तासांत बदलत असतं ते अवनीला देखील समजायचे नाही.
पण ते "पाच मिनिटं" कधी दोन- तीन तासांत बदलत असतं ते अवनीला देखील समजायचे नाही.
अवनी ही अकरावीत शिकणारी बुद्धिमान मुलगी होती. अभ्यासात सुद्धा खूप चांगली होती ती , पण मागच्या काही महिन्यांपासून तिचं लक्ष फक्त इंटरनेट,इन्स्टावरच्या रील्स, चॅटिंग आणि ऑनलाईन गेम्सकडे लागलं होतं.
अवनीच्या आयुष्यात मोबाईल आलाच मुळात तिच्या वाढदिवशी. तिच्या सोळाव्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या आई-वडिलांनी तिच्यासाठी खास गिफ्ट आणलं होतं, तो म्हणजे नवीन स्मार्टफोन.
“अवनी, डोळे मिट!”
तिचे बाबा हसत म्हणाले.तिने पण गुणी मुलासारखे लगेच डोळे मिटले, आणि आईने तिच्या हातात एक सुंदर बॉक्स ठेवला.
“हैप्पी बर्थडे, अवनी!”
अवनीने बॉक्स उघडला आणि आत नवीन मोबाईल पाहिला. तसा तिच्या आनंदाला पारावर उरला नाही.
"थँक्यू आई बाबा! ” ती उड्या मारत नाचू लागली.
“अवनी हा मोबाईल आम्ही तुला दिला आहे, पण लक्षात ठेव ह्याचा उपयोग तुझ्या शिक्षणासाठी, अभ्यासासाठी करायचा फक्त” आईने तिला म्हंटल.
“हो आई, पक्का. मी फक्त स्टडीसाठीच वापरेन,”
अवनीने हसून सांगितलं. त्या दिवशी तिला वाटलं, आयुष्याची सगळी स्वप्नं आता मी पूर्ण करेन.
अवनीने हसून सांगितलं. त्या दिवशी तिला वाटलं, आयुष्याची सगळी स्वप्नं आता मी पूर्ण करेन.
सुरुवातीला ती मोबाईलचा वापर खरोखर अभ्यासासाठी करत होती, यूट्यूब वर गणित कसे सोडवायचे बघत होती, गूगलवर प्रोजेक्ट्स सर्च करत होती, व्याकरण बघत होती. काही दिवसांनी अवनीने तो मोबाईल मित्र मैत्रिणींना दाखवला.
“व्वा अवनी! तुझा फोन किती भारी आहे!”
मेत्रिणी कौतुकाने म्हणाल्या.
कुणीतरी लगेच तिचा फोटो काढला, कुणी नवीन फिचर दाखवले.
“व्हाट्सअँप डाउनलोड कर, आपल्या ग्रुपमध्ये ये.”
“इंस्टाग्राम वर अकाऊंट बनव, तुझे फोटो टाक त्यावर .”
“स्नॅपचॅट फिल्टर्स वापरून पाहा, खूप मजा येते.”
सगळेच तिला एक एक सल्ला देत होते. ते ऐकून अवनीला मज्जा वाटत होती.
रोजच्या साध्या आयुष्याला एकदम नवा रंग मिळाल्यासारखं तिला जाणवलं आणि अभ्यासासाठी दिलेला मोबाईल आता तिच्या वेळेचा सगळ्यात मोठा भक्षक बनला. हळूहळू ती अभ्यासापेक्षा सोशल मीडियात रमू लागली.
एके दिवशी इंस्टाग्रामवर तिने पहिला फोटो टाकला, लाईक्स आणि कॉमेंट्स येऊ लागल्या.
“वॉव !” “प्रेटी गर्ल "“तुझं स्माईल खूप क्युट आहे!”
तिचा चेहरा आनंदाने खुलला आणि अचानक तिने पाहिलं, त्या फोटोवर तिचा क्रश असलेल्या अभिषेकची कंमेंट होती,
तिचा चेहरा आनंदाने खुलला आणि अचानक तिने पाहिलं, त्या फोटोवर तिचा क्रश असलेल्या अभिषेकची कंमेंट होती,
“ब्युटीफुल”
ती वाचून अवनीच्या हृदयाची धडधड वाढली.
“खरंच अभिषेकने मला सुंदर म्हटलं? ह्याचा अर्थ तो मला नोटीस करतोय?”
ती मनोमन म्हणाली व पुन्हा पुन्हा तीच कंमेंट वाचत राहिली. त्या एका कंमेंटने अवनीच्या मनात नवीन स्वप्नं उगवली.
“जर अभिषेकला मी आवडत असेन, तर बाकी लोकांनाही नक्की आवडेन. मला आणखी फोटो टाकायला हवेत… अजून चांगल्या पोजमध्ये… अजून जास्त लाईक्स मिळवायला हवेत.”
पुढच्या काही दिवसांत तिने वेगवेगळ्या कपड्यांत, वेगवेगळ्या फिल्टर्समध्ये फोटो टाकायला सुरुवात केली.
लाईक्स, कॉमेंट्स वाढत होत्या पण सर्वात जास्त ती अभिषेकच्या रिप्लायची वाट बघत होती.
लाईक्स, कॉमेंट्स वाढत होत्या पण सर्वात जास्त ती अभिषेकच्या रिप्लायची वाट बघत होती.
प्रत्येक नोटिफिकेशन येताच ती फोनकडे धावत असे,
“कदाचित अभिषेकने पुन्हा काहीतरी कॉमेंट्स केली असेल…”पण बर्याचदा तो फक्त कुणा दुसऱ्याचा मेसेज निघे तेव्हा ती निराश व्हायची, आणि मग अजून फोटो टाकायचे निश्चय करायची.
घरातल्या लोकांना मात्र बदल जाणवू लागला.
आता तर ती जेवण विसरत होती, पुस्तकं बाजूला ठेवून फोनमध्ये गुंतून जायची.
आई म्हणायची,
“अवनी, थोडा वेळ तरी फोन बाजूला ठेव.”
" ठेवते गं आई, फक्त पाच मिनिटं अजून,”
ती उत्तर द्यायची पण त्या पाच मिनिटांत दोन तासात बदलून जात असत.तिच्या मैत्रिणी म्हणायच्या,
“तुझं तर प्रोफाईल भारी दिसतंय! तू खूपच ग्लॅमरस झाली आहेस.”
आणि ह्याच स्तुतीच्या नादात अवनी अजून खोल खोल त्या व्हर्च्युअल दुनियेत बुडत गेली. शाळेतून आल्यावर ती आधी मोबाईल काढत असे. कुणी फोटोला लाईक केलं, कुणी स्टोरीला रिप्लाय दिला, कुणी मेसेज केला. यामध्येच ती गुंतून जायची.
असच एक दिवस अवनी इंस्टाग्राम स्क्रोल करत बसली होती. अचानक तिच्या इनबॉक्स मध्ये अनोळखी प्रोफाइलवरून मेसेज आला,
“हाय, तुझे फोटो खूपच सुंदर आहेत. तुझ्यात स्टार होण्याची क्वालिटी आहे. मी ऑनलाईन मॉडेलिंग स्पर्धा आयोजित करतोय, तुला यात संधी मिळू शकते.”
ते वाचून अवनीच्या डोळ्यांत चमक आली.
“मॉडेलिंग? प्रसिद्धी? लोक मला अजून जास्त ओळखतील…पैसे मिळतील, कदाचित अभिषेकही जास्त इम्प्रेस होईल.”
तिने ओके पाठवलं तस त्या व्यक्तीने तिला लिंक पाठवली. त्याखाली काही मजकूर होता,
“ही लिंक ओपन करून तू फॉर्म भर, काही फोटो अपलोड कर. पण लक्षात ठेव, ही एक सीक्रेट संधी आहे. कुणालाही सांगू नकोस.”
तिला कधीपासून वाटत होतं की ती प्रसिद्ध व्हावी, लोकांनी तिला ओळखावं. सुरुवातीला तिने विचार केला,
"हे खरं आहे का?"
तिने तस विचारलं तस त्याने काही फोटो, व्हिडिओ शेअर केले आणि म्हणाला
“फार मोठी संधी आहे, विचार करू नकोस. सीट्स लिमिटेड आहेत. ”
हळूहळू अवनी त्याच्यावर विश्वास ठेवू लागली. तिने तिची वैयक्तिक माहिती द्यायला सुरुवात केली. फोटो, पत्ता, अगदी काही खाजगी गोष्टीही तिने त्याला पाठवल्या. तिला कळत नव्हतं की ती जाळ्यात अडकत आहे.
आईला जाणवायला लागलं की अवनीचा स्वभाव बदलतोय. आता ती सतत मोबाईलवर त्याच्याशी चॅट करत रहायची.मित्रमैत्रिणींशी बोलणं कमी झालं.
आई–बाबांशी गप्पा तर जवळजवळ बंदच झाल्या. शाळेत शिक्षक विचारायचे,
आई–बाबांशी गप्पा तर जवळजवळ बंदच झाल्या. शाळेत शिक्षक विचारायचे,
“अवनी, कायं झालं? तू आधीसारखी लक्ष देत नाहीस.”
पण तिच्या मनात फक्त त्या मेसेजचा विचार असे.
पण तिच्या मनात फक्त त्या मेसेजचा विचार असे.
रोज तो तिला म्हणायचा,
“तू खूप टॅलेंटेड आहेस.”
“तुझ्यासारखी सुंदर मुलगी शोधून सापडणार नाही. "
“तू खूप पुढे जाशील. "
“तुझ्यासारखी सुंदर मुलगी शोधून सापडणार नाही. "
“तू खूप पुढे जाशील. "
अवनीच्या डोळ्यांसमोर आता एकच स्वप्न होतं
स्टार बनायचं. प्रसिद्ध व्हायचं. सगळीकडे ओळखलं जायचं.
स्टार बनायचं. प्रसिद्ध व्हायचं. सगळीकडे ओळखलं जायचं.
आईला मात्र सगळं जाणवत होतं.
ती विचारायची देखील,
“अवनी, कोणाशी एवढा वेळ बोलत असतेस?”
“आई, मित्रमैत्रिणींशीच बोलते मी स्टडी बद्दल …”
अवनी खांदे उडवून उत्तर द्यायची. पण आईच्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकत होती.
एक दिवस अचानक त्या अनोळखी नंबरवरून मेसेज आला. त्यात काही फोटो होते, जे अवनीच्या चेहऱ्याशी जोडलेले, पण त्या फोटोमध्ये तिच्या अंगावर कपडे नव्हते.
अवनीने पहिलाच फोटो पाहिला आणि तिच्या अंगावर एकदम काटा आला.
“हे… हे माझं नाही! कुणीतरी माझा चेहरा वापरून बनवलंय…”
तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. तिने होत नव्हतं तेवढं धैर्य गोळा करून मेसेज केला.
“हे कसले फोटो आहेत? तू हे सगळं मला का पाठवलं?”
“पैसे दे मला, नाहीतर मी तुझे फोटो व्यायरल करेन. माझ्याकडे तुझे सगळे पर्सनल फोटो आहेत. मी व्हिडिओ पण बनवेन.”
हे वाचून अवनीचा जीव एकदम घाबरून गेला.
तिचे हात थरथर कापू लागले, डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. तिच्या हातातून फोन निसटला. तिचे हार्टबीट्स वाढले. अचानक तिच्या डोळ्यांसमोर काळोख दाटला.
तिचे हात थरथर कापू लागले, डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. तिच्या हातातून फोन निसटला. तिचे हार्टबीट्स वाढले. अचानक तिच्या डोळ्यांसमोर काळोख दाटला.
“जर आई-बाबांना हे दिसलं तर? जर माझ्या मैत्रिणींना कळलं तर? शाळेत सगळ्यांना समजलं तर???”
ती काही काळ पलंगावर बसूनच राहिली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही वेळाने आई तिच्या खोलीत गेली, तिची ती अवस्था पाहून तिची आई घाबरली आणि तिच्याजवळ धावतच गेली,
“अवनी, कायं झालं बाळा ? तू इतकी घाबरलेली का दिसतेस?”
अवनीने थरथरत्या आवाजात मोबाईल आईच्या हातात दिला.
“आई… मी… मी संपले. माझं आयुष्य संपलं…मी आता नाही जगू शकत.”
आईचे हात थरथर कापायला लागले. पण आईने तिला मिठीमध्ये घेतलं. अवनी घाबरली, आईला बिलगून ती बोलली .
"आई… मी चुकले… मी फसले ग.. सॉरी..…"
आईने ताबडतोब बाबांशी चर्चा केली. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी फोन तपासला, स्क्रीनशॉट्स घेतले, आणि लगेच कारवाई सुरू केली.
एक पोलीस त्यांना म्हणाले,
“ही डिपफेक टेक्नॉलॉजी आहे. कुणाचाही चेहरा घेऊन खोटे फोटो बनवता येतात. घाबरू नका. आम्ही त्याचा तपास करतो.”
ते ऐकून अवनीला थोडं बरं वाटलं. काही दिवसांत पोलिसांनी तो नंबर ट्रॅक करून त्या व्यक्तीला पकडलं.
तो एका टोळीचा भाग निघाला. जे अशा बनावट फोटोंनी मुलींना धमकावून पैसे उकळायचे.
तो एका टोळीचा भाग निघाला. जे अशा बनावट फोटोंनी मुलींना धमकावून पैसे उकळायचे.
अवनी सुटली, पण तिच्या मनावर मात्र जखमा झाल्या. काही दिवस ती खूप दुःखी झाली होती. तिला जाणवलं की इंटरनेटने तिला आकर्षित करून फसवलं होतं आणि तिने तिच्या आईवडिलांना.
हळूहळू अवनीने स्वतःला सावरलं. आईने तिच्या सोबत राहून तिला पुन्हा अभ्यासात, छंदांमध्ये रमवायला मदत केली. अवनी आता इंटरनेट वापरते, पण सावध राहून फक्त कामासाठी.
शाळेत एकदा ‘सायबर सेफ्टी’ विषयावर स्पीच होत,
तेव्हा अवनी धीराने उभी राहिली आणि म्हणाली,
तेव्हा अवनी धीराने उभी राहिली आणि म्हणाली,
“मित्रांनो, इंटरनेट हे खूप मोठं साधन आहे. पण त्यातले सापळे खूप धोकादायक असतात. मी त्यात अडकले पण आई–बाबा आणि पोलिसांच्या मदतीने बाहेर आले. माझी सर्वांनाच विनंती आहे, कधीही अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका, आणि काही चुकलं तरी गप्प राहू नका. आपल्या आईवडिलांकडून मदत मागा. त्यांच्यापासून काहीच लपवू नका. ”
ते ऐकून पूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
अवनीच्या चेहऱ्यावर आता आत्मविश्वास होता.
अवनीच्या चेहऱ्यावर आता आत्मविश्वास होता.