Login

आयफोन

आयफोन घेतलेल्या ची अवस्था
apple ने नुकताच i phone बाजारात आणला आहे. त्याची किंमत पण खूप आहे. तो श्रीमंत लोक , मोठे व्यवसायिक यांच्या साठी असेल. भारता बाहेर त्याच जास्त वेड नाही पण भारतात ल्या लोकांना मात्र त्याच खूप अप्रूप . खासकरून नवीन तरुणाई ला खूप भुरळ पडली आहे. स्वतःकडे आयफोन असेल तर आपण खूप श्रीमंत आहे असे आजकाल च्या मुलांना वाटते. ही तिच मुले आहेत ज्यांना अजून पैसे कमवायची अक्कल नाही.स्वतःच्या पायावर उभे नाहीत .पण आईवडिलांच्या पैसे वर हे सगळे हावं आहे. काही आई वडील सगळे घेऊन पण देतात . कोणी बोले तर त्याच एक वाक्य फिक्स असते " मला मिळाले नाही पण मुलाला सगळे देणार."
पण मला असे वाटते सध्या जी आपली पिढी ४५+ आहे त्यांनी खर तर आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर खूप कष्ट घेतले .त्याचा परिणाम म्हणून आपण आयष्यात सुखी समाधानी आहे . पण काही लोक तो संघर्ष आपल्या मुलांना शिकवायला कदाचित विसरलेत असे वाटते मला. आपल्या कष्टाच्या पैसे न त्यांना देण्या पेक्षा त्यांनी त्यांच्या कष्टाच्या पैसे न घेतला असता तर नक्की त्यांना किंमत कळली असती . पण असे होत नाही.
असो, कोल्हापूर ला नवरात्री निमित्त महालक्ष्मी चा जागर होता. सहकुटुंब आम्ही गेलो होतो. त्या वेळी माझा भाऊ आणी वाहिनी आणी त्यांचा गर्विष्ठ मुलगा आलेला. हो मी त्याला गर्विष्ठ च म्हणतो कारण वयाच्या 25 व्या वर्षी सुद्धा तो आई वाडीला वर अवलंबून आहे. एक रुपया मिळवायची अक्कल नाही पण शॉक तर असे की जसा काय राजकुमार च . महागडे कपडे , शूज , स्पोर्ट बाईक , पार्टी ड्रिंक सगळे व्यसन् . फक्त पैसे मिळवायचं व्यसन नाही .नुकताच दिराने त्याला आयफोन 17 घेतला आहे . त्याची किंमत साधारण 85,000 आहे.गावी सर्वांना दाखवत होता . सर्वांची लायकी काढत होता माझ्याकडे आहे तुमच्याकडं नाही . त्याचा स्वभाव सर्वांना माहिती होता त्यामुळे कोण तोंडाला लागत नव्हते त्याच्या . पण त्यानं मला पण बोलायला सुरवात केली .
" काय काका तुम्ही एव्हडी वर्ष नोकरी करता साधा आयफोन घ्यायची पण लायकी नाही तुमची काय उपयोग तुमचा काम करून माझ्या पापा नी कॅश ओन डिलिव्हरी घेतला फोन मला."
बायको किचन मध्ये काम करत होते . सगळे पुरुष बाहेर हॉल मध्ये बसलमिस्ट .मुलींन तिला जाऊन सांगितले . दादा पापा ना बोलतोय तुमची लायकी आहे का असा फोन घ्याची . बायको ला राग आला .तशी ती पटकन बाहेर आली.
" काय बोलास तु अक्षय यांना आता? तुमची लायकी आहे का आयफोन घ्यायची?."
" असुदे नेहा जाऊदे मुलगा आहे आपला काय कळतंय त्याला .गप्प बस उगीच वाद नको." मी.बायको ला मागे ओढत बोलू लागलो.
" एक मिनिट, काय कळतंय म्हणजे? एक रुपया मिळवायची अक्कल नाही. बापा च्या पैसे वर माज करतो आणी तुम्ही म्हणता जाऊदे?"
तेव्हड्यात भाऊ बोला " नेहा तो बापच्या पैसे वर माज करणार नाही तर काय तुझ्या पैसे ने करेल का?
" करुदे न खुशाल करू दे पण दुसऱ्या ना कमी लेखायचा अधिकार कोणी दिला तुम्हाला? माझे मिस्टर साधे आहेत बोलत नाहीत म्हणजे मी पण साधी आहे असे समजू नका. मी दाखवू का आमचं लायकी?
" नेहा गप्प बस तुझा मोठा दीर आहे तो . माफी माग त्यांची." एवढा वेळ गप्प बसलेले सासू सासरे अचानक बोले.
" का माफी मागू मी? तुमचा लाडका नातू मागापासून तुमच्या मुलाला बोलत होता तेव्हा गप्प बसला होता न आता पण गप्प बसायचं. "
" अक्षय इकडे ये तुला लायकी बघायची आहे न आमची दाखवते. अहो फोन द्या इकडे शेअर मार्केट उघडा."
" स्नेहल जाऊदे त्यांना वाईट वाटेल ."
तुम्ही देताय की नाही " मी थोडा आवाज मोठा केला.
मी शेअर मार्केट ओपन करून पोर्टपोलिओ म्हणजे प्रॉफिट लॉस ओपन केला आणी अक्षय पुढे धरला.
" वाचता येत न वाच किती प्रॉफिट आहे."
अक्षय ने मोबाईल हातात घेतला आणी डोळे मोठे करून बघू लागला.
" वाच न किती आहे ? "
" काकी , ते ...... पंधरा लाख रुपये दाखवतंय"
मी दिरा कडे बघत बोले, " जरा मोठ्या ने बोल नीट ऐकू नाही आले मला. "
" पंधरा लाख रुपये."
" आता आम्ही शेअर्स विकले सगळे तर टॅक्स जाऊन 14 ला रुपये तर येतील त्यामध्ये असले आयफोन चे किती दबडे येतील? (दबडे म्हणजे कोल्हापुरी भाषेत मोकळे डब्बे)
" आता तुझ्या पप्पा ला सांग दाखवायला त्यांच्या कडे किती आहेत सेविंग . "
तेव्हा दीर आणी जाऊबाई दोघे पण गप्प बसले. त्यांनी सगळा पैसा असच खर्च केला होता गाडी कपडे फोन फिरायला पार्टी वगैरे . सेविंग तर नावाला नव्हते. सगळे ब्रँड वापरायच्या नादात त्यांनी आपल्या सोबत मुलाला पण सवय लावली होती.
" अक्षय जास्त नाही 3 लाखाचे जरी शेअर्स विकले तरी आमच्या चौघाना 4 दबडे येतील असले घरी. तु एक घेऊन माज करायला लागला आहेस. "
अक्षय ला काय बोलाव सुचत नव्हते . त्याला वाटत होते होते आमच्याजवळ पैसा नाही . आम्ही महागडे कपडे फोन गाडी घेत नाही .पण त्याला हे नव्हते माहित की आम्ही सगळा पैसा सेविंग केला आहे. एवढा पैसा बघून सासू सासरे चे अचानक मत परिवर्तन झाले . जे आज पर्यंत दीर जाऊबाई च कौतुक् करत होते ते अचानक माझ्या बाजूने झाले.
" मला माहिती होते माझा विजय पैसे खर्च करणार नाही . साठवून ठेवणार . आता घराला थोडे दुरुस्त करायचं आहे आणी आराध्या (जाऊबाई ची मुलगी) ला दागिना करायचा आहे .पोरगी चा गळा मोकळा दिसतोय तर विजय करेल की मदत आपल्या लाडक्या पुतणी साठी". सासूबाई सासरे कडे बघत बोल्या.
" अजिबात एक रुपया मिळणार नाही . पैसा आमचा दोघांचा कष्टा चा आहे तो कसा खर्च करायचा आम्ही ठरवणार . जेवण झाले आहे जेवून घ्या सकाळी निघायचं आहे आम्हाला पुणे ला ?
असे बोलून मी किचन मध्ये गेले. सर्व जेवायला बसलो होतो . सगळे गप्प होते . एरवी जाऊबाई आपले कौतुक सांगायच्या आमच्याकडे एवढा पैसा आहे आम्ही हे घेतले ते घेतले त्या पण गप्प होत्या कदाचित सर्वांना लायकी कळली असेल ...........


0