ईरा म्हणजे काय?

My new Poem.

ईरा म्हणजे काय?


ईरा म्हणजे काय?
सृजन निपजणारी माय,
साहित्यवारी घडवते ती,
नसले जरी पाय.

ईरा म्हणजे नवनिर्मिती,
शब्दअंकुर उपजणारी माती,
जोपासली जातात इथे,
जीवाभावाची नाती.

ईरा हक्काचं माहेर,
गोधडी मायेची ऊबदार,
माहेरपणासम मिळे,
इथे जीवाला आधार.

ईरा जीवाची जिवलग,
काळजातली मैतरीन,
अनोळखी सासुरात,
सोबती जशी पाठराखीण.

ईरा म्हणजे स्वातंत्र्य,
देई स्वतःची ओळख,
वैशाख वणव्यातली,
ती थंड हवेची झुळूक.

ईरा शब्दांचं विद्यापीठ,
इथे भरे साहित्यशाळा,
एका छताखाली झाले,
जणू सारे जग गोळा.

ईरा अटकेपार झेंडा,
अशी पसरली कीर्ती,
जिंकू जग सारे,
मिळे अशी स्फूर्ती.

ईरा झेप घेई मोठी,
जशी गरुड भरारी,
नाव तिचे अल्पावधीत,
चमके क्षितिजावरी.

ईरा म्हणजे साहित्यपर्व,
इथे नाही कसला गर्व,
गुण्यागोविंदाने इथे,
आम्ही राहतो सर्व.

©®सारंग चव्हाण.
कोल्हापूर.