ईरा व्यासपीठ

ईरा व्यासपीठ
ईरा व्यासपीठ

ईरा व्यासपीठ म्हणजे
साहित्य जगतातील सोनेरी पान
छोट्याशा रोपट्याचा होतोय डौलदार वृक्ष
आणि वाढवतोय साहित्यिकांची शान...

ईरा व्यासपीठाचा जयांना
मंगल परिस स्पर्श झाला
काळोखाच्या सरल्या रात्री
अन् जीवनात सुंदर उषःकाल झाला...

इथे चालतात विविध उपक्रम
अन् विविध स्पर्धांची मांदियाळी
लेखक, लेखिका,कवी, कवयित्रींची
चर्चासत्रे आणि मुलाखतींची दिवाळी....

स्नेहसंमेलनाचा सळसळता उत्साह
ईरा मधेच पाहायला मिळतो
अनेक बक्षीसांची होते खैरात
प्रत्येक जण येथे गौरवांकित होतो...

असे हे ईरा व्यासपीठ
तळपत आहे स्वर्णापरी सुंदर
अल्पावधीतच कीर्ती पताकांचा
इंद्रधनु जणू नयन मनोहर...

ईरा तुझ्या यशाची चढती कमान
सदैव आणि सदैव वाढतच राहील
उदात्त स्नेहमय यशोगाथेची मोहर
इतिहासाच्या पानावर उमटली जाईल...

माझे शब्द काळजाच्या आतून उमटलेले
हृदयातल्या सुगंधी,स्नेहमय भावनांचे
हे शब्द गहिवराच्या शाईत डुंबलेले
लिहितानाही भरून आले आभाळ आनंदाश्रूंचे.

सौ. रेखा देशमुख