आज ह्या समृद्ध लेखनाचा प्रवाह ईराला सुरू होऊन चार वर्ष पूर्ण होत आहे...
ही नांदी सुरू झाली आणि एक नव्या प्रवास पर्वाची दिमाखात सुरुवात झाली...
वाटले नव्हते ह्या प्रवासात कितीतरी प्रवासी जोडले जातील आणि ह्या प्रवासाचा असा मनमुराद आनंद घेतील..
ईरा नावाचा हा प्रवास आता एका राजमार्गावरून पुढील टप्प्यात पदार्पण करत आहे..सुखाचा आणि समाधानाचा हा प्रवास सगळ्यांना तृप्त करत आहे...
आपली सर्वांची नाळ आणि मागील जन्माचे पुण्य कर्म असावेत काही ज्याचे फलित म्हणून आपण सगळे ह्या प्रवासात ईरासोबत जोडलो गेलो आहोत...हे ऋणानुबंध जणू खास आहेत...प्रत्येक जण हृदयापासून जोडला गेला आहे तर येणारा नवीन प्रवासी जोडला जात आहे...
आपण आणि ईरा एक सहकुटुंब सह परिवार होत आहोत आणि झालो आहोत, ह्या चार वर्षाच्या कालावधीत किती तरी अनोळखी मंडळी जणू ओळखीची झाली आहेत, जणू अनोळखी नव्हतोच कधी...
ह्या ईरा च्या अंगणात आता मुक्तपणे लिहीत आहोत ,भावना व्यक्त करत आहोत ,नवं नवीन कल्पनांना आपण भरारी देत आहोत ,रंगीबेरंगी पंख जणू घेऊन हरेक उडान घेत आहोत...
किती ही किमया भारी, आज जे काही आपण शिकलो आहोत ते ह्या व्यासपीठाची देण आहे , आणि आपण ही त्या व्यासपीठाचे देणं लागत आहोत...जिथे सगळ्यांना सोबत घेऊन ,सांभाळून, प्रेरणा देत, ह्या ईराने एक आकाश काबीज केले आहे, सगळ्यांचे मन जिंकले आहे, सगळ्यांच्या भावना जणू नेटक्या ओळखल्या आहेत. गुरुदक्षिणा म्हणून आपण उत्कृष्ट अश्या अनेक कथा, कथामालिका, लघुकथा, अलक, ह्यांचा खजिना ह्या इराच्या मंचावर अर्पण करत जात आहोत...जणू देवाच्या पिंडीवर बेल वहावे तसे..
इथे आपली एकच भावना असते, ईरा मुळे आपण आहोत आपली एक ओळख आहे...तसेच ईराच्या ह्या भव्य दिव्या मंचाचे आपण आधार स्तंभ आहोत...खूप लेखक जोडले गेले आहेत अजून ही खूप लेखक जोडले जाणार आहेत...आज चार वर्षे पूर्ण झाले आहेत...अजून ही कित्येक वर्षे पूर्ण होतील...
ह्या सोनेरी क्षणांचे कित्येक वर्षे आपण साक्षीदार असणार आहोत, तितके रोज हे बंध आपले आणि आपल्या ईराचे अजूनच प्रबळ होत जाणार आहेत..
ईरा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
अशीच तू बहरत रहा
अशीच तू फुलत रहा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा