ईरा वार्षिक स्नेहसंमेलन ३.o
धन्यवाद !! धन्यवाद !! ईराचे मनापासून धन्यवाद.
खरं तर आम्ही सर्व जण याच दिवसाची वाट बघत असतो. ईराच्या कुटुंबात एकदा आलेला ईराचा कायमचा होऊन जातो. असेच आम्ही सर्व जण ईरा नावाच्या धाग्यात एकत्र मोती पेरावे तसे पेरले आहोत. रक्ताच्या नात्याच्या पलीकडे जाऊन आम्ही सर्व जण एकत्र येऊन मज्जा मस्ती दंगा घालतो . एकमेकांचे कौतुक करतो.
यंदा ईराचे तिसरे वार्षिक स्नेह संमेलन होते . पहिले पुण्यनगरी पुण्यात मुळशी येथे झाले. दुसरे नाशिक मध्ये झाले आणि यंदाचे कोल्हापूर मध्ये झाले. खूप लांबचा प्रवास करून ईरा चे कुटुंब दोन ते तीन दिवस कोल्हापुरात वसले होते . अस्सल कोल्हापुरी स्टाईल मध्ये मस्त फेटे बांधून सर्व लेखकांनी मिरवले.
दोन दिवसात इतक्या ऍक्टिव्हिटी केल्या कि सांगताना दम भरेल
SJ फार्म हाऊस मध्ये इराचे कुटुंब राहिले होते. अमित सर आणि निधी मॅडम नि आम्हा सर्वांसाठी वेग वेगळे गेम्स घेतले . त्या गेम्स मध्ये लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्वांनी हिरहिरीने भाग घेतला . ग्रुप ऍक्टिव्हिटी असल्यामुळे एकमेकांमध्ये चुरस होती . स्विमिंग पूल मध्ये सुद्धा एकत्र गेम्स खेळलो .रात्रीच्या जेवणा नंतर कपलं गेम्स , ईरा'ज किंग, इराज क्वीन ,ईराज प्रिंसेस च्या स्पर्धा झाल्या . त्यात वेग वेगळे राऊंड्स होते त्यांना मार्क्स दिले जात होते . प्रत्येक जण आपले कौशल्य दाखवत होते . मध्ये मध्ये लहान मुलांचे सुद्धा गेम्स ठेवले होते . त्यात इराच्या बाल कलाकारांनी त्यांचे कला गुण दाखवले. त्या नंतर रात्री बारा वाजता खास मैफिल सुरु झाली. निधी मॅडमनि जवळ जवळ सहा वेग वेगळे राऊड्स अंताक्षरी चे घेतले त्यामध्ये डान्स , गाणी , रिल्स मेकिंग धून राऊड , खेळताना खूप मज्जा आली. इतक्या वेग वेगळ्या रिल्स केल्या . कराओके लावून गाणी म्हटली . कोणी कोणाला जज करत करत नव्हते फक्त आणि फक्त आणि फक्त मज्जा करत करत होतो. ना घराची आठवण आली ना कोणते दुःख आठवले ना कोणती जवाबदारी आठवली. फक्त वर्तमानात आहे त्या क्षणात जगलो.
हल्ली जवाबदारीच्या ओझ्याखाली सर्वच जण मुक्तपणे हसायला विसरतात . दिल तो बच्चा है या उक्ती नुसार आपल्या आत मध्ये दडलेल्या लहान मुलाला अमित सर आणि निधी मॅडम नि बाहेर काढले . दोरी उड्या मारणे, बॉटल गेम्स , बलून गेम्स अशा गोष्टी कित्येक वर्षा नंतर केल्या . कॅट walk , हुक स्टेप वर डान्स करणे अशा अशक्य प्राय गोष्टी सुद्धा बिनधास्त पणे सर्वांनी केल्या. हल्ली एसी ऑफिस मध्ये बसून बसून घाम च येत नाही . पविष्णाने सर्वांना जवळ जवळ १०० गाण्यांच्या हुक स्टेप वर नाचवले आणि आम्ही आम्हांला जमेल तशी ती हुक स्टेप केली आणि घर्मग्रंथी मोकळ्या केल्या . मना बरोबर शरीर पण हलके फुलके झाले
दुसरा दिवस म्हणजे १ जुन २०२५. हा सुवर्ण दिवस कारण संजना मॅडम चे वडील सुरेश काका आणि त्यांचे भाऊ या दोघांचा जन्म दिवस होता. सकाळी आठ वाजताच फेटे वाले काका आले आणि सगळ्यांची वेगळीच धावपळ सुरु झाली . सर्वांनी पटापट अंघोळी केल्या आणि मस्त पारंपरिक ड्रेस म्हणजेच स्त्रियांनी साड्या आणि पुरुषांनी कुर्ते घातले आणि त्यावर मस्त गुलाबी रंगाचा फेटा .. अहा .. एकदम लै भारी दिसत होते सर्व जण
मग अमित सरांनी लिहिलेलं इराचे सॉंग त्यांनी सर्वांना म्हणायला सांगितले . त्या नंतर संवाद सुरु झाला .एका वेळी पाच अश्या प्रकारे सर्व लेखकांना स्टेज वर बोलावून पॉड कास्ट करण्यात आले . लेखकांना अमित सरांनी छान छान प्रश्न विचारून बोलते केले . अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम म्हणजे सर्व साहित्यिक मंडळींना मेजवानीच वाटला.
त्या नंतर बक्षिससमारंभ करण्यात आला. सर्वांना मस्त गिफ्टस , मेडल्स देण्यात आले . ईरा किंग चा मान प्रशांत सरांनी पटकावला तर ईरा क्वीन चा मान ज्येष्ठा ने पटकावला . तर इराचे प्रिन्सेस पविष्णाने मिळवला शिवाय टीम ब्लिस विनर टीम आणि ईरची आन हि टीम अंताक्षरी मध्ये जिकली . यावेळी कॅश प्रायझेस पण होती . हे सर्व डोळ्यांनी बघताना , अनुभवताना खूप मज्जा आली
सगळ्यात महत्वाचे वंदना काकूंनी आणि त्यांच्या बरोबर असलेल्या सर्व समवयस्क लोकांनी सुद्धा सर्वच ऍक्टिव्हिटी मध्ये हिरहिरीने भाग घेतला . वंदना काकू संजना मॅम ला तर करतातच आम्हां सर्वांना पण आईसारखी माया करतात . त्यांच्या हातची बनवलेली चकली इतकी अप्रतिम आहे कि सांगूच नका .
नामदेव सरांनी त्यांच्या हातांनी लिहलेली हस्तलिखित स्टेज वर सर्वत्र लावली होती आणि स्टेज एकदम सुंदर दिसत होता . सुंदर सुबक अक्षरात लिहले ले वैचारिक मोतीच जणू गुंफले होते त्यांनी . तसेच सरांच्या घरची सेंद्रिय केळी ते घेऊन आले होते सर्वांना नाष्ट्या नंतर सेंद्रिय केळ्यांवरहि ताव मारला .
सारिकाने गरम मसाला आणि कडक बुंदीचे लाडु आणले , सविता मॅडम ने तांदळाचे लाडू आणले, निधी मॅडम नि सर्वांना खाकरा खायला दिला . नामदेव सरांनी त्यांच्याकडून स्पेशल चिवडा सर्वांसाठी आणला होता तो संपवला.
बाल ईरा ची मंडळी रुद्र , साई ,पाविषणा , शाश्वती , अथर्व ,यांची धावपळ , पळापळी आणि रडारडी बघताना सुद्धा मज्जा येत होती
एकंदरीत पाहता हा कार्यक्रम नसून हा एक सोहळा आहे . आम्हा सर्व लेखकांचा मान सन्मान , कौतुक सोहळा असतो. संजना मॅम ला या मध्ये त्रिवार धन्यवाद . इराच्या लेखकांना हे सुगीचे दिवस तुम्ही दाखवता . आम्ही जरी त्यांचे कुटुंब असलो तरी त्यांच्या वैयक्तिक कुटूंबाची असलेली अखंड साथ त्यांची ताकद वाढवते . आई, वडील , पती , भाऊ बहीण , मामा , मामी , मावशी, काका सर्वच जण त्यांच्या या आनंदात सहभागी होऊन त्यांनि केलेल्या कामाची दाद त्यांना देतात आणि त्यालाच जोड अमित सर आणि निधी मॅडम सारख्या दिगग्ज मंडळींची साथ या सोहळ्याला चार चाँद लावते .
येताना एकमेकांना भेटण्याची ओढ असते तर जाताना विरहाची सल असते . येताना आनंदाश्रू डोळ्यात पाणी आणतात तर जाताना विरहा चे दुखाश्रु भिजवून जातात . तरीही सर्व इथेच थांबत नाहीत तर त्याच दिवशी पुढचं गेट टुगेदर कुठं करायचं याच नियोजन करायला सुरुवात करतात.. तर अशी इराच्या गेट टुगेदर ची कहाणी संपता संपत नाही . कारण वर्षभर पुरतील एवढ्या आठवणी कॅमेरा मध्ये तर कैद करतोच आम्ही पण मनाच्या कोपऱ्यात पण साठवून ठेवतो .