आरोही आणि आदिती दोघीही ठरवतात की एकमेकींना यापुढे बघायच नाही आणि बोलायच ही नाही पण हे दोघींसाठी थोड अशक्यच होत. आदिती लेस्बियन आहे हे तिने घरच्यांना सांगीतल होत आणि तिच्या आईबाबांनीही तिला स्विकारल होत. एवढच काय तर पुढे तिला तिच्या मर्जीने आयुष्य जगण्याचा अधिकार दिला होता ते कायम तिच्या पाठीशी असतील हे आश्वासनही दिल होत. त्यामुळे आदिती लोक काय म्हणतील हा विचार कधीच करत नव्हती. तिच लाईफ मस्त होत. आपल्या मनाप्रमाणे जगायला आदितीला आवडायच.
आरोहीने घरच्यांना कधीही आपल्याला जे काही वाटत ते सांगीतल नाही तिने लपुन ठेवल होत कारण तिला माहीती होत की जरी अस असेल तर आपली फॅमिली आपल्याला कधीच सपोर्ट करणार नाही. पण हे अस किती दिवस चालणार होत एक ना एक दिवस तर मला सांगावच लागेल घरच्यांना हा विचार आरोही करत होती. तिला या गोष्टीचा त्रास होत होता. तिलाही स्विकाराव आणि मोकळेपणाने जगता याव आपणही कुणावर तरी प्रेम कराव अस तिला मनोमन वाटायच पण दुसर्याच क्षणी तिला तिचे बाबांच रुप आठवायच.
आरोहीला आदिती टाळू लागली होती का ते तिलाच माहीती होत. आरोहीने ही त्यादिवशी आदितीला मित्रासोबत बघितल्याने त्यादिवशी पासुन आरोहीने ही बघण सोडून दिल होत. पण मनाला कोण थांबवणार ती स्वतःला खुप कंट्रोल करायची पण आदिती आली की तिच हृदयाची धडधड वाढायची तिच्या बोलाव वाटायच पण हिम्मतच होत नव्हती. आदिती तिच्यावर रागवलेली आहे ती फुगुन बसली आहे हे आरोहीला जाणवत होत तिच्या इग्नोर करण्यातुन आरोहिला याच वाईट वाटायच की आमची मैत्री होण्याआधीच मी केलेल्या चुकीमुळे आदिती बोलेनाशी झाली याच आरोहीला मनाला खुप लागायच तिच मन कासावीस व्हायच.
आदिती घरी निघाली होती. तिला समोरुन येणारी आरोही दिसली. आदिती तिलाच दूरुन एकटक बघत होती. दोघींची नजरानजर झाल्यावर आदितीने दुसरीकडे लक्ष घातल आरोहीच्या नजरेतुन हे सुटल नाही तीला समजल की आदितीने जाणुनबुझुन आपल्याला टाळल.
" यार मी कितीही हिच्यापासुन दुर जायच ठरवल तरी ही माझ्यासमोर येतेच... तुला नाही सांगू शकत आरू... आणि तु समजुही नाही शकत मला की तु मला किती आवडतेस... आजपर्यंत इतक्या मैत्रीणींसोबत राहते पण अस कूणाबद्दल कधीच वाटल नाही जे तुझ्याबद्दल मला पहील्यांदा पाहिल्यावर जाणवल... आता तर मला सगळीकडे तुच दीसतेस... माहीती नाही काय जादू आहू तुझ्यात... मला वाटत मी तीझ्या प्रेमातु पडले आहे... " मोबाईलच्या रिंगने आदिती भानावर आली नि तिचा इगो मध्ये आला...
" जाऊ दे ना मी का एवढा विचार करते त्या आरूचा ती तशी नसेलही आणि हो ति त्यादिवशी मला खुप बोलली... असु दे मलाही तिला राग आलाय.... " आदिती तिथुन निघून जाते. आरोही मात्र वेड्यासारखी ती कुठे गेली साॅरी बोलण्यासाठी हे शोधत असते... ती निघून गेली. आरोही तिला आजही साॅरी नाही म्हणु शकली याच वाईट वाटल.
आरोहीचे लास्ट इयरचे पेपर सुरु होणार होते त्यामुळे ती स्टडीमुळे बिझी होती. आदितीला आरोही दिसतच नव्हती आणि त्यांची भेटही होत नव्हती. आरोहीही स्टडीमुळे सगळ विसरली होती.
दुपारची वेळ होती. आरोही अभ्यास करत बसली होती. तिच्या शेजारी राहणारी मैत्रीण अन्वयी आली.
" आरू माझ्यासोबत चल ना... थोड काम होत देशपांडे आहेत ना आईने त्या काकुंकडे जायला लावल... तु चल ना प्लिज सोबत फक्त टिफीन द्यायचा आणि लगेच निघायच आहे प्लिज हा नाही म्हणू नको... "
" ये जा ग बाई, अनु तुझ काय मला स्टडी आहे
मी नाही येत आई आली की बोलेल मला आणि हो मला खुप काम आहेत... " , आरोही.
" यार अनु, यायच नाही तर ते सांग ना कश्याला खोटी कारण सांगतेस... ", अन्वयी एवढस तोंड करुन जायला निघाली, तशी आरोही तिला थांबवते.
" यार अनु तोंड फुगवू नको रूसू बाई कुठली,
चल येते सोबत पण हा आधीच सांगते मला परत घरी लवकर आणुन सोड " , आरोही.
तशी आरोही हसते, आरू मला माहीती होत मी थोडस रागवले की तु लगेच माझ्यासोबत येणार
अन्वयी अस म्हटल्यावर आरोही तिला पाठीत हळुच मारते नि म्हणते...
अन्वयी अस म्हटल्यावर आरोही तिला पाठीत हळुच मारते नि म्हणते...
" म्हणजे नाटके तु खरच रागवली नव्हतीस तर "
" नाही आरू तुझ्यावर कोण बर रागवेल " , अन्वयी.
" हा बास मस्का मारण तुझ चल गाडी स्टार्ट कर पटकन जाउन येऊ तुझ काम करु " , आरोही
अन्वयी आणि आरोही एका बंगल्याजवळ गाडी पार्क करतात... खुप मोठा बंगला होता.
इतक मोठ घर, सगळ हायफाय, बाहेर खुप मोठ गार्डन, फुलझाडे, गाड्यांसाठी पार्कींग प्रशस्त
आणि त्यात पार्क केलेल्या महागड्या फोर व्हिलर
ति सगळ बघत होती... आरोही सगळ वैभव आज पहील्यांदा बघत होती. बघत बघत ती अनुसोबत आत गेली. आत गेल्यावर मिसेस देशपांडे होत्या. त्यांनी अन्वयी आणि आरोहिच छान स्वागत केल.
अन्वयीने तिच्या आईने दिलेला टिफीन त्यांना दिला आणि अन्वयी म्हणाली,
" काकु आज वेळ नाही आहे येतो आम्ही "
" ये अनु , अस कस हे बरोबर नाही हा आताच आल्या तुम्ही दोघी आणि लगेच निघाल्या... मी बर तुम्हांला काहि घेतल्याशिवाय जाऊ देईल आणि हो मी सारीकाला सांगेल हा... " त्यांनी आग्रह केल्यावर अन्वयी थांबली...
अन्वयीची आई सारिका आणि निकीता देशपांडे या दोघी खुप जवळच्या मैत्रीणी होत्या. त्यांनी दोघींना ही नाश्ता करायला लावला.
आरोहीला वरच्या खोलीतुन मोठ्या आवाजात गाण्याचे सुर ऐकू येऊ लागले... कोण बर गाण म्हणत असेल... छान आहे की आवाज...
गाण पण छान आहे... आरोहीचे कान तिकडे होते ती त्या गाण्यात हरवली होती...
तुझे ना देखूं तो चैन मुझे आता नहीं है
एक तेरे सिवा कोई और मुझे भाता नहीं है
तुझे ना देखूं तो चैन मुझे आता नहीं है
एक तेरे सिवा कोई और मुझे भाता नहीं है
कही मुझे प्यार हुआ तो नहीं है
कही मुझे प्यार हुआ तो नहीं है
दिल होके जुदा तुझसे रह पाता नहीं है
कोई भी मेरे दिल को समझाता नहीं है
कही मुझे प्यार हुआ तो नहीं है
कही मुझे प्यार हुआ तो नहीं है
तुझे ना देखूं तो चैन मुझे आता नहीं है
एक तेरे सिवा कोई और मुझे भाता नहीं है
एक तेरे सिवा कोई और मुझे भाता नहीं है
तुझे ना देखूं तो चैन मुझे आता नहीं है
एक तेरे सिवा कोई और मुझे भाता नहीं है
कही मुझे प्यार हुआ तो नहीं है
कही मुझे प्यार हुआ तो नहीं है
दिल होके जुदा तुझसे रह पाता नहीं है
कोई भी मेरे दिल को समझाता नहीं है
कही मुझे प्यार हुआ तो नहीं है
कही मुझे प्यार हुआ तो नहीं है
तुझे ना देखूं तो चैन मुझे आता नहीं है
एक तेरे सिवा कोई और मुझे भाता नहीं है
आदितीला खाली कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज ऐकु येत होता... पण तिच गाण्याकडे दुर्लक्ष झाल्याने ती थांबली...
देशपांडे काकु दोघींशी थोड्या गप्पा मारत होत्या. त्यांनी अन्वयीला म्हटल,
" अनु , जा बाई तुझ्या मैत्रिणीला नाश्ता देऊन ये नाहीतर तुला म्हणेल, मला एकटीला सोडून तु खाल्ल म्हणून " तस अन्वयी आणि आरोही दोघीही हसायला लागल्या...
" हो तिच काही खर नाही बघा ती म्हणेलच मला या मी तिला वरती देऊन येते... " , अन्वयीने प्लेट घेतली हातात नि ती वरती द्यायला जाणार तिचा फोन वाजला... तिने आरोहिला सांगितल की वरती काकुंची मुलगी आहे तिला हे देउन ये आणि अन्वयी फोनवर बोलायला बाहेर गेली...
आरोही घाबरतच वरती गेली एकतर त्यांच्या ईथे ती पहील्यांदा गेली होती नाहीतर आरोही कुणाच्याही इथे सहसा जात नव्हती म्हणून तिला अन्वयीचा रागच आला होता. ति दारात पोहचते...
दार ओपनच होत... तिने आत येऊ का विचारल...
दार ओपनच होत... तिने आत येऊ का विचारल...
तो आवाज तिला ओळखीचा वाटला म्हणुन पटकन तिने आवाजाच्या दिशेने पाहिल नि म्हटल,
" तु इथे कशी ? " , आदितीने आरोहीला मोठ्या आवाजात विचारल... तशी आरोही घाबरली. तिला आदितीला पाहून काय व्हायच माहीती नाही पण तिची बोलतीच बंद व्हायची आणि ती तिच्या डोळ्यांत हरवुन जायची आजही तेच झाल. आदितीने पुन्हा तेच विचारल्यावर मात्र ती गोंधळली... ते मी तिच त त प प सुरू झाल होत.
आरोहीने घाबरतच म्हटल,
" ते अनुने मला हि प्लेट तुम्हांला देऊन ये म्हटल म्हणुन मी आले... साॅरी " , तिने वरती नजर वर करुन पाहिलच नाही... आदिती मात्र तिची मजा घेत होती. ती तिच्यावर रागवली आहे असच दाखवत होती पण खरतर आरूला अस समोर बघुन ती विरघळली होती तिचा राग केव्हाच पळुन गेला होता... आदिती मात्र तिला पहिल्यांदा इतक्या जवळून पाहत होती. पण ती स्वतःच्या भावनांना कंट्रोलमध्ये ठेवत होती कारण तिला आरोही तशी असेल की नाही हे माहीती नव्हत पण आदितीला आरोही खुप आवडत होती. पण आदितीला पुन्हा आरोहीच त्यादिवशीच बोलण आठवल आणि तिचा मुड खराब झाला. परत तिने तोंड फुगवल.
" यार हीच घर आहे तर हे, आदितीला समोर बघून आरोहिही शाॅक झाली. यार मला हिची माफी मागायची आहे पण आदिती किती खडूसपणे माझ्याशी वागत आहे असो... मलाही आजकाल आदिती आवडू लागली आहे पण मी तिला हे सांगुही शकत नाही. ती तशी नसेल तर याचा त्रास मलाच होईल त्यापेक्षा कुणातच गुंतायच नाही आहे तस आयुष्य जगायच आपल... आरोही पुढे काही बोलायला जाणार तेवढ्यात अन्वयीने हाक मारली तशी आरोही परत माघारी फिरली...
" थांब आरू , मला तुझ्याशी बोलायच आहे "
खरतर इतक प्रेमाने हाक मारल्यावर आरोही थांबली.
खरतर इतक प्रेमाने हाक मारल्यावर आरोही थांबली.
" मलाही तुम्हांला बोलायचय " , आरोही
तेवढ्यात अन्वयी तिथे आल्याने दोघीही काहीच बोलू शकल्या नाहीत. थोडस बोलून आदितीला अन्वयी आरोहीला घेउन निघाली... जाणार्या आरोहीकडे आदिती बघतच राहीली.
क्रमशः
दोघींना काय बोलायच असेल ? आपल्या मनातील प्रेम त्या बोलुन दाखवतील का ? पुढे त्यांचा प्रवास कसा असेल ? त्यासाठी पुढील भाग वाचा.