आईचा काळ बायकोचा मवाळ भाग -1

कौटुंबिक
भाग -1

आईचा काळ बायकोचा मवाळ - आई कडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा.

" अगं आई गं.. आई.. " गीता काकू विवळत होत्या. त्यांना पायाच दुखणं असह्य होत होतं.

गीता काकू घरात एकट्या होत्या, " नाही रे देवा हे दुखणं सहन होत आता. " त्यांनी उठून कपाटातून बाम काढला आणि पायाला चोळला.

गीता काकू ह्या त्यांच्या मुला सोबत आणि सुने सोबत राहत होत्या.

त्यांनी अनेकदा राजेश ला म्हणजे त्यांच्या मुलाला पायाच्या दुखण्याबद्दल सांगितलं होतं. पण त्याने दुर्लक्ष केलं होतं, कामाच्या नादात त्याच्या लक्षात ही येतं नव्हतं.

आज राजेश आणि त्याची बायको मीना दोघंही बाहेर हॉटेल मध्ये जेवायला गेले होते. मीना ने स्वयंपाक गीता काकूंसाठी करून ठेवला होता.

पण उठून स्वतः खायला गीता काकूंना आज होतं नव्हतं.
तेवढ्यात गीता काकूंचा फोन वाजतो, जमिनीवरून सरकत सरकत गीता काकूंनी फोन घेतला.

फोन वर गीता काकूंची मुलगी अपर्णा असते, अपर्णा दिवसांतून एकदा तरी गीता काकूंच्या खुशाली साठी फोन करते.

गीता काकू फोन घेतात, " हॅल्लो.. " काकूंचा आवाज ऐकून अपर्णा घाबरते.

" अगं आई काय झालं ? आवाज का असा येतो आहे ? तु बरी आहेस ना ? " गीता घडाघडा काकूंना विचारते.
पण आईचा आवाज ऐकून तिला काळजी वाटते.

" अगं काय सांगु तुला, माझ्या पायाचं दुखणं खुप असह्य झालंय आता. खुप पाय दुखत आहेत , चालु ही शकत नाही. तरी पायाला मि बाम चोळला, पाहू काय फरक पडतो का ते. " गीता काकू अपर्णाला बोलतात. अपर्णाला काकूंची म्हणजेच आईची खुप काळजी वाटते.

" अगं मग राजेशला सांग की डॉक्टर कडे घेऊन जायला. " अपर्णा बोलते.

गीता काकू अपर्णा पासुन लपवतात, " अगं मि सांगितलंय तो म्हणाला उद्या लवकर ऑफिसमधुन सुटून तुला डॉक्टरकडे घेऊन जाईन करून. " आणि गीता काकू घड्याळात पाहतात. रात्रीचे दहा वाजलेले असतात.

" अगं मग आता घेऊन जायला सांग की ? "अपर्णा बोलते.
गीता काकू अपर्णाची समजुत घालतात.

" थांब मीच करते त्याला फोन, नाही तर तु दे फोन त्याला मि बोलते त्याच्याशी. " आणि अपर्णा गीता काकूंना राजेशला फोन द्यायला सांगतात.

" अगं तोह कामात आहे, उद्या नक्की घेऊन जाईल की. "गीता काकू बोलतात.

तेवढ्यात दरवाजावरची बेल वाजते, " बरं दारात कोणी आलं आहे मि पाहते आपण उद्या बोलू. " असं बोलुन काकूंनी फोन कट केला.

गीता काकू कशा बशा उठतात, दारावर पुन्हा बेल वाजते, " आले आले.. " गीता काकू आतुन बोलतात.

आणि दरवाजा खोलतात, दारावर राजेश आणि मीना असतात. राजेश वैतागून, " अगं आई किती वेळ दार उघडायला ? किती बेल वाजवले ?" राजेश वैतागत बोलतो.

राजेश आणि मीना आत येतात, राजेश एका बाजूला पायातले शुज उडवतो आणि सोफ्यावर पसरून बसतो.

मीना फ्रेश होऊन स्वयंपाक घरात जाते, तिला सर्व जेवण तसंच दिसत. ती झाकण काढून एक एक भांड उघडून पाहते, " अहो आई तुम्ही जेवलात नाही ? " मीना विचारते.

" अगं ते... भूक नव्हती..! म्हणुन. " गीता काकू मीनाला बोलतात.

" अहो आई जर जेवायचंच नव्हतं तर मग बनवायला का सांगितलात ? " मीना राहिलेलं जेवण पाहुन गीता काकूंवर भडकते.

पण ती हे नाही विचारत की काय झालं ?

मीना राजेशला जेवण दाखवते, " अगं आई नव्हतं जेवायचं तर सांगायचं होतं ना."

" आता उद्या शीळ पाकं खावं लागणार, शी बाई. " मीना नाक मुरडते.

शेवटी गीता काकू नाईलाजाने बोलतात, " मि खाईन उद्या, तु वाढ मला उद्या. " आणि गीता काकू एका जागी पायाचं दुखणं घेऊन बसुन असतात.

गीता काकू राजेश जवळ जातात, राजेश बेडरूम मध्ये झोपलेला असतो.

" अरे राजेश बाळा.. राजेश.. " गीता काकूंच्या तोंडातून दुखण्यामुळे आवाजच निघत नसतो.

" काय गं आई..? " राजेश वैतागलेल्या स्वरात.

" अरे मला डॉक्टर कडे घेऊन जाशील का उद्या ? माझ्या पायाचं दुखणं खुप वाढल आहे. बाम लावून पण आराम नाही ये. " गीता काकू हक्काने नाही तर विनवणी करतात.

" अगं आई तु बाम लावलायस ना ? मग होईल की बरं उद्या. त्यात डॉक्टर कडे कशाला जायला हवं ? आणि तसं ही उद्या महत्वाची मिटिंग आहे, कदाचित नाही जमणार. " राजेश कारणे देत होता.

क्रमश..

🎭 Series Post

View all