Login

यात माझा काय दोष

Physical Issues are not in our hand

यात माझा काय दोष

लग्नाला चार वर्ष झाली होती,पण अजुनही समीर आणि साक्षीला मूल नव्हते ,ब-याच डॉक्टरकडे ट्रिटमेंट केली ,पण यश येत नव्हते ,असच कुणीतरी सांगितलं आणि चेंबूरला एका डॉक्टरकडे ट्रिटमेंट सुरु केली ,तिला पिसिओडीचा प्रोब्लेम होता,त्यामुळे डॉक्टरांनी लाप्रोस्कोपी करावी लागेल, असं सांगितलं . लाप्रोस्कोपी करण्यासाठी डॉक्टरांनी सुट्टीचा दिवस  बघून तारीख दिली होती,शुक्रवारी रात्री तिला ऐडमिट होण्यासाठी जावे लागणार होते.

गुरुवारी रात्री ती समीरला म्हणाली-हॉस्पिटलमध्ये मावशीला बरोबर घेऊन जाते .

समीर- कशाला करु आपण मैनेज

साक्षी-अरे पण,कुणीतरी हवं ना बरोबर 

समीर-मी येईल सकाळी 

साक्षी -जास्त काही न बोलता ठिक आहे म्हणाली

तिची नणंद त्यांच्या कडे नवरा त्रास देतो,म्हणून काही दिवसांसाठी रहायला आली होती,मग तिने विचार केला ,कदाचित तो त्यांना घेऊन जा ,असं म्हणेल.

शुक्रवारी ती पवईला ऑफिसच्या कामासाठी गेली होती ,तिकडून यायला तिला सात वाजले होते ,आल्यावर तिने तोंड हातपाय धुतले आणि किचनमधे गेली.

दोघींनी मिळून भाकरी केल्या ,सगळ्यांच जेवून झाल्यावर त्यांनी सगळं आवरलं,तिने एक बैग भरली ,त्यात पांघरायला चादर आणि एक ड्रेस टाकला ,तिने पर्स घेतली आणि हॉल मध्ये आली.

साक्षी -मी निघते ,म्हणजे दहा वाजे पर्यंत पोहोचेल.

नणंद-मी येते तुझ्याबरोबर,एकटिच कुठे जाते .

समीर- अगं कशाला ,तिच्यात प्रोब्लेम आहे,तिचं ती बघून घेईल ,काय करायचं ते 

समीरच हे बोलणं ऐकून ती परत आत गेली ,ड्रॉवर मधून चेक बुक घेतले ,पर्स मध्ये टाकले ,निघताना समीरला विचारले,सकाळी किती वाजता याल .नणंदेचा जीव वर खाली होत होता ,पण ती त्याच्या पुढे जाऊ शकत नव्हती ,कारण ती त्याच्याकडे आश्रित होती.

त्याने काहिच उत्तर दिलं नाही,ती न बोलता तिथून बाहेर पडली, तिला दहा मिनीटात बस मिळाली ,बस मध्ये बसली आणि मघाचे समीरच बोलणं आठवून डोळयात पाणी तरळलं.

स्टॉप आल्यावर उतरून हॉस्पिटल मध्ये गेली ,फाईल दाखवली ,ऐडमिट होण्यासाठी चेक दिला .

तिला  रिसेप्शनला विचारलं - तुमच्या बरोबर कुणी नाही आलं 

साक्षी- नाही ,मिस्टर बाहेर गावी गेले आहेत ,ते पहाटे घरी येतील ,मग सकाळी ऑपरेशनच्या आधी येतील.

सिस्टर सगळ्या फॉर्मलीटी पूर्ण करतात आणि नंतर तिला तिची रूम दाखवतात.

ती समीरला तिचं कर्तव्य म्हणून,मेसेज पाठवते ,पोहोचले .

त्यावर त्याचा काही फोन किंवा रिप्लाय येत नाही .

ती आणलेली चादर घेऊन बेडवर झोपते,पण मनात इतकं विचारांच वादळ असतं की ,झोप सुध्दा येत नाही .

ती विचार करते ,माझ्यात जो शारिरीक दोष आहे ,त्यात माझा काय दोष आहे ,किती छान झाले असते ना ,जर प्रत्येकाला आपल्या शरीरात जाऊन दोष शोधता आला असता ,मग कुणी आजारी पडलेच नसते आणि जर हा दोष त्याच्यात असता ,तर मी अशी वागली असते का ,त्याच्या बोलण्यावरून तो येईल का नाही ,ते पण माहित नाही ,तो असं वागतोय ,जसं मूल फक्त एकटीलाच हवं आहे ,आतापर्यंत कधीही त्याने मला मानसिक आधार दिला नाही ,कधी कधी तर असं वाटतं,त्याच माझ्यावर प्रेमच नाही,असं वाटतं का राहत आहे आपण अशा माणसाबद्दल ,आईवडीलांना सगळं सांगावस वाटतं,पण आधीच त्यांना काय कमी टेन्शन आहे का ,त्यात आपण अजून भर घालायची ,माहित नाही उद्या सकाळी पण येणार आहे की नाही,असं विचार करत करत तिला झोप लागली.

सकाळी सहा वाजता मावशी आल्या ,त्यांनी तिला एनिमा दिला ,पोट साफ झाले ,मग त्यांनी तिला ऑपरेशनचा गाऊन दिला आणि सिस्टरने येऊन सलाईन लावले ,आठ वाजता डॉक्टर आले ,तरी समीर आला नव्हता ,सिस्टरने विचारले ,मिस्टर नाही आले.

साक्षी -येत आहेत ,रस्त्यात असतील 

सिस्टर-ऑपरेशन थिएटर मध्ये जायचे आहे 

साक्षी त्यांच्या बरोबर जाते ,डॉक्टर ऑपरेशन थिएटर मध्ये असतात.

डॉक्टर-तुझ्या मिस्टरांची साइन हवी होती फॉर्म वर 

साक्षी-येत आहेत ,पण माझी चालत असेल तर मी करते ,तुम्ही सुरु करा ऑपरेशन 

डॉक्टर-सिस्टर पेपर आणा 

साक्षी सही करते आणि झोपते 

डॉक्टर-तू खूप स्ट्रॉंग आहे ,असं काही काही डॉक्टर बोलत असतात आणि तिला भूल चढायला सुरुवात होते.

नंतर जेव्हा तिचे डोळे उघडतात ,तोंडाला पूर्ण कोरड पडलेली असते आणि ती रूम मध्ये असते ,शेजारी तिच्या मोठ्या जाऊबाई बसलेल्या असतात .

जाऊबाई-कसं वाटतयं 

साक्षी-ठिक आहे,पण तुम्ही कशा काय आल्या 

जाऊबाई-समीरने फोन केला होता,मला आधी सांगितलं असतं,तर रात्रीच आले असते .

तितक्यात समीर औषधं घेऊन येतो,ती काहीच बोलत नाही.

जाऊबाई- कधी सोडणार आहेत

समीर-दुपारी ,मी तुम्हाला टैक्सी करुन देतो,हिला घरी सोडा आणि तुम्ही घरी जा ,मला ऑफिसची एक मिटींग आहे इकडचं 

जाऊबाई-चालेल 

दुपारी डिस्चार्ज मिळाल्यावर ती आणि जाऊबाई घरी ,समीर मिटींगला गेला ,पण साक्षीला मात्र ,हा प्रश्न सारखा भेडसावत होता की,माझ्यात जो शारीरिक दोष आहे, यात माझा काय दोष .

कथा आवडली असेल तर नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या .

रुपाली थोरात 

0

🎭 Series Post

View all