उन्हातून आली म्हणून मालतीने तिला माठातलं गार पाणी दिलं.
कथा: सहानुभूती
शेजारच्या मोहनकडे आईला बघून विशाल चकितच झाला. त्याने ताबडतोब बायकोला बोलावलं आणि म्हणाला,
"आई काल संध्याकाळीच गावी जायला निघालेली ना? मग हिकडे काय करतेय?"
"अहो तुम्हाला भास झाला असेल, आई तिकडे कश्या असतील?"
"मी खरंच पाहिलं आईला, हवं तर तू डोकावून बघ.."
निशाने मोहनच्या घरी डोकावून पाहिलं आणि बघतो तर सासूबाई खरंच त्याच्याकडे थांबलेल्या. दोघेही तडक आत गेले आणि आईला म्हणाले,
"अगं आई तू इकडे काय करतेय? काल संध्याकाळी तर गावी निघालेली ना?"
"म्हणून मी सांगत होते सासूबाईंना बसमध्ये नीट बसवून या.. नेहमीप्रमाणे गोंधळल्या असणार आणि परत येऊन घर चुकल्या असणार, पण मोहन भाऊजी किमान तुम्ही तरी आम्हाला सांगायचं. आमच्या घरी सोडून आई तुमच्याकडे काय करताय?"
हे सगळं ऐकून मोहन चिडला,
"सख्ख्या आईला तुम्ही असं वाऱ्यावर सोडतात? विशालभाऊ अहो जन्म दिलाय त्यांनी तुम्हाला आणि तुम्ही...??"
"मी? मी काय केलंय?" विशालला समजतच नव्हतं काय सुरू आहे ते..
"मावशींनी मला सगळं सांगितलं.. कसं तुम्ही आणि वहिनी मिळून त्यांचा छळ करता ते.. तुम्हाला त्या नको आहेत म्हणून गावी काढायला निघाले तुम्ही त्यांना.."
"अरे मोहन काय बडबड करतोयस... अश्यातलं..." विशाल बोलत असताना निशाने मधेच त्याला थांबवलं आणि म्हणाली,
"ऐका.. सांगून उपयोग नाही.. आपण जाऊयात.."
"पण आई..."
"त्याही ऐकणार नाहीत.. या तुम्ही"
विशाल डोकं चोळत घरी गेला. निशा त्याला म्हणाली,
"हे बघा, आता बिल्डिंगमध्ये नवीन तमाशा नको.. आईंना त्याच्याकडे राहायची हौस आहे ना? राहुदेत.. भाऊजींची हौस होऊन जाऊद्या एकदाची. असंही त्यांची बायको वृंदा माहेरी गेलीये दोन दिवस.. आई त्याला खाऊ पिऊ घालतील आणि वृंदा परत आली की घालेल सासूबाईंची समजूत.."
पूर्ण वाचा लिंकवर
https://irablogging.com/blog/pity_41468
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा