रविवारचा दिवस होता.
दुपारचे दोन वाजले होते.
मुलगा अरुण आणि त्याची बायको नेहा यांच्या खोलीतून भांडणाचा आवाज येत होता.
जमुनाताईंचे मन काळजीने थरथरत होते. त्या सतत खोलीकडे पाहत होत्या, पण आवाज थांबेना. शेवटी धाडस करून त्यांनी दारावर ठकठक केलं.
जमुनाताईंचे मन काळजीने थरथरत होते. त्या सतत खोलीकडे पाहत होत्या, पण आवाज थांबेना. शेवटी धाडस करून त्यांनी दारावर ठकठक केलं.
काही क्षण शांतता...
पुन्हा धाडधाड आवाज!
दार मात्र अजूनही बंद.
पुन्हा धाडधाड आवाज!
दार मात्र अजूनही बंद.
घरातलं वातावरण थंड-ओशट झालं होतं.
तेवढ्यात मागून आवाज आला –
"आई..."
जमुनाताईंनी मागे वळून पाहिलं. त्यांची सोळा वर्षांची मुलगी— विधी, डोळ्यात अश्रू घेऊन समोर उभी होती. ती धावत येऊन आईला कवटाळली.
"आई..."
जमुनाताईंनी मागे वळून पाहिलं. त्यांची सोळा वर्षांची मुलगी— विधी, डोळ्यात अश्रू घेऊन समोर उभी होती. ती धावत येऊन आईला कवटाळली.
"आई, मला भीती वाटतेय..."
जमुनाताईंनी तिला थोपटत धीर दिला आणि पुन्हा एकदा दाराशी गेल्या.
जमुनाताईंनी तिला थोपटत धीर दिला आणि पुन्हा एकदा दाराशी गेल्या.
यावेळी दार उघडला. अरुण तावातावाने बाहेर आला, काही ना बोलता सोफ्यावर येऊन बसला. त्याच्या मागोमाग जमुनाताई हळूच आल्या.
"अरुण, काय झालं बाळा? तुम्ही भांडत होतात? सगळं ठीक आहे ना?"
जमुनाताई कुजबुजल्या.
जमुनाताई कुजबुजल्या.
पण अरुण डोक्यावर हात ठेवून बसला आणि काही बोलला नाही.
जमुनाताई सुनेशी बोलायला गेल्या. त्या खोलीच्या दाराशी पोहोचणार तेवढ्यात नेहा धडधडत बाहेर आली. हातात मोठी बॅग होती.
"अगं नेहा , कुठे चालली आहेस बॅग घेऊन?" – जमुनाताईंने थिजून विचारले.
"बस्स! आता नाही राहायचं मला इथे. मी माझ्या माहेरी चालले."
नेहा ओरडत म्हणाली.
नेहा ओरडत म्हणाली.
"पण काय झालं? बोलून तर बघ. समस्या न सांगता कशी सुटणार? आणि असं आपलं घर सोडून जाणं बरोबर नाही ग. तू आमच्या घरची सून आहेस."
जमुनाताई शांतपणे तिला समजावत म्हणाल्या.
जमुनाताई शांतपणे तिला समजावत म्हणाल्या.
पण नेहा नाही थांबली.तिने त्यांचा हात झटकला. रागाने बाहेर निघाली.
जमुनाताई तिच्यामागे धावत गेल्या, बाहेर इतकं ओरडा ऐकून गर्दी जमली होती—शेजारचे लोक बाहेर येऊन बघत होते.घराचा तमाशा झाला होता.
जमुनाताई तिच्यामागे धावत गेल्या, बाहेर इतकं ओरडा ऐकून गर्दी जमली होती—शेजारचे लोक बाहेर येऊन बघत होते.घराचा तमाशा झाला होता.
जमुनाताईंना अंगावर काटा आला.आणि डोळ्यात पाणी.
त्या धावत परत हॉलमध्ये आल्या.
"अरुण, काहीतरी कर! लोक जमलेत बाहेर... आपल्या घराची इज्जत आहे ती ! का गप्प बसला ?"
अरुण थंड स्वरात म्हणाला—
"आई, तिला जायचंय तर जाऊ दे . अशी बायको करून काय उपयोग?"
"आई, तिला जायचंय तर जाऊ दे . अशी बायको करून काय उपयोग?"
"असं बोलू नको रे. ती तुझी बायको आहे, तिला समजावून सांग," – जमुनाताई म्हणाल्या.
"काय करू? ती काय म्हणतीये बघ– 'तुझ्या आई-बहिणीला सोड किंवा मला!’ मी काय निवडू?"
इतकं बोलून अरुण परत खोलीत निघून गेला.
इतकं बोलून अरुण परत खोलीत निघून गेला.
जमुनाताई कधी दाराकडे तर कधी अरुणकडे... गुंतलेल्या मनाने त्या थडकल्या.
तेवढ्यात रिक्शा थांबली आणि नेहा आपली बॅग घेऊन निघून गेली.
जमुनाताई गेटवरच बसल्या... त्यांच्या विचारांचा अंधार पसरला.
तेवढ्यात रिक्शा थांबली आणि नेहा आपली बॅग घेऊन निघून गेली.
जमुनाताई गेटवरच बसल्या... त्यांच्या विचारांचा अंधार पसरला.
दोन महिनेच झाले होते लग्नाला.
जमुनाताईंना वाटलं होतं,
"सून घरात आली म्हणजे घरात ऊब येईल. घर गजबजेल..."
पण सुख कुठे? उलट युद्धभूमी झाली.
जमुनाताईंना वाटलं होतं,
"सून घरात आली म्हणजे घरात ऊब येईल. घर गजबजेल..."
पण सुख कुठे? उलट युद्धभूमी झाली.
नेहा छोट्या-छोट्या गोष्टीवरुन चिडायची. त्यादिवशी कुलदेवीला जायला सहा वाजता उठवलं, तेही तिला रुचलं नाही...किती जोरात ओरडली होती त्यादिवशी.
नेहाच्या आईला वाटतं होतं -
"जमुनाताई नेहाला त्रास देतात.”
"जमुनाताई नेहाला त्रास देतात.”
जमुनाताईंनी जणू बोलणं बंद केलं होतं.
तरीही भांडण थांबत नव्हतं.
नेहाला जाऊन एक तास झाला होता. तेवढ्यात जमुनाताईंना कॉल आला . नेहाच्या आईचा कॉल होता.
जमुनाताईंनी कॉल उचलला नाही.
दुसऱ्यांदा पुन्हा कॉल .
त्या अरुणच्या खोलीत येऊन म्हणाल्या—
" बाळा, तुझ्या सासूंचा फोन आहे, काय बोलू?"
दुसऱ्यांदा पुन्हा कॉल .
त्या अरुणच्या खोलीत येऊन म्हणाल्या—
" बाळा, तुझ्या सासूंचा फोन आहे, काय बोलू?"
अरुणने कॉल उचलला.
समोरून आवाज आला –
"तुम्ही असं काय बोलला की नेहा माहेरी निघून आली आणि काही ना सांगता नुसतीच रडते ? आम्ही येतोय, तिथेच!"
समोरून आवाज आला –
"तुम्ही असं काय बोलला की नेहा माहेरी निघून आली आणि काही ना सांगता नुसतीच रडते ? आम्ही येतोय, तिथेच!"
अरुणने शांतपणे फोन ठेवला.
थोड्याच वेळात नेहा, तिचे आई-वडील आणि मामा आले.
नेहाची आई जोरजोरात भांडू लागली.
पण नेहाचे वडील आणि मामा शांत... निरीक्षण करत होते .
काही वेळानंतर मामा म्हणाले—
"अरुण, हे सगळं खेळ नाहीये. लग्न निभवावं लागतं. समस्या दोघांचीही आहे."
"अरुण, हे सगळं खेळ नाहीये. लग्न निभवावं लागतं. समस्या दोघांचीही आहे."
अरुण म्हणाला—
"मी एकुलता एक मुलगा आहे. बाबा गेल्यापासून आईनी आम्हाला दोघांना मोठा केलंय. इतके कष्ट केले.
आणि नेहा मला म्हणतीये की आई आणि विधीसोबत नाही राहणार.
आई आणि विधी माझी जबाबदारी आहे. मी त्यांना नाही सोडू शकत "

तेव्हा नेहाची आई म्हणाली—
"माझी मुलगी अशीच रडत राहील का?"
"माझी मुलगी अशीच रडत राहील का?"
मामा म्हणाले—
"नेहा, तूच चुकतेस. आई म्हणते म्हणून उगीच घर बिघडवायचं? लग्नाआधी सांगितलं असतं ना की तुला सगळ्यांसोबत नाही राहायचं तेव्हाच काहीतरी पर्याय शोधला असता."
"नेहा, तूच चुकतेस. आई म्हणते म्हणून उगीच घर बिघडवायचं? लग्नाआधी सांगितलं असतं ना की तुला सगळ्यांसोबत नाही राहायचं तेव्हाच काहीतरी पर्याय शोधला असता."
नेहाचे बाबा म्हणाले –
"जर तुला वेगळं राहायचं असेल, तर साधं कर – अरुणसोबत भाड्याचा घरात राहिला जा.
पण जमुनाताई आणि विधी हे घर सोडणार नाहीत. आणि अरुण पण आपली अर्धी सॅलरी आईकडे देणार ."
"जर तुला वेगळं राहायचं असेल, तर साधं कर – अरुणसोबत भाड्याचा घरात राहिला जा.
पण जमुनाताई आणि विधी हे घर सोडणार नाहीत. आणि अरुण पण आपली अर्धी सॅलरी आईकडे देणार ."
नेहा अचानक घाबरली.कारण तिला छोट्या घरात नव्हतं जायचं.तिला आरामाची सवय झाली होती.
नेहाची आई म्हणाली —" असं कसं??माझी नेहा का घर सोडून जाईल??"
नेहाचे बाबा म्हणाले —" कारण हे घर जमुनाताईंचं आहे, त्या कुठे जाणार नाही.
विसरू नको, आपल्या घरी पण सून आहे. जर ती अशी वागली तर?? "
विसरू नको, आपल्या घरी पण सून आहे. जर ती अशी वागली तर?? "
नेहाची आई गप्पच झाली.
नेहाचे बाबा पुढे बोलले—
"जमुनाताई,नेहा तुमची सून आहे. तिच्या चुकीला आम्ही पाठिंबा देणार नाही. या पुढे काहीही झालं तर तुम्ही मला सांगू शकता."
"जमुनाताई,नेहा तुमची सून आहे. तिच्या चुकीला आम्ही पाठिंबा देणार नाही. या पुढे काहीही झालं तर तुम्ही मला सांगू शकता."
त्यांनी हात जोडले आणि ते लोक नेहाला तिकडेच ठेवून निघून गेले.
नेहा शांत... डोळे खाली.
तिला तिची चूक समजली.
तिला तिची चूक समजली.
"लग्नात फक्त प्रेम पुरेसं नसतं — एकमेकांच्या कुटुंबाचा आदर, त्यांची किंमत, आणि त्यांचं स्थान हेही तितकंच महत्त्वाचं असतं."
समाप्त.
©निकिता पाठक जोग
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा