Login

जबाबदारीची ओळख भाग -2

"स्वप्नं मोठी होती, पण त्याहून मोठी होती कुटुंबाची जबाबदारी… ही आहे राहुलच्या मार्गक्रमणाची कथा."
जबाबदारीची ओळख
(भाग २)

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025

लेक्चर झाले. राहुल, चेतन, राजू,  प्रशांत 
ग्राऊंडवर  एका  झाडाखाली  येऊन  बसले  होते.

"राहुल एक चांगले प्रेझेंटेशन बनवून ठेव." चेतन म्हणतो.

"विषय मी  निवडला आहे पण माझ्याकडे लॅपटॉप नाही. जर असता तर त्यात मी प्रेझेंटेशन बनवून ठेवले असते." राहुल नाराज होत म्हणतो.काजल तिथून जात होती तिने राहुलचे बोलणे ऐकले. 


"माझ्याकडे दादाचा लॅपटॉप तर आहे. मग मी माझा लॅपटॉप राहुलला दिला तर त्याची मदत होईल.  उद्या त्याला कॉलेजला आणून  देते."  काजल मनात म्हणत तिथून निघून जाते.

"मी बघतो कोणाचा लॅपटॉप मिळतो का ते."  राजू म्हणतो.

थोड्यावेळ गप्पा  मारतात आणी  नंतर  घरी निघून  जातात . राहुल  घरी गेला फ्रेश झाला. आईने  त्याच्यासाठी चहा बनवला,  राहुल पण त्याच्या  आई जवळ येऊन बसला. त्याच्या आईने  चहा आणून दिला.

"राहुल दुकानात जाणार आहे का?,  तुझ्या बाबांना तुझी खूप मदत होते. मी गेल्यावर गावातली लोक बोलतात. तुझी काकी कशी आहे हे तुला तर माहितीच आहे. गावातल्या लोकांना काही पण सांगते."  राहुलची आई म्हणते.

"हो, मी दुकानात जाणार आहे. बाबांना काम असते. आज माल पण  येणार होता.आपल्याला  काही आणायचे आहे का?."  राहुल  म्हणतो.

"घरात आहे त्यावर मी भागवेल."  राहुलची आई  म्हणते.

राहुलला वाईट वाटते पण  तो काही करू शकत नाही.

"आई मी दुकानात  जातो गं."  राहुल  म्हणतो.

थोडी चहा  उरली होती आईने डब्ब्यात  टाकून  दिली. राहुलने तो  डब्बा  घेतला आणि   दुकानात  जायला  निघाला.दुकानात दिनेश आला होता.

"काका आपण दुकान विकून  टाकू  नाहीतर आपण डी मार्ट  सारखे काहीतरी इथे उभे करू.  तुम्हांला  चांगले पैसे मिळतील.  तुम्ही  किती कमी पैशांमध्ये सामान विकतात. तुमच्याकडे तर पैसे ही नसतात.  घरात पण चांगले जेवण बनवत नसेल ना."  दिनेश  म्हणतो.

राहुलचे बाबा सगळे ऐकून घेतात. दिनेश हसत असतो. राहुल सगळे ऐकतो आणि डब्बा बाबांजवळ  देतो. रागात दिनेशच्या अंगावर धावून  जातो. दोघं पण एकमेकांना मारत असतात. राहुलचे बाबा राहुलला  खेचून दुकानात घेऊन जातात. त्यालाच कानाखाली  मारतात. 

राहुल गालावर हात ठेवतो आणि  बाबांकडे  बघत  असतो. बाबा  त्यांचा हात  भिंतीवर  मारतात. राहुल लगेंच  त्यांच्याजवळ जातो. राहुलचे बाबा राहुलला लगेच  मिठीत घेतात. दिनेश तिथून रागात घरी  जायला निघतो.

बाबा त्याला थांबवत म्हणतात, "राहुल  तुला माहिती आहे. दिनेश आपल्याला त्रास देण्यासाठी येतो. तू का त्याचे बोलणे मनाला लावून घेतो? "

"पण बाबा तुम्ही त्यांचे का ऐकून  घेतात?. आपण  गरीब आहे.  कोणाकडे काही मागत तर नाही ना.  आपल्या दुकानावर आपले  भागते. आता  मी खूप  अभ्यास करेल. कॅम्पसमध्ये फक्त माझा नंबर लागू द्या. तुम्हांला  दुकानात  काम पण  करावे लागणार नाही."  राहुल रडत म्हणतो.

"तू  म्हणत आहे  तसेच   होऊ दे, दिनेशचे बोलणे  मनाला लावून  घेऊ नको."  बाबा त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणतात. 

ग्राहक  येतात दोघ पण  कामाला लागतात.  आता दुकान बंद करायची वेळ झाली होती.  राहुल सगळं आवरत  होता. बाबांनी डब्बा  घेतला राहुलने  दुकानाला  कुलूप लावले. 

ते बाहेर पडणार तेवढ्यात कोणीतरी काठी घेऊन येत होते. बाबांचे  लक्ष  गेले. ते लोक  राहुलला  मारणार  होते तितक्यात राहुलचे बाबाचं मध्ये आले.  त्यांच्या डोक्याला ती काठी लागली. त्यांनी आवाज केला तेव्हा  राहुलचे  लक्ष त्यांच्याकडे  गेले.  राहुलने बाबांना  पकडले. त्यांच्या डोक्याला लागले होते.  राहुल त्या माणसाला बघत  होता. तो पकडायला जाईल,  तो पर्यंत तो माणूस पळून गेला होता.  

राहुल बाबांना दवाखान्यात घेऊन गेला. डॉक्टरानी डोक्याला पट्टी लावून दिली काही गोळ्या दिल्या. राहुल बाबांना घेऊन घरी निघून  गेला. 

आईने  पाहिले राहुलच्या बाबांना  लागले  आहे. त्या लगेच  बाबांजवळ आल्या.

" तुम्हाला  कायं  लागले?."  आईचे डोळे  भरून आले. 

"आई काही नाही झाले थोडेच लागले आहे. त्यांना बसू तर दे.'  राहुल  म्हणतो.  

आई  त्यांना बेडवर  बसवतात  पाणी  घेऊन  येतात.  

"दिनेश तू हे काय केलेस. माझ्या दादाला काहीही झाले तर बघ,"  दिनेशचे बाबा म्हणतात.

"काही होणार नाही. जास्त लागले नाही आहे.  मी डॉक्टरला भेटून आलो आहे."  दिनेश म्हणतो.

दिनेशचे  बाबा काही बोलत नाही. ते घरी  निघून जातात. दिनेश पण  त्यांच्या मागे घरी निघून  जातो.

दिपाली चौधरी.
0

🎭 Series Post

View all