जबाबदारीची ओळख
(भाग ४)
(भाग ४)
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
"राहुल घरी आला आणि बाबांजवळ गेला. बाबा आता डोकं दुखतं आहे का?" राहुल काळजीने म्हणाला.
"माझे आता डोके दुखतं नाही आहे. गोळ्यांनी बराच फरक पडला आहे", राहुलचे बाबा म्हणाले.
आई राहुल आणि बाबांसाठी चहा घेऊन आल्या. त्यांनी मिळून निवांत बसून चहा घेतला.
"आई मला दुकानाची चावी आणून दे ना, मी दुकान उघडतो. मला काम पण आहे". राहुल म्हणाला.
आईने राहुलला दुकानाची चावी दिली, राहुल दुकानात जायला निघाला.
"आपला राहुल किती चांगला आहे. त्याला कामाचा काही कंटाळा येत नाही." राहुलचे बाबा म्हणाले.
"कधीच काही मागितले नाही. सगळ्या मुलांकडे मोबाईल आहे. तो कधीच म्हणत नाही मला पण मोबाईल पाहिजे." राहुलची आई म्हणाली.
आई आणि बाबा बोलत बसले होते. राहुल दुकानाजवळ गेला. दुकान ओपन केले. बाहेर सामान लावून दुकान नीट झाडून घेतले. ग्राहक येत होते त्यांना सामान देत होता. असाच एक तास होऊन जातो.
"अजून काजल कशी आली नाही?. ती मला लॅपटॉप देईल ना. तिच्या घरी काही झाले असेल का?," राहुल मनात वेगवेगळे विचार येत होते.
एवढ्यात त्याला समोरून काजल येताना दिसली. नकळत त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली. काजल दुकानाजवळ पोहचली.
"तुला वेळ झाला. मला वाटले तू येते की नाही." राहुल म्हणाला.
"आईला बरे नव्हते घरातले काम केले मग मी दुकानात आले." काजल म्हणाली.
"तुमचं सामान बाबांनी भरून ठेवल आहे. तुझी आई माझ्या बाबांना यादी देऊन गेल्या होत्या." राहुल म्हणाला.
"हा लॅपटॉप घे आणि लवकर बाजूला ठेवून दे. तो बघ दिनेश येताना दिसत आहे." काजल म्हणाली.
राहुलने पटकन काजल कडून लॅपटॉप घेत नीट ठेवून दिला. काजलला तिच्या घरचे किराणा सामान होते ते तिला आणून दिले.
काजलला राहुल सोबत बोलायचे होते पण राहुल जास्त बोलत नाही तिला माहिती होते. तिचा नाईलाज होता म्हणून तिला तिथून जावे लागले.
"राहुल बाय", काजल जाता जाता म्हणाली.
"थँक्यू काजल, तू मला लॅपटॉप आणून दिला ते आता माझे प्रेझेंटेशन होईल." राहुल प्रामाणिकपणे म्हणाला.
'थँक्यू कायं म्हणतो? माझ्याकडे होते म्हणून तुझ्यासाठी आणून दिले. आपण एका क्लासमध्ये आहे. तू मान्य करत नाही पण मी तुला माझा खास मित्र समजते." काजल म्हणाली.
राहुल काहीच म्हणाला नाही पण त्याच्या ओठावर स्मित फुलले. त्याचे ते गोड स्मित पाहून काजल तेथून आनंदाने गेली.
राहुल थोड्यावेळ दुकानात बसला नंतर लॅपटॉपची पिशवी घेऊन, दुकान चांगले बंद करून घरी गेला.
राहुल घरी गेला तेव्हा आई बाबा गप्पा मारत बसले होते. तो पण त्यांच्या सोबत बोलत बसला. मग सोफ्यावर बसून लॅपटॉप काढून त्याच्यावर आपले प्रेझेंटेशन करायला सुरुवात केली. आई आणि बाबा राहुलकडे कौतुकाने बघत होते.
"राहुल हे लॅपटॉप तू कुठून आणले? तुझ्याकडे पैसे तर नव्हते". बाबा आश्चर्याने म्हणाले
"काजलने उधार दिला आहे मला. प्रेझेंटेशन बनवायचे आहे म्हणून. जर प्रेझेंटेशन चांगले झाले तर मला कॅम्पस मधून चांगला जॉब लागेल." राहुल म्हणाला.
" हो, काजल, ती पाटलांची मुलगी आहे ना, त्यांचे किराणा सामान मी भरून ठेवलं होतं तू ते दिले का?" राहुलचे बाबा म्हणाले.
"ती लॅपटॉप घेऊन आली होती. तेव्हाच तिच्या सोबत किराणा सामान दिलं". राहुल म्हणाला.
”चांगले केले, आता तू तुझे काम कर." राहुलचे बाबा म्हणाले.
राहुल प्रेझेंटेशन बनवायला लागला. खूप वेळ तो मन लावून प्रेसेंटेशन बनवत होता. बराच उशीर झाला तेव्हा आईने जेवायला त्याला बोलावले. त्यांनी जेवण करून घेतले. राहुलने थोडं राहिलेलं प्रेझेंटेशन पूर्ण करून टाकले. प्रेझेंटेशन सेव्ह करून ठेवले. त्याच्या जवळच्या पीडीमध्ये कॉपी करून घेतले लॅपटॉप बंद करून नीट ठेवून दिले.
आज त्याला खूप समाधान होतं.“ आता माझं स्वप्न एक पाऊल जवळ आलंय.” विचार करत राहुलने आनंदात झोपून घेतले.
दिपाली चौधरी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा