Login

जबाबदारीची ओळख भाग -5 अंतिम भाग

"स्वप्नं मोठी होती, पण त्याहून मोठी होती कुटुंबाची जबाबदारी… ही आहे राहुलच्या मार्गक्रमणाची कथा."
जबाबदारीची ओळख
(भाग ५) अंतिम  भाग

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025


आज प्रेझेंटेशन एक्सप्लेन करायचे होते. राहुल आई आणि बाबांना  नमस्कार करतो. नंतर देवाच्या पाया पडतो.

"आई बाबा आजच निकाल समजणार आहे. मला भीती वाटतं आहे".  राहुल म्हणाला.

"राहुल आपल्याकडे देवाचे लक्ष आहे. तू फक्त मनापासून प्रेझेंटेशन दे,"  राहुलची आई म्हणाल्या.

"राहुल तू प्रेझेंटेशन चांगलंच बनवलं असणार, आम्हाला त्याच्यातले काही जास्त समजत नाही. काही पण निकाल लागू दे, नाराज व्हायचे नाही. तू तुझे बेस्ट दे."  राहुलचे बाबा म्हणाले.

राहुल स्माईल देत कॉलेजला जायला निघाला.  राहुल कॉलेज जवळ गेला.  तिथे चेतन, राजू,  प्रशांत  राहुलची वाट बघत उभे राहिले होते. राहुल त्यांना बघतो आणि त्यांच्या जवळ जातो.

"राहुल प्रेझेंटेशन चांगले झाले आहे ना." चेतन  म्हणतो.

"मी प्रयत्न केला आहे." राहुल म्हणतो.

"हॉलमध्ये जमायला सांगितले आहे. आपण पण तिथे  जाऊ."  राजू म्हणतो.

ते हॉलमध्ये जातात पण तिथे दिनेशचा ग्रुप आधीच आलेला असतो.  काजल पण आली असते.  हे पण  तिथे  जाऊन  बसतात. स्टेजवर सर  येतात. 

"आता आपण  एकेकाला बोलवून घेऊ, प्रत्येकाने आपले प्रेझेंटेशन   सादर करावे, सुरुवात कोणं  करणार आहे?"  सरांनी विचारले.


दिनेश  लगेच उठतो,  "सर, मी पहिले करतो, तो आत्मविश्वासाने म्हणाला.

तो स्टेजवर जातो. प्रोजेक्टर स्लाईड्स दाखवतो.  "हा माझा प्रोजेक्ट, यात मी बिझनेस मॅनेजमेंट आणि मार्केट  स्ट्रॅटेजीवर लक्ष केंद्रित केले आहे." दिनेश मोठ्या आवाजात  म्हणाला. त्यांच्या ग्रुपने  टाळ्या वाजवल्या बाकीचे शांत ऐकत होते.

"ठीक आहे, धन्यवाद दिनेश," सर म्हणाले.

आता  दुसऱ्यांना  बोलवले जाते.  एक एक करत सगळे जातात छान प्रेझेंटेशन देतात.  शेवटी राहुलचे नाव घेतले जाते. 

दिनेश तर  बघत राहतो. "याच्याकडे लॅपटॉप नव्हते. तरी त्याने प्रेझेंटेशन कसे बनवले? " तो मनात म्हणाला.

राहुलच्या मनात धडधड वाढते, तो उभा राहिला आणि स्टेजवर गेला.  लॅपटॉप प्रोजेक्टरला जोडले.

"माझे प्रेझेंटेशन जबाबदारीची ओळख या विषयावर  आहे." राहुल म्हणाला.हॉलमध्ये शांतता पसरली. 

राहुल पुढे  बोलू लागला.

"माझ्या मते खरी श्रीमंती म्हणजे पैशात नाही. तर आपल्या कुटुंबासाठी घेतलेली जबाबदारी, मेहनत आणि प्रामाणिकपणा यात आहे, मी माझ्या बाबांच्या दुकानात काम करताना हे शिकलो, प्रत्येक ग्राहकाला दिलेली स्माईल, प्रत्येक छोटी मदत, आणि अभ्यासासोबत केलेला संघर्ष, हेच माझे अनुभव आहेत. आज मी जे काही आहे, ते माझ्या आई-बाबांच्या कष्टामुळे आहे. माझं स्वप्न आहे की कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सिलेक्ट होऊन त्यांना आराम द्यायचा."  राहुल म्हणाला.

सगळ्यांच्या डोळ्यात कौतुक दिसते. काजलच्या डोळ्यात चमक असते. दिनेश थोडा चिडलेला दिसतो.

सर उभे राहतात.

"खूप छान राहुल! इतक्या साधेपणाने आणि मनापासून केलेलं प्रेझेंटेशन मी क्वचितच पाहिले आहे. खरं तर हेच शिक्षणाचं सार आहे – जबाबदारीची ओळख." सर  म्हणाले

"आम्ही डिस्कशन करून निकाल सांगतो" सर म्हणाले.

प्रिन्सिपल आणि सर बाजूला जाऊन बोलू लागले. हॉलमध्ये हलकी कुजबुज सुरू झाली.

"नक्की दिनेशचं होईल." कुणीतरी म्हणाले.

"नाही, राहुल खूप छान बोलला." दुसऱ्याने हळू आवाजात सांगितलं.

राहुल मात्र शांत बसलेला होता. तो मनात प्रार्थना करत होता. "हे प्रेझेंटेशन बाबांच्या मेहनतीसाठी, आईच्या विश्वासासाठी, आणि माझ्या भविष्यासाठी आहे."

थोड्याच वेळात प्रिन्सिपल पुन्हा स्टेजवर आले.

"सर्व विद्यार्थ्यांचे प्रेझेंटेशन खूप चांगले झाले. पण सर्वात मनापासून केलेले, साध्या शब्दांत पण खोल विचार मांडणारे प्रेझेंटेशन… राहुलचं होतं."

क्षणभर हॉल शांत झाला आणि लगेच जोरदार टाळ्यांचा 7गडगडाट झाला. चेतन, प्रशांत, राजू उभे राहून टाळ्या वाजवत होते. काजलच्या चेहऱ्यावर अभिमानाची स्माईल होती. दिनेश मात्र निराश नजरेने बसून राहिला.

सर पुढे म्हणाले. "राहुल, तुझ्या प्रामाणिकपणामुळे आणि मेहनतीमुळे तुला कॅम्पस प्लेसमेंटसाठी पहिली संधी मिळत आहे. तुला हार्दिक शुभेच्छा!"

राहुलच्या डोळ्यात पाणी आले. त्याने हात जोडून सर आणि प्रिन्सिपलला नमस्कार केला.हॉलमधून बाहेर पडल्यावर त्याचे मित्र त्याला मिठी मारतात.

"म्हटलं होतं ना, तू करशील ," चेतन म्हणाला.

"तुझी मेहनत वाया गेली नाही," राजू म्हणाला.

काजल शांतपणे जवळ आली, हसत म्हणाली, "आता तरी मान्य कर, मी तुझी खरी मैत्रीण आहे."

राहुल हसत म्हणाला  "हो, आता मान्य करतो."

संध्याकाळी घरी गेल्यावर आई-बाबांना निकाल सांगताना त्याच्या आवाजात आनंद लपवत नव्हता.

"बाबा, आई… तुमच्यासाठी मी पहिली पायरी चढलो आहे. आता तुम्हाला आराम देण्याचं स्वप्न पूर्ण करेन."   राहुल आनंदात म्हणाला.

आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, बाबा अभिमानाने हसले.