Login

जबाबदारीची ओळख भाग -3

"स्वप्नं मोठी होती, पण त्याहून मोठी होती कुटुंबाची जबाबदारी… ही आहे राहुलच्या मार्गक्रमणाची कथा."
जबाबदारीची  ओळख
(भाग ३)

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025


दिनेशचे बाबा रागातच घरात शिरले.  दिनेश पण त्यांच्या मागे आला. 

दिनेशची आई टीव्ही बघत बसली होती.  त्यांनी  या दोघांना  येताना पाहिले आणि  जेवण  गरम  करायला गेल्या. 

तोवर दिनेशचे बाबा आणी दिनेश हात पाय  धुवून आले. दिनेश लगेच   जेवायला  बसला. 

"तू आज जेवायचे नाही समजले."  दिनेशचे बाबा  जरा ओरडूनच म्हणाले.

"तुम्ही कायं बोलत आहे?  त्याने जेवायचे का नाही? कायं झाले?"  दिनेशची आई  काळजीने म्हणाली.

"त्याने आज खूप मोठे प्रताप केला आहे.  तू  त्याला पैसे का देते?  असे काम  करायला." दिनेशचे बाबा म्हणाले.

"त्याने कायं केले?."  दिनेशची आई  काळजीने बोलली. नक्की कायं बिनसले बापलेकात हे त्यांना समजले नाही.

"आई मी तुला सांगते." रुची  म्हणाली.  ( दिनेशची बहीण )

दिनेश तिला डोळे दाखवत होता तरी पण तिने आईला सगळे सांगून टाकले.

" दिनेश तुला समजते का?  त्यांना जास्त लागले असते तर तुला पोलीस स्टेशनमध्ये जावे लागले असते.  परत माझ्या कानावर असे काही आले तर तुला एक रुपया पण  देणार नाही. तुला  राहुलचा राग येतो तर,  त्यांच्या सारखा अभ्यास कर, तो  दुकानात  जाऊन  दादांना  मदत करतो." दिनेशची आई  म्हणाली.  

दिनेश काही बोलत नाही. त्यांवच्या रूममध्ये निघून जातो.  तो पण  लॅपटॉप ओपन करत प्रेझेंटेशन बनवून ठेवतो. 

"आता  राहुलला  बघतोच,  तो कसे कायं  प्रेझेंटेशन बनवतो?  त्याच्याकडे तर लॅपटॉप पण नाहीये.  त्याला काहीच करता येणार नाही."  दिनेश मनात  विचार करत झोपून  गेला.

असेच  दिवस  जात  होते. राहुल कॉलेजमध्ये असतो.  लेक्चर  चालू  होणार असते.  सर  क्लासरूममध्ये  येतात.

"तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सगळ्यात  मोठी संधी पण असे समजा".   सर  म्हणाले.

सगळे एकमेकांकडे  बघत असतात.  सगळ्यांच्या मनात कुतूहल सुरू असते.  सर कायं सांगणार  आहे?  सर  जास्त  वेळ  न घेता बोलायला लागतात.

"आपल्याकडे स्पर्धा आहे, त्यामध्ये सगळ्यात चांगले  बिझनेस  आयडिया  प्रेझेटेशन ज्याचे  असेल त्याला डायरेक्ट जॉब लागेल,  खूप चांगली संधी आहे.  आज पासूनच कामाला लागा, तुमच्याकडे जास्त दिवस नाही आहे".  सर  म्हणाले.

राहुल विचार करायला  लागतो. "माझ्याकडे लॅपटॉप नाही.  कोणाचा तरी लॅपटॉप उधार घ्यावा लागेल." राहुल मनात विचार करत असतो.  सरांचे लेक्चर संपते. सर निघून जातात. 

" माझे  तर  प्रेझेंटेशन रेडी आहे. "   दिनेश  राहुलकडे बघत   जोरात  म्हणाला आणि हसत कलासरूमच्या  बाहेर  निघून गेला.

"राहुल  त्याच्याकडे लक्ष देऊ नको,  आपण  प्रेझेंटेशनचे बघू.  चेतन  म्हणाला".

"अरे  पण, माझ्याकडे  लॅपटॉप नाही आहे."  राहुल  नाराज  होत  म्हणाला. .

काजल  तिथेच असते.  ती  उठून राहुल जवळ आली. "राहुल  माझ्याकडे  लॅपटॉप आहे.  तू घेशील का?  मी  तुला  आणून देईल" काजल म्हणाली.

"कायं करू, मला  काम पण आहे ती देत आहे तर  लॅपटॉप घेऊ का."  राहुल मनात विचार करत होता.

"राहुल काही बोल नाss" राजू  म्हणाला..

"हो दे की, खूप मदत होईल." राहुल म्हणाला.

"मी तुला आणून देते. कुठे आणून देऊ?."   काजल म्हणाली.

"तू दुकानात आणून दे", राहुल म्हणाला.

बाकीचे त्याला हसायला लागतात.

"तुम्ही का हसत आहे?" राहुल म्हणाला.

"तिला बाहेर बोलवले असते ना? दुकानात का बोलवत आहे?." प्रशांत  म्हणाला.

"बाहेर  बोलवले तर दिनेशला समजेल ना. त्याला समजायला नको.  त्याला माहिती आहे,  माझ्याकडे  लॅपटॉप नाही आहे.  तो  म्हणेल  राहुल काही  प्रेझेंटेशन बनवू शकणार नाही, म्हणून काजलला  दुकानात बोलवले. त्याला वाटेल ती  सामान घेण्यासाठी  आली आहे." राहुल  म्हणाला.

"अरे हो, हा मी विचारच केला नाही".  प्रशांत म्हणाला.

"मी दुकानात  लॅपटॉप आणून देते".  काजल म्हणाली आणि तेथून निघून गेली.

"बघ कशी तुला मदत करत आहे? आणि तू  तिच्यापासून  दूर  पळत आहे." राजू म्हणाला.

"राजू  तुझे कायं आहे?  ती फक्त मदत करत आहे.  चला आता बाबांना लागले आहे.  मी घरी  जाऊन , थोड्यावेळाने दुकान  उघडतो." राहुल  म्हणाला.

ते सगळे घरी निघून गेले.

दिपाली चौधरी
0

🎭 Series Post

View all