जबाबदारीची ओळख
(भाग १)
(भाग १)
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
राहुल एक साधा मुलगा होता. छोट्या गावात राहत होता. त्यांच्या घरची गरीब पररिस्थिती होती. तो कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होता. तो कोणत्याच मुलीसोबत बोलत नव्हता. त्याचे मित्र होते पण त्याला त्याच्या मित्रांसोबत फुकट टाईमपास करायला आवडत नसे. त्याच्या बाबांचे किराणाचे दुकान होते. तो त्याच्या बाबाला नेहमीचं मदत करत असायचा. त्यांच्यावर जळणारे खूप होते, पण तो जास्त लक्ष देत नसे, आपला अभ्यास आणि किरणा दुकानात काम करायचे बस. एवढेच तो लक्ष द्यायचा.
"राहुल तू कॉलेजला जाताना, बाबांना दुकानात डब्बा देऊन दे." राहुलची आई त्याला सांगून घरातले काम करायला निघून जाते. राहुल बाबांचा डब्बा घेऊन दुकानात जातो.
"बाबा तुमचा डब्बा आणला आहे. वेळेवर खाऊन घ्या, मी कॉलेज संपल्यावर येतो. तुम्हांला मदत होईल." राहुल म्हणतो.
"नीट जा." राहुलचे बाबा म्हणतात.
राहुल "हो " म्हणतो.
तो कॉलेजला जातो. चेतन, प्रशांत आणि राजू हे राहुलचे मैत्र होते.
"हॅलो राहुल" चेतन म्हणतो.
"हॅलो चेतन, बाकीचे कुठे आहे?." राहुल
"ते कॅन्टीनमध्ये गेले आहे. मला तू दिसला म्हणून मी तुझ्याजवळ आलो." चेतन म्हणतो.
"आपण पण जाऊ." राहूल बोलतो तसे ते दोघे कॅन्टीनमध्ये जातात.
आज आल्या बरोबर ते कॅन्टीनमध्ये आले.
"थोडे पैसे वाचवत जा." राहुल म्हणतो.
"थोडे पैसे वाचवत जा." राहुल म्हणतो.
"आम्ही असेच बसलो आहे. काही ऑर्डर केले नाही. आम्ही घरून खाऊन आलो आहे." राजू म्हणतो.
"आता आपण लेक्चरला जाऊ." राहुल
"राजू त्या राहुलचे कायं ऐकतो? त्याच्याकडे पैसे नसतात म्हणून तो तुम्हांला पण पैसे खर्च करू देत नाही. आमच्या ग्रुपमध्ये ये कॅन्टीनमध्ये जे काही खायला आहे ते तुला सगळे खाऊ घालेल." दिनेश म्हणतो.
राहुल त्याला उत्तर देणार असतो पण चेतन प्रशांत आणि राजूला क्लासरूममध्ये घेऊन जातात.
"तुला माहिती आहे ना, तो कसा आहे? तुला चिडवायला येतो. तुझ्या काकांचा मुलगा आहे ना, मगं तुला का त्रास देतो?." चेतन म्हणतो.
काकांनी माझा बाबांकडून पेपरवर सही घेतली. माझ्या बाबांनी बघितले पण नाही कसले पेपर आहे सरळ सही करून दिली. त्यांचा त्यांच्या भावावर खूप विश्वास होता. हा दिनेश मला चिडवायला येतो आम्ही किती श्रीमंत आहे." राहुल म्हणतो.
"तू श्रीमंत आहे, मनाने श्रीमंत आहे, अशी पैश्यांची श्रीमंती असून कायं कामाची?." प्रशांत म्हणतो.
"बरोबर बोललास" राजू म्हणतो.
"राहुल आता दिनेशचा विचार नको करू ती बघ काजल आली. तुझ्याकडेच बघत आहे." चेतन राहुलला बघत म्हणतो.
राहुल छान स्माईल करतो. "तुम्ही गप बसा रे!, उगाच मला चिडवत असतात. मला प्रेमात पडायचे नाही आहे. आपले शेवटचे वर्ष आहे. चांगले मार्क्स पाडून कॅम्पस मधून सिलेक्ट व्हायचं आहे. बाबांना आराम द्यायचा आहे." राहुल म्हणतो.
सर येतात त्यांचे लेक्चर सुरु होते. ते सरांकडे लक्ष देतात.
दिपाली चौधरी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा