सारांश :
ही एक साहसी जादूई सफर आहे. ह्या मध्ये अविर नावाच्या 14 वर्षाच्या मुलाला एक मूर्ती सापडते आणि ती मूर्ती बोलणारी मूर्ती असते ती अविरला रोज एक कथा सांगते आणि शेवटी त्याला त्या कथेवर आधारित प्रश्न विचारते ज्याचं उत्तर त्याला शोधायचं असत. तो उत्तर शोधू शकेल का? त्याच्या या सफरी मध्ये कुठल्या अडचणी येतील आणि तो त्या अडचणीवर कसा मात करेल? याचीच ही साहसाने भरलेली थोडीशी वेगळी असलेली कथा चिमुकल्यांसाठी
ही एक साहसी जादूई सफर आहे. ह्या मध्ये अविर नावाच्या 14 वर्षाच्या मुलाला एक मूर्ती सापडते आणि ती मूर्ती बोलणारी मूर्ती असते ती अविरला रोज एक कथा सांगते आणि शेवटी त्याला त्या कथेवर आधारित प्रश्न विचारते ज्याचं उत्तर त्याला शोधायचं असत. तो उत्तर शोधू शकेल का? त्याच्या या सफरी मध्ये कुठल्या अडचणी येतील आणि तो त्या अडचणीवर कसा मात करेल? याचीच ही साहसाने भरलेली थोडीशी वेगळी असलेली कथा चिमुकल्यांसाठी
अविर आणि मूर्तीची भेट
"अविर बाळा, उठ आता सकाळ झालीये शाळेच्या सहलीला जायचं आहे न तुला किती हट्ट धरला होतास सहलीला जायचा आम्ही दोघ ही नको म्हणत होतो पण तरी तुझं चालूच होत आता परवानगी मिळाली आहे तर अजून झोपेतच आहेस चल उठ." जागृतीने आवाज दिला
आपलं आवरत आवरत जागृती अविरला उठवत होती पण अविर तीच ऐकायला दिवानावर होता कुठे तो आईचा आवाज ऐकताच कधीच उठून आवरायला गेला होता.
जागृतीच दिवाणाकडे लक्ष गेलं बघते तर काय साहेब उठून कधीच आवरायला पसार झाले
काही वेळा नंतर...
अविर आपलं आवरून हॉलमध्ये आला आणि आईला घाई करू लागला.
"आई ए आई मला लवकर काही तरी खायला दे ग उशीर झालाय खुप सहलीला जायचं आहे आज सगळे माझीच वाट पहात असतील." डायनिंग टेबल वर बसत अविर म्हणाला.
"हो... हो आणतीये नाश्त्याला आणि ऐक हा घे डबा चिवडा, लाडू, कोथिंबीरच्या वड्या, आणि ढोकळा ही बरोबर दिलाय सगळ्यांबरोबर शेअर कर आणि तु ही खा काय हे दूध पिऊन घे आणि आवर लवकर शाळेत बस येऊन थांबली असेल तुझी" सगळं व्यवस्थित ठेवत जागृती म्हणाली
दोघांनी आपापल आवरलं आणि शाळेकडे रवाना झाले.
काही वेळा नंतर...
शांतीनिकेतन विद्यामंदिर...
आज शाळेतल्या मुलांचा उत्साह खूपच ओसंडून वाहत होता खुप दिवसा पासून ज्या सहलीची तयारी सगळे करत होते त्याच सहलीला आज सगळे जाणार होते.
काही वेळा तच मुले टीचर्स सगळे एकत्र जमले आणि बस ची वाट पाहू लागले प्रत्येक मुलांचे आई वडील आपल्या मुलांना सूचना देत होते तसच जागृती देखील अविरला सूचना देऊ लागली
"हे बघ अवि मी तुला काय सांगत आहे नीट ऐक भांडण करायची नाहीत, टीचर्स काय सांगतील ते ऐकायचं, उगाच वात्रटपणा करायचा नाही कळाल का? इकडे लक्ष दे जरा मी तुला काही तरी समजावत आहे." जागृती अविरला सूचना देत सांगू लागली
"हो ग आई माझ तुझ्याकडे लक्ष आहे आणि तु काळजी करू नकोस मी कुणाशी ही भांडणार नाही टीचर्सना पण त्रास देणार नाही ओके तु नको काळजी करुस" रस्त्याकडे लक्ष ठेवत अविर म्हणाला
तोच सहलीची बस आली विद्यार्थी लाईनीने बसमध्ये चढू लागले तस अविर देखील बस मध्ये चढला आणि आपल्या मित्राजवळ येऊन बसला.
आणि काही क्षणात बस सुरु झाली.
काही वेळा नंतर...
"ए अविर तु काय आणलं आहेस आज डब्यात मी तर वेफर्स आणले आहेत इडली आणली आहे आणि रस्त्यात खायला चॉकलेट्स आणि बिस्कीट्स पण आणले आहेत तु काय आणलं आहेस?" अविरजवळ बसलेल्या कार्तिकने विचारलं
"अरे वाह! खूपच छान मला आईने चिवडा दिला आहे आणि ढोकळा पण दिला आहे मला ढोकळा खुप आवडतो." अविरने सांगितलं
"तु शेअर करशील न माझ्याशी?" लगेच कार्तिकने विचारलं
"हो, म्हणजे काय आपण फ्रेंड्स आहोत न मी नक्कीच देईन तुला." अविरने सांगितलं
त्यांच्या गप्पा ऐकून क्लास टिचर सागर सरदेसाई म्हणाले.
"बर मुलांनो तुम्हाला माहित आहे का आपण कुठल्या सहलीला निघालो आहोत आणि तिथे काय पहाणार आहोत?" सागर सरदेसाई नी विचारलं
"थोड थोड माहित आहे सर पण आम्हाला एकदा परत पूर्ण माहिती आणि इतिहास सांगा न" विवेक म्हणाला
"ठीक आहे मी तुम्हाला सगळी माहिती आणि इतिहास सांगतो पण तत्पूर्वी मला सांगा मी तुम्हाला जे साहित्य आणायला सांगितलं होत ते सगळ्यांनी आणलं आहे न" देसाई सरांनी विचारलं
तोच सगळ्या मुलांनी एकसुरात होकार दर्शवला.
"ठीक मग तुमच्या डायरीज आणि पेन बाहेर काढा आता इथून पुढे मी किंवा बाकीचे टीचर्स तुम्हाला जे काही सांगतील ते नोट डाऊन करून ठेवायचं आहे प्रत्येक गोष्ट कळाल का?" देसाई सर म्हणाले
आणि परत सगळ्यांनी एकसुरात होकार दर्शवला आणि आपापल्या डायरीज व पेन बाहेर काढले
"तर.. आज आपण जीथे जातं आहोत ते एक निसर्गाने भरलेलं सुंदर जंगल आहे आणि या जंगलाला एक इतिहास देखील आहे इथल्या स्थानिक लोकांचं अस म्हणणं आहे की, या जंगलात कैक हजार वर्षांपूर्वी काही मुर्त्या एका गुहेत लपवल्या गेल्या होत्या त्या मुर्त्या एका लुटारुंच्या टोळीने चोरल्या होत्या आणि स्थानिक लोकांच्या भीतीने त्या गुहेत लपवून ठेवल्या त्यावेळी त्या मुर्त्यांपैकी एक मूर्ती अचानक बोलायला लागली आणि त्यांना तीने सात गोष्टी सांगितल्या ज्याची उत्तर त्या लुटारूना द्यायची होती त्यांना वाटलं त्या उत्तरात अजून कुठल्या खजिन्याचं कोड असेल ते ती उत्तर शोधत बसली पण झाल उलटच ते उत्तर देऊ शकली नाहीत आणि मुर्त्या तेव्हा पासून गुहेतच राहिल्या त्या घटने नंतर मात्र तिथे कुणी गेलं नाही आणि काळाच्या ओघात ती गुहा ही बंद झाली समजलं." देसाई सरांनी इतिहास सांगितला
आणि मुलांनी सगळ नोट डाऊन करून घेतलं.
"सर आता आपल्याला जंगलात जाऊन तो इतिहास शोधायचा आहे का?" लगेच अविरने विचारलं
"खुप चांगला प्रश्न विचारला आहेस अविर पण आपल्याला तस काहीच करायचं नाहीये मुलांना इतिहासाची जाण असणं ही चांगली गोष्ट आहे पण यावेळी आपल्याला फक्त निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे निसर्गाशी संबंधित जीं जीं निरीक्षणांची नोंद तुम्हाला ठेवता येईल त्या त्या नोंदी तुम्हाला ठेवायच्या आहेत सगळीकडे बघा तुम्हाला काही विशेष अस दिसत आहे का जिथे विशेष अस दिसेल लगेच नोट करून ठेवा कळाल" देसाई सरांनी सांगितले
तोच एक हॉटेल आलं आणि सगळे नाश्ता करायला उतरले
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा