Login

जादुई मूर्ती आणि अविरची जादुई सफर (भाग - दोन )

जादुई मूर्ती आणि अविरची जादुई सफर चा पुढचा भाग
"खुप चांगला प्रश्न विचारला आहेस अविर पण आपल्याला तस काहीच करायचं नाहीये मुलांना इतिहासाची जाण असणं ही चांगली गोष्ट आहे पण यावेळी आपल्याला फक्त निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे निसर्गाशी संबंधित जीं जीं निरीक्षणांची नोंद तुम्हाला ठेवता येईल त्या त्या नोंदी तुम्हाला ठेवायच्या आहेत सगळीकडे बघा तुम्हाला काही विशेष अस दिसत आहे का जिथे विशेष अस दिसेल लगेच नोट करून ठेवा कळाल" देसाई सरांनी सांगितले

तोच एक हॉटेल आलं आणि सगळे नाश्ता करायला उतरले.

शिव गर्जना हॉटेल...

"चला सगळे एका लाइन मध्ये उतरा गडबड करायची नाही शांततेत उतरा" आशालता ताई म्हणाल्या

लगेच मुलानी त्याच अनुसरण केलं आणि एका लाइन मध्ये उतरू लागले.

काही क्षणा नंतर...

टीचर्स आणि सगळी मूल हॉटेलमध्ये शिरली आणि आपापल्या जागेवर बसली.

"बर कोण काय खाणार आहे लवकर सांगा आपल्याला पुढचा ही प्रवास आहे अजून" देसाई सरांनी विचारलं

"सर मी इडली खाणार आहे" लगेच सेजल म्हणाली

"ठीक आहे. (अविरला) तु अविर? तु काय खाणार आहेस?" देसाई सरांनी विचारलं

"मी डोसा खाणार" अविर म्हणाला

"ठीक आहे. (पंडितला) तु काय खाणार आहेस पंड्या" देसाई सरांनी विचारलं

"मी उत्तप्पा खाणार आहे" पंड्या म्हणाला

"ठीक आहे. (गार्गीला) तुझ काय गार्गी? तु काय खाणार आहेस" देसाई सरांनी विचारलं

"सर मी सॅन्डविच खाईन" गार्गी म्हणाली

"ठीक आहे, (कार्तिकला) कार्तिक तु काय खाणार आहेस" देसाई सरांनी विचारलं

"सर, मी पण सॅन्डविच खाईन" कार्तिक म्हणाला

"ठीक आहे, झाले का सगळे कुणी राहील तर नाही न. (वेटरला) वेटर.." देसाई सरांनी वेटरला आवाज दिला

"काय ऑर्डर आहे साहेब?" एका वेटरने विचारलं

"हे बघ पाच कप चहा आणि एक उत्तप्पा, एक डोसा, एक प्लेट इडली आणि दोन प्लेट सॅन्डविच लवकर घेऊन ये अजून खुप दूर जायचं आहे संध्याकाळच्या आत" देसाई सरांनी ऑर्डर दिली.

सरांच बोलण मात्र ओनर ऐकत होता त्याने लगेच विचारलं.

"साहेब शाळेची ट्रिप आहे वाटत" हॉटेलचा ओनर

"हो, आम्ही मुंबई हुन आलो आहोत." लगेच आशालता ताई म्हणाल्या

"कुठे निघाली तुमची ट्रिप सांगाल का" ओनरने विचारलं

"आम्ही प्रतापगड च्या जंगल सफरी साठी निघालो आहोत मुलांना निसर्गाची आवड निर्माण व्हावी आणि ठिकाणांची देखील माहिती व्हावी म्हणून ही सहल काढली आहे आम्ही" देसाई सर म्हणाले

"काय? तुम्ही प्रतापगड च्या जंगल सफरीला निघाला आहात? तुम्हाला माहित नाही का तिथे लहान मुलांना घेऊन जाण धोक्याच आहे आज पर्यंत जो कुणी तिथे गेल आहे ते परत नाही आले" ओनर नी सांगितलं

"अहो तुम्ही काय सांगत आहात लहान मुलांसमोर हे  अस बघा आमचा कुठल्याही गोष्टींवर विश्वास नाही आम्ही मुलांना शिकवतो अंधविश्वासावर विश्वास ठेवू नाही आणि तुम्ही त्यांच्या समोर हे अस सांगत आहात" देसाई सर म्हणाले

"हे बघा सर ही अंधश्रद्धा नाहीये तुम्हाला त्यावर विश्वास ठेवायचा आहे अथवा नाही ते तुम्ही बघा पण मी तुमच्या काळजी पोटीच बोललो इतकच बर ते जाऊ द्या स्वतःची काळजी घ्या फक्त (रामूला)" हॉटेल चा ओनर म्हणाला

"रामू त्यांच्या ऑर्डर च काय आहे बघ लवकर आणि लवकर दे त्यांना" व लगेच रामूला ही सांगितलं

रामू लगेच त्यांनी सांगितलेल्या डिशेष आणायला गेला.

"बर का मुलांनो या जंगलात अनेक झाड, वनस्पती तुम्हाला बघायला मिळतील काही काही वनस्पतींची तुम्हाला नाव देखील माहित नसतील पण तरीही झाडे, वनस्पतींचा अभ्यास सुरु ठेवायचा आणि सगळ्यांनी एकत्रच राहायचं इथे हींस्र प्राणी खुप आहेत म्हणून कुणी ही कुठेही पळापळ करायची नाही" देसाई सर समजाऊ लागले

काही वेळा नंतर...

सगळे गप्पा मारत असतानाच रामू ऑर्डर घेऊन आला आणि सगळ्यांनी आपापला नाश्ता उरकून लगेच सगळे जंगलाकडे रवाना झाले.

काही वेळ सगळे शांतच होते. कुणी आराम करत होत कुणी खिडकीतून बाहेरचा निसर्ग अनुभवत होत होता होता दुपार झाली आणि बस एका कॉटेज वर येऊन थांबली.

सगळी मूल एक लाईन करून बसमधून खाली उतरली त्यांच्या मागे सगळे टीचर्स देखील उतरले आणि कॉटेजमध्ये गेले.

रघुवीर राय कॉटेज...

रिसेप्शन वर धरा कामात व्यस्त होती तोच सागर देसाई सरांनी विचारलं...

"मॅडम आम्ही रूम बुक केली होती आमच्या चाव्या" सागर देसाई म्हणाले

"हो, तुम्ही सहलीसाठी आला आहात बरोबर. हे घ्या तुमच्या चाव्या मला काल फोन आला होता मी आधीच बुकिंग करून ठेवलं होत तुमचं हे घ्या चाव्या" धरा म्हणाली

देसाई सरांनी चाव्या घेतल्या एका रूम मध्ये एक टिचर आणि पाच मूल असा सहा जणांचा ग्रुप राहणार होते. तसच देसाई सरांनी पाच ही टीचर्सना त्यांच्या रूम्स च्या चाव्या दिल्या त्याच वेळी सगळे आपापल्या चाव्या घेऊन रुमाकडे निघून गेले.

काही वेळा नंतर...

आपापल्या रूममध्ये पोहोचताच सगळे फ्रेश होऊ लागले सगळं काही अगदी शिस्तीतच सुरु होत. एरवी दंगा मस्ती करणारी मूल अगदी शांततेत आपलं आवरत होती

सगळ्यांनी आपापलं आवरलं आणि कॅम्पेनच सामान घेऊन त्याच बरोबर जुजबी बाकीचं सामान घेऊन रूम्स लॉक करून परत बसमध्ये येऊन बसली आणि बस सुरु झाली.

आता मुलांचा उत्साह शिगेला पोहोचला होता आपल्याला जंगलात काय काय दिसेल कस असेल जंगलाच वातावरण आपण तिथे संपूर्ण एक दिवस राहणार आहोत तो एक दिवस कसा असेल असे एक ना हजार प्रश्न मुलांच्या मनात घोंगावत होते

कुणी डायरीत आपापल्या परीने नोंदी करत होत कुणी आजूबाजूच्या निसर्गाचे फोटोज काढण्यात मग्न होते तर कुणी शांत बसून फक्त आनंद घेत होते तर कुणी गप्पा मारत होते.

काही वेळा नंतर...

एक खुप मोठी कमान आली आणि जंगलाचा रस्ता सुरु झाला ते बघताच मूल एक सात ओरडले.

"ये... जंगल आल आता मजा" सगळी मूल एक सात ओरडली

जस बसने कामानितून प्रवेश केला प्रत्येकाने आपापल्या हातातली काम बाजूला ठेवली आणि खिडकीतून डोकावून बघू लागले.