Login

जादुई मूर्ती आणि अविरची जादुई सफर (भाग - तीन )

जादुई मूर्ती आणि अविरची जादुई सफर चा पुढचा भाग
"ये... जंगल आल आता मजा" सगळी मूल एक सात ओरडली

जस बसने कामानितून प्रवेश केला प्रत्येकाने आपापल्या हातातली काम बाजूला ठेवली आणि खिडकीतून डोकावून बघू लागले.

प्रत्येकाला उत्सुकता होती जंगलात काय काय दिसेल याची आणि तोच एक जण एकदम ओरडला.

"अरे, ते बघा हरण" एक जण खिडकीत बघून ओरडलं.

तस अविरने आपला कॅमेरा बाहेर काढला आणि फोटो काढु लागला. अविरने हरणाचे खूपच सुंदर वेग वेगळ्या अँगलने फोटोज काढले होते जस त्याने फोटोज काढले सर्व मुलांनी त्याला घेराव घातला आणि हरणाचे फोटोज दाखवायची विनंती करू लागले.

"अविर आम्हाला ही दाखव ना तु काढलेले फोटोज आम्हाला माहित आहे तु खुप छान फोटोज काढतोस दाखवना आम्हाला" एकजण म्हणाला

तस बाकीचे ही म्हणू लागले.

"हो.. हो एक एक जण सगळे बघा जमलं तर तुम्ही सुद्धा फोटो काढा फक्त कॅमेरा बाबांचा आहे तर जरा सांभाळून ठीक आहे." एकेकाच्या हातात कॅमेरा देत अविर म्हणाला

तोच प्रत्येकजण पाळी पाळीने फोटोज बघू लागले.

ते बघून देसाई सरांना खुप कुतूहल वाटलं आणि त्यांनी अविरला कॅमेरा मागितला.

"बाळ मला ही दाखव कॅमेरा कसे काढले आहेत फोटोज बघुत." देसाई सर म्हणाले

"हो बघा न सर अविर खुप छान फोटो काढतो हे घ्या" सेजल म्हणाली

लगेच देसाई सरानी कॅमेरा हातात घेतला आणि ते फोटो बघू लागले.

"अरे वाह हा खरच खुप छान फोटो काढतो. याचे फोटो स्पर्धेसाठी पाठवायला हवेत मी प्रिन्सिपल सरांना सांगतो" देसाई सर मनात म्हणाले

आणि फोटोज बघू लागले.

काही क्षणा नंतर..

"हे घे.. खरच खुप छान फोटो काढले आहेस अविर. बघितलत मुलांनो अशाच वेळी आपल्यातलं टॅलेंट समजत असत बर कुणा कुणात काय काय टॅलेंट आहे सांगा बर." देसाई सर म्हणाले

"मला गाणं येत मी सध्या विराजस सरांकडून गाणं शिकतीये" शेफाली म्हणाली

"अरे वाह खुप छान (गौरवला) तु सांग गौरव तुझ्यात काय टॅलेंट आहे" देसाई सर म्हणाले

"मी लेखन करतो मला कविता गोष्टी लिहीता येतात हे बघा सर मी नेहमी माझी आणखी एक डायरी आपल्या जवळ ठेवतो." गौरवने सांगितलं

लगेच देसाई सर डायरी वाचू लागले.

दहा मिनिटा नंतर...

"अरे वाह, बघितलत मुलांनो बस मध्ये बसल्या बसल्या आपल्याला तीन टॅलेंटेड मूल मिळाली आहे किनी गप्पा मारण्याची गंम्मत" देसाई सर म्हणाले

तोच दुसरं कॉटेज आल आणि बस थांबली.

"बर आता व्यवस्थित एक एक करून खाली उतरा एक जरुरी सूचना आता आपली बस इथे थांबणार आहे आणि इथून पुढे आपण पाई जंगल फिरणार आहोत कुणीही गडबड करायची नाही एकत्र राहायचं जस आपण पहिल्या कॉटेज साठी ग्रुप बनवले होते तेच ग्रुप आत्ता ही राहील ओके चला खाली उतरा आणि लगेच आपापले ग्रुप बनवा माहित आहे न कोण कुणाच्या ग्रुप मध्ये होत." देसाई सरांनी विचारलं

लगेच सगळ्या मुलांनी होकार दिला आणि खाली उतरताच आपापले ग्रुप बनवले.

"व्हेरी गुड चला आता. बर आपण आता पूर्ण जंगल फिरणार आहोत अविर तु इथले सगळ्यांचे फोटोज काढणार आहेस आणि गौरव तु आपल्या पूर्ण ट्रिप वर रिपोर्ट बनवणार आहेस ह्या दोन जबाबदाऱ्या मी तुम्हाला दोघांना देत आहे. ओके यात तुम्हाला तुमच्या मित्रांची कुठली मदत लागली तर त्यांना सांगा म्हणजे आपण त्यांना ही ह्या प्रोजेक्ट मध्ये शामिल करुत समजल." देसाई सर चालता चालता म्हणाले.

काही वेळा नंतर..

"हं.. तर हा आपला स्पॉट आहे आता नीट ऐका प्रतापगड च हे जंगल स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार रहस्यमय जंगल आहे कुणी म्हणत इथे घडणाऱ्या घटना ह्या खऱ्या आहेत तर कुणी याला फक्त अंधश्रद्धा अस नाव दिल आहे आपण ही अश्या गोष्टींना अंधश्रद्धा हेच मानतो. तरी सुद्धा आपल्याला पूर्ण खबरदारी घ्यायची आहे जंगल आहे तेव्हा इथे हिंस्र प्राणी देखील असू शकतात एक लक्षात ठेवा मुलांनो आपण इथे फक्त आणि फक्त निसर्गाशी मैत्री करायला आलो आहोत मला सांगा जर तुमच्या घरी कुणीतरी अनोळखी पाहुणे आले आणि तुमच्या घरावर हक्क सांगू लागले तुमच्या प्रत्येक कामात ढवळा ढवळ करू लागले तर तुम्हाला आवडेल का? प्राण्यांचं जग सुद्धा असच असत तुम्ही त्यांना त्रास दिलात तर ते ही तुम्हाला त्रास देतील आणि त्यांच्या राज्यात येऊन तुम्ही त्यांना कुठला ही त्रास न देता फक्त स्वतःच काम केलत तर ते तुमचं स्वागतच करतील तेव्हा जे आपल काम आहे तेवढच आपल्याला करायचं आहे. हे या जंगलाचे फॉरेस्ट ऑफिसर आणि माझे खास मित्र अन्वय अधिकारी आहेत हे आपल्याला मदत करणार आहेत (अन्वयला) अन्वय आता तु या मुलांना मार्गदर्शन कर." फॉरेस्ट ऑफिसर अन्वय ची ओळख करून देत देसाई सर म्हणाले.

"खुप खुप आभारी आहे सागर. मला न खरच या मुलांचं खुप कौतुक वाटत की यांना निसर्ग समजून घ्यायचा आहे. बर मुलांनो या जंगलाचा इतिहास तसा खुप मोठा आहे. पण मला वाटत इतिहास जाणून घेण्याआधी आपण जंगलाची भौगोलिक माहिती घेवूत चालेल का सगळ्यांना. मला याच उत्तर एकदम खणखणीत आवाजात हवं आहे बर का" अन्वय सर म्हणाले.

तस एकदम खणखणीत आवाजात सर्वांनी एक सुरात होकार दर्शवला.

"बर. खुप छान यावरून एवढ तर कळाल तुमच्या आवाजात अजून खुप शक्ती आहे. कारण अभी तो शुरुवात है पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त" हसून अन्वय सर म्हणाले

तस त्यांच बोलण ऐकून सगळेच हसू लागले.

"बर मुलांनो, हे जंगल खूप खास आहे. प्रत्येक जंगलाचं स्वतःचं भौगोलिक स्वरूप असतं.
या जंगलात तीन वेगवेगळे भाग तुम्हाला बघायला मिळतील.

इथं उंच टेकड्या आहेत. पावसाळ्यात या टेकड्यांवरन धबधबे वाहू लागतात. त्यामुळे ते धबधबे बघायला मजा येते.

इथे तुम्हाला साग, सिसम, आणि बांबू सारखी झाडं दिसतील त्यामुळे हे जंगल हिरवळीने नटलेलं आहे आणि म्हणून इथे तुम्हाला गारवा ही जाणवेल.

जंगलातून एक लहानशी नदी वाहते. या नदीवर पक्षी, हरणं, सशांसारखे प्राणी तिथं पाणी प्यायला येतात.

या वेगवेगळ्या भागामुळे जंगलाचं हवामानही बदलतं. कधी दमट तर कधी गारवा जाणवतो.
आणि हो, या भौगोलिक रचनेमुळे वेगवेगळ्या प्रजातींचे प्राणी-पक्षी आणि औषधी वनस्पती आपल्याला बघायला मिळतात." ऑफिसर अन्वयने सांगितलं.