Login

जग दोघांचं (भाग २)

एक छोटीशी प्रेमकथा
जग दोघांचं (भाग २)


सुमनताई आणि भास्करराव प्रकाशरावांच्या घरी पोहोचले. प्रकाशरावांच्या घरच्या गच्चीवर त्यांच्या पासष्टीच्या कार्यक्रमाची तयारी केली होती. सुमनताई आणि भास्कररावांनी प्रकाशरावांना शुभेच्छा दिल्या. भास्करावांचे बाकीची मित्रमंडळीही आली होती. त्यांच्यासोबत पोटभर गप्पा करून दोघे बाजूला खुर्चीवर बसले.


“छान केली आहे ना तयारी सगळी?” सुमनताई


“हो हो. एकदम बेस्ट केलं आहे. तुला सांगतो सुमन, आजकालची ही तरुण पिढी, काय काय म्हणून कल्पना असतात ह्यांच्या डोक्यात! आता बघ ना, पासष्टीच्या कार्यक्रमाला पक्याच्या वजनाइतकी बीजतुला! कसली भन्नाट कल्पना आहे. किती नवीन झाडं येतील!” भास्करराव


“हो तर. खरंच खूप सुंदर कल्पना आहे.” सुमनताई


“पक्या सांगत होता, ही कल्पना त्याच्या सुनेची, आरतीची आहे म्हणून.” भास्करराव


“हो! असेल. गुणाची पोर आहे. तिच्या चेहऱ्यावरून दिसतंच ते. आताही बघा ना सगळीकडे जातीने लक्ष देतेय. किती छान ना! प्रकाश भाऊजींच्या घरी आता काही महिन्यांपूर्वी सून आली. काही वर्षांत नातवंड येतील. घराचं कसं गोकुळ होईल… नाहीतर आपलं नशीब. आपला वनवास काही आपण मेल्याशिवाय सुटायचा नाही. ” सुमनताईंचा चेहरा हिरमुसला. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या तिथून उठून बाजूला गेल्या. भास्कररावही लगेचच त्यांच्या मागं गेले.


“ए प्रसाद, हे आपल्या बाबांचे मित्र भास्करकाकाच आहेत ना?” आरती प्रसादला, प्रकाशरावांच्या मुलाला म्हणाली. आरती आणि प्रसादचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं.


“हो. का गं?” प्रसाद


“अरे मला एक अर्जंट मेल सेंड करायचा होता म्हणून मी इथं खुर्चीवर बसले होते तर ते दोघे माझ्या समोरच्या खुर्चीवर बसले होते. त्यांच्या बोलण्यावरून काकू खूप उदास वाटल्या. त्यांचे मुलं काय विदेशात वगैरे गेलेत का त्यांना एकटं सोडून? ते दोघे एकटेच राहतात का? आपलं नशीब चांगलं नाही, असं काहीतरी म्हणत होत्या त्या.” आरती

“नाही गं. मुलं विदेशात वगैरे नाहीत गेले.” प्रसाद

“मग भारतातच असतील तर काका काकूंना सोबत नेऊच शकतात की.” आरती

“तसं नाही आरती.” प्रसाद

“मग कसं?” आरती

“वेगळं कारण आहे थोडं.” प्रसाद


“असं एवढं कोणतं कारण आहे की त्या दोघांना त्यांची मुलं त्यांच्याजवळ ठेवत नाहीत. मुलगा नसेल, मुलगी असेल तर तिनेही आपल्या आईवडिलांचा सांभाळ करण्यात काही वाईट नाहीये.” आरती


“तसं पण नाहीये गं.” प्रसाद

“मग?” आरती