Login

जगा वेगळं सासर भाग - 5

कथा एका आगळ्या वेगळ्या सासरची...


जगा वेगळं सासर भाग - 5

हॉस्पिटलमध्ये पोहोचता पोहोचता पूर्णाची अवस्था अगदी नाजूक झाली होती... तिचं बी॰पी॰ कमी होतं चालल होत... बाळांनी पोटात शी केली म्हणे .
लगेच सिझरकरुन प्रसुती करण्याचे ठरविले . मंदारची वाट बघतं राहिलोत तर वेळ होईल म्हणून तिला लगेच ओ. टि मध्ये घेऊन गेले.
मंदारचा जीव टांगणीला लागला होता. त्याला पोहचायला अजून दोन तास लागणार होते. तिकडे हॉस्पिटलमध्ये तणावाच वातावरण होतं. एक तर मंदार शहरात नाही त्यात पूर्णाची अशी अवस्था! सासूबाईंना चिंता वाटतं होती.
ती आता ओ. टि मध्ये होती बाहेर सगळेजण देवाला प्रार्थना करीत होते. अर्धा तास होऊन गेला होता पण अजून काही कळलं नव्हतं.

" सब ठीक होगा ना? ", पूर्णाची आई राहून राहून मंदारच्या आईला विचार होती..
"होईल सगळं नीट. तिचंच हॉस्पिटल आहे ते पूर्ण काळजी घेतील दोघांचीही", एवढं बोलून त्या त्यांना धीर देत होत्या. पण आतल्या आत त्यांचा जीव खूप घाबरत होता.
ईश्वरीय कृपेने सगळ सुरळीत पडलं . घरी लक्ष्मीचे आगमन झाले होते . गेल्या तीन पिढीनंतर पहिली मुलगी घरात आली. अत्यंत आंनदाचा सोहळाच होता जणू त्यांच्यासाठी.
पहिल्यांदा सासूबाईंनीच हातात घेतलं बाळाला... बघताच क्षणी त्यांचे डोळे पाणावले.
बाळाचे नाक, डोळे अगदी टवटवीत , चेहऱ्यावर देवी सारखं तेज,
भरपूर जावळ . बघताच नजर वेधेल अशी सुरेख दिसत होती.. त्याचं क्षणी त्यांच्या तोंडून "लक्ष्मी" नाव निघालं. त्यांनी पूर्णाच्या डोक्यावरन हात फिरवला आणि म्हणाल्या " तीन पिढ्यानंतर लक्ष्मीची चाहुल आमच्या घराला लागली. तुझे जेवढे आभार मानावे तेवढ़े कमी आहेत. पहिल्यांदा सासुबाईंची माया तिला मिळाली . तिला खुप गहिवरून आलं आणि तिने त्यांना घट्ट मिठी मारली.
सासुबाईंच मन ही हळवं झालं आणि त्यांचे डोळे भरून आले .
तेवढ्यात मंदार पोहोचला. दोघींना गळाभेट करतांना बघून त्याचेही डोळे पाणावले. त्यांच्या नकळत तोही दोघींच्या मध्ये गेला आणि तिघांनी मिठी अगदी घट्ट केली.
ज्या दिवसाची वाट मंदार आणि पूर्णा आतुरतेने बघत होते तो दिवस आला होता. दोघींचे करंट मारणारे तार एकदाचे जुळलेच...
एका कोपऱ्यात मंदारचे बाबा आणि पूर्णाचे आई - बाबा पण उभे होते. एवढ्या आनंदाचा प्रसंग बघून त्याचेही अश्रू गालावर सरसावले.
मंदारने बाळाला अलगद जवळ घेतलं. आजवर कित्येक लहानमुलांना त्याने उपचारादरम्यान जवळ घेतलं होतं पण आज स्वतःच्या बाळाला हाती घ्यायचा आंनद निराळाचं होता. बाळाला काळजाला लावून त्याने हळूच डोळे मिटले .. किती ती जगा निराळी शांतता आणि किती तो गोड सहवास.
"पूर्णा या दिवसाची वाट किती आतुरतेने बघत होतो ना आपण किती आनंदी आहेत सगळे", पूर्णाच्या हाताची पप्पी घेऊन तो म्हणाला.

" खरंच मंदार... काश पल यही रुक जाये! "...

" अब ख़ुशी रोज दस्तक देगी | बधाई हो समंधनजी, बधाई हो जमाईजी, लक्ष्मी आयी घर पर ", पूर्णाची आई म्हणाली.

"तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा", doghi गळाभेट करतं म्हणाल्या.

एका मागून एक आश्चर्याचे धक्के पूर्णा आणि मंदार बसत होते. म्हणजे मंदारची आई पूर्णाच्या आईचा चुकून लागलेला धक्काही सहन करायच्या नाही. पूर्णाला स्वप्नात असल्यासारखं वाटतं होता..
ती हळूच मंदारला म्हणाली," मंदार सपना वपणा चालू हैं क्या... जरा चिमटी गाढ".

तो तिला जोरात चिमटा घेतो, " स्वप्न वगैरे काही नाही सगळं खरं आहे".

"आऊचचच, खरं रे मेरे सारे सपने इस नन्हीसी जान ने पुरे कर दिये|", बाळाला काळजाला लावून ती म्हणते.

हॉस्पिटलमध्ये दोघी विहिणींनी लक्ष्मीची आणि पूर्णाची काळजी घेतली. तिसऱ्या दिवशी तिला हॉस्पिटलमधून घरी सोडणार होते . सासूबाईंचा डोळा आदल्या दिवशी अजिबात लागला नाही. मन अस्वस्थ वाटतं होतं. काही तरी मनात खूपत होतं त्यांच्या. त्या कुणाजवळ बोलल्या नाही पण त्यांच्या वागण्यावरून स्पष्ट जाणवतं होतं.
सुट्टीची वेळ झाली. पूर्णाच्या आईने तिची बॅग भरली. सगळं तयार होतं.मंदारच्या आईने लक्ष्मीला हातात धरलं. अचानकच त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या.
" मला खूप आठवणं येईल ग तुझी. तू नानीकडे मजा करशील आणि आजीने काय करावं? जा बाई जा.... पण लवकर ये", लक्ष्मीला पूर्णाच्या आईला सोपवत त्या म्हणाल्या.

"अरे ताई, आपकाही घर हैं| याद आयीकी झट से पोहोच जाना | हैं ना लाडो", पूर्णा ही आई म्हणाली.

" और समंधनजी आप बोलें तो मैं नहीं ले जाती दोनो को|"

" कायययय! अहो खरंच काय? "

"सही मे, उसमे क्या आपकी बहु हैं आपकी नातीन|"
.
"अहो ताई अगदी मनातलं बोलल्या तुम्ही. मी अगदी दोन - तीन दिवसांपासून विचार करीत होते, हे तुम्हांला कसं बोलावं पण तुम्ही अगदी माझ्या ओठांवरचा शब्द जाणला."

"समंधनजी, आपकी बेचैनी का अंदाजा मुझे कल रातको ही लग गया था|"

" अहो किती अस्वथ झालं होतं माझं मन. आता निश्चिन्त वाटतं आहे. मी पूर्ण काळजी घेईल दोघींची".

"बेशक, आप मुझसे भी ज्यादा उनका ख्याल रखोगे मुझे पता हैं|"

परत एक सुखद धक्का दोघांना लागला. आता खरंच पूर्णा - मंदारला अक्षरशः देव भेटल्यासारखी फिलिंग येतं होती. जो आनंद लक्ष्मीच्या जन्माने दोघांच्या आयुष्यात आला होता त्यात चार पट भर सासूबाईंच्या बदललेल्या व्यवहाराने घातली होती .

लक्ष्मी आणि पूर्णाचा गृह प्रवेश मोठ्या थाटाने सासूबाईंनी केला. घरात अगदी हर्षउल्हासाचे वातावरण होते.
घरात तिला काय हवं नको त्याची काळजी सासूबाई स्वतः घ्यायच्या. रोज सकाळी आणि सायंकाळी रंगारंग आरोग्यदायी नाश्त्याची मेजवानी त्या पूर्णासाठी करायच्या. कधी इडली - डोसा तोंडात न घेणाऱ्या सासूबाई पूर्णाच्या आईला विचारून विचारून
मोठ्या आवडीने तिच्यासाठी बनवत असे. त्यांनी आयुष्यभर पाळलेला नियम फक्त्त दोघी माय - लेकी करिता भंग केला. कुणालाच विश्वास बसे ना! विश्वास न बसण्यासारखीच गोष्ट होती खरं तर. जे ही नातेवाईक घरी बाळाला भेटायचे आश्चर्यचकित होऊन जायचे. मंदारची आई इतकी बदलूच शकतं नाही. असं शक्यच नाही. लोकांना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणं शक्य नव्हतं. पण हे सगळं खरंच घडलेलं होतं.
आधीच्या वातावरणात आणि आताच्या वातावरणात लाख मैलाचे साम्य होते.
घरात सगळे लक्ष्मीच्या अवतीभवती फिरू लागले. सगळ्यांचा जीव त्या चिमुरडीवर जडला. ती ही खूप नाटकी होती. बाकीच्यांनी घेतलं तर मुटकुन रडायची आणि आजीने घेतलं की चटकन चूप बसायची.
तिच्यामुळे घराला घरपण आले आणि पूर्णाला तिची जागा मिळाली. ज्या प्रेमासाठी ज्या आशीर्वादासाठी ती एवढ्या दिवसांपासून तरसत होती ते सगळं तिच्या ओंजळीत पडलं .
दिवसेंदिवस तिच्या बाललीला वाढत चालल्या होत्या. तिच्या एका इशाऱ्यावर घर दणदणायच . तिने एक शिंक जरी दिली तर तिची आजी तिला मांडीवर घेऊन रात्र जागायची .

मोठ्ठ गुणाचं बाळ. अगदी नाकावरची माशी ही न हलू देणारी मंदारची आई लक्ष्मीच्या एका रुसव्यावर थुईथुई नाचायची... सासरे अतिशय आनंदीत होते. ज़िला आजपर्यंत कोणी नाचवु शकलं नाही तिला नाचवायला आणि तिचा क्लास घ्यायला एक छोटी मॅडम आली होती...तिच्या चुटचुट बोलण्यावर त्या जीव लावायच्या...

लक्ष्मीमध्ये पूर्णा आणि मंदार दोघांच ही मिश्रण होतं . आई - बाबा दोघांचेही संस्कार जणू आईच्या गर्भातच शिकून आलेली. आधी ती घाबरायची पण मग सासूबाईंनी हिरवी झेंडा दाखविला .
सासूबाई बिनधास्त तिला म्हणायच्या, " तिला दोन्ही संस्कार दे... तुझ्या सारखी गुणी बनवं तिला." आईप्रमाणेच दक्षिणी संस्कृती जपून मराठी बाणाही ती अवघ्या लहानवयातच जपायला लागली. आईची मायबोली आणि मराठी अगदी फाडफाड बोलायची.
पण एक गोष्ट ती आपल्या आईच्या रक्तातूनच शिकून आली होती... ते म्हणजे "नृत्य". अगदी महिन्यांभराची होती तेव्हा पासुन गाणं लागलं की खुदुखुदु हसायची अन् हात - पाय मारायची. जसजशी पाऊल पुढे टाकायला लागली कुठेही गाणं लागलं तर ठुमके मारायची.

क्रमशः

मंदार बोलला होता ना," पूर्णा जरा धीर धर. माझी आई नारळाप्रमाणे आहे. होईल सगळं ठीक". अगदी तसंच झालं पण पुढे काय होणार? बघूया लवकरच पुढच्या भागात.