Login

जगावेगळी आई भाग १

जगावेगळी आई भाग १
" आई आज काल काय झालंय तुला ? तु अशी का वागते आहेस. तुझी लक्षण काही ठिक दिसत नाहीत."

" काही नाही. मला काय होणार ?"

" मी हॉस्टेल मधुन आल्यापासून बघत आहे. तु बदललेली दिसत आहेस. मला काय खायचं आहे ? काय आवडत ? असे असले प्रश्र्न विचारत आहेस ? " विराज शुभदाला विचारतो.

आज संध्याकाळी त्याच्या साठी शुभदाने चीझ पिझ्झा आणि फ्राइज बनवले होते. शिवाय संध्याकाळी त्याच्या सोबत जंक फूड खायला होटेल मध्ये यायला पण तयार झाली होती. याचंच त्याला आश्र्चर्य वाटतं होत. सँडविच वरचं जास्तीच चीझ उचलून तोंडात टाकत विराज तिला लटके चिडवत म्हणाला.

" अरे असं काही नाही तूझ्या मनाचे खेळ आहेत." त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसत शुभदा म्हणली.

" मनाचे खेळ वगेरे काही नाही. मला आठवत ना, आज पर्यंत तु नेहमी तुझीच मर्जी चालवायची."

" जसं की ?" शुभदा त्याला चिडवत म्हणाली.

" मी लहान असताना मला पेप्सी कोला, आइस्क्रीम , कुल्फी , बर्फाचा गोळा, मस्तानी, ज्यूस, मँगो कँडी, चोकोबार सारखे पदार्थ खायला किती आवडायचे. गल्लीत जेंव्हा कधी कुल्फीवाला किंवा बर्फाचा गोळे वाला यायचा तेव्हां तु मला कधीच नाही घेऊन द्यायची. मी नाराज झालो तरीही नाहीच. मग तूच घरी दूध आणि फळं आणून बनवायची.

बाहेरचे पापड, चिप्स वगेरे पण मला कधी खाऊ दिले नाहीस. तू स्वतः घरी करायचीस. तेच मला तळून द्यायची. कधी कधी तर मला तुझा खूप राग यायचा. पण तुझे संस्कार असे आहेत की तो राग कधी तूझ्या समोर दाखवू शकत नव्हतो. आजही नाही दाखवू शकत नाही कधी भविष्यात दाखवू शकेन. राग मनातल्या मनातच ठेवला."

" तेव्हां तु लहान होतास. बाहेरच्या गोष्टी खाल्ल्या तर तुला पटकन इन्फेक्शन व्हायच. डॉक्टरांनी तुला थंड पदार्थ, जास्त आंबट , मसालेदार पदार्थ खायला मनाई केली होती. कधी चुकून तु बाहेरचं काही खाल्लं तर स्वतः तर आजारी पडायचा, आणि माझा जीव टांगणीला लागून राहायचा. तुझी खूप काळजी वाटायची. मनात भलते सलते विचार यायचे. तुला काही झालं तर ? मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. दादा वहिनीला गमावल्या नंतर तुला गमावण्याची शक्ती माझ्यात नव्हती.
म्हणूनच तुला बाहेरच्या या गोष्टी पासुन दूर ठेवत आले." शुभदा म्हणाली.

" आई तुझी हि गोष्ट मान्य केले, माझ्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणून तू मला बाहेरचे पदार्थ खायला मनाई केली. पण मित्र ? माझे मित्र पण कोण असणार हे पण तूच ठरवायची ? मला खूप सारे मित्र गोळा करायला आवडायचे. पण मित्र पण तूच निवडणार. जसे मी अभ्यासात कोणते विषय घ्यायचे हे पण तुच ठरवलं होतं !"

" खरं तर तुला डॉक्टर बनवायचं स्वप्न हे दादा आणि वहिनीचे होत. बस त्यांना दिलेलं वचन निभावत आहे. म्हणून तर तुला बायोलॉजी स्पेशल घ्यायला लावला.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तु मित्र मैत्रिणी यांच्या  घोळक्यात रमला असता तर तुझं अभ्यासातले लक्ष कमी झाले असतें. म्हणून मग तुला त्याचं मुलांच्या सोबत मैत्री करण्यासाठी प्रोत्साहन दिलं, जी मुलं अभ्यास सिरियसली करत. ज्यांचा कल अभ्यासाकडे आहे.

घरी सुद्धा तुला आवश्यक असणारे इनडोअर गेम्स खेळायला आणले होते. तूझ बालपण कोमेजुन जाणार नाही याची पुर्ण काळजी घेतलेली.
शाळेत असताना सुद्धा खेळात, कोणत्याही स्पर्धेत तुला भाग घेण्यापासून कधीच आडवल नाही."

" बरं बरं समजलं. मी तर तुझा एकुलता एक मुलगा आहे ना, मग तरी देखील माझ्या सोबत इतकी कठोर, शिस्तीची काठी उगारून का वागलीस ?  मला नेहमी एखाद्या स्ट्रिक्ट प्रिन्सिपल मॅडम सोबत राहिल्या सारख वाटतं. घरात पण शिस्त आधी पाळली पाहिजे. हा तुझा दंडक होता.

तुझा अट्टाहास असायचा. सगळया गोष्टी जागेवर ठेवल्या पाहिजे. सगळी काम मी माझ्या हाताने केली पाहिजे. नाहीतर तुझा ओरडा पक्का होता. माझी बिचाऱ्याची काय हिंमत एक गोष्ट इकडची तिकड ठेवली जाईल. तुझी शिस्त मोडेन ? "

" हो.मला शिस्त पाळली पाहिजे. हेचं आवडत. मला नव्हत वाटतं की माझ्या लाडाने तू बिघडला जावा. मला माहीत होत. भविष्यात तुला बाहेर जावं लागेल. त्यासाठीच तुला घरची काम शिकवली. बाहेर गेल्यावर तुझ कुठं आडायला नको. ऍडजस्ट करताना तुला काही प्रोब्लेम नको यायला. तुला तूझी काम सांभाळून अभ्यास करता यायला हवा.

मला पण वाटायचं. की तूझी काम मी करावी. पण मन कठोर केलं होतं. तुझ्यावर शिस्तीचा दंडक ठेवला होता. मला तुला डॉक्टर बनवायचं होत. त्या साठी वाटेत येणारे अडथळे दूर करत होते."