Login

जगावेगळी आई भाग २

जगावेगळी आई भाग २
" आई पण त्यासाठी खरचं तुझे आभार मानावे तितके थोडे आहेत. तु मला अगदीं छान तयार केलं होतं. त्यामुळे मला हॉस्टेल वर ऍडजस्ट करायला फारशी अडचण आली नाही. माझ्या सोबत आलेले काही मित्र खुप लाडावलेले होते. त्यांनी घरी कधी पाण्याचा ग्लास देखील स्वतः च्या हाताने घेतला असेल असं वाटतं नव्हत. त्यामुळे त्यांना अभ्यासा सोबत त्यांचं स्वतः काम करायला पण अवघड जात होत.

माझा एक मित्र तर त्याचा अभ्यास आणि त्याची स्वतः ची काम यांची सांगड न घालता आल्या मुळे डिप्रेशन मध्ये गेला होता. त्याला अभ्यास जमत नव्हता. आई वडील आणि घरापासून दुर राहिल्याने होमसीक झाला होता. अगदीं आजारी पडला. चार पाच दिवस हॉस्पिटल मध्ये होता. शेवटी त्याच्या वडीलांनी या शहरात रूम घेतली. आता तो आई सोबत राहतो. तिकडे त्याचे वडिल एकटे राहतात. विक एंडला शहरात येतात. "

" बापरे. पण तो आई वडिलांशी तर फोन करून बोलू शकत होता. त्यामुळें त्याला इतका त्रास नसता सहन करावा लागला. आई वडील नेहमी आपले हितचिंतक असतात.त्यांच्या कडे सल्ला मागायला हवा. ते चुकीचं नक्कीच नाही सांगणार.

पण खरचं रे त्याच्या वडिलांची किती धावपळ होत असेल. आई वडिल मुलांना त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी दुसऱ्या शहरात शिकायला पाठवतात. त्यात मुलांचं हे असं वागणं ? आता काय करायचं ? आता कसा आहे तो मुलगा  ? "

" आई सोबत राहायला लागल्यावर चांगला झाला होता. नंतर स्कोर पण चांगला वाढला त्याचा."

" विराज तू जेव्हा शिकायला हॉस्टेल वर गेलास तेव्हां मला हे घर खायला उठायचं. काहीच करावस वाटतं नव्हत. ना जेवायची इच्छा होत ना काही करायचा उत्साह होता. मग तुझ्याशी बोलताना असं दाखवत की तूझ्या तिकडे राहण्याने मला काहीच फरक पडत नाही. मी इथ एकटी एन्जॉय करत आहे. तुला माझी काळजी लागली असती तर तु शिक्षण बाजुला ठेवून इथ आला असता. जे मला कधीच चाललं नसतं. म्हणून मग काळजावर दगड ठेवून तुझ्याशी कठोर पणे वागले."

" आय आय सॉरी आई. मी तुला खूप चुकीचं समजलो. लहान असताना जेव्हा मित्रांना त्याची आई लाड करायची, मदत करायची ते बघून वाटायचं, माझी आई अशी का नाही ? पण त्याचं महत्त्व आज समजतं आहे. तु तर माझ्या चांगल्या साठीच मनावर दगड ठेवला होता. तोंडावर खोटा शिस्तीचा मुखवटा लावून घेतला होता. आई जर तू तुझ्या वागण्यामागच कारण मला सांगितलं नसतं तर मी तुला चुकीचं समजलो असतो."

" मला नाही माहीत मी जे वागले ते योग्य होत का नाही ? ती पद्धत बरोबर होती की चुक ? मला त्यावेळीं जे योग्य वाटलं. तूझ्या हिताचं वाटलं ते मी करत गेले. तुला तूझ्या मनच करू न देण्यामुळे मलाच नेहमी वाईट वाटायचं. पण आज ती तपस्या पूर्ण झाली आहे. त्यामुळें आता मनाला टोचणी नाही लागतं. म्हणून मग आता आधी तुला करू देता न आलेल्या गोष्टी करून समाधान मिळवत आहे. मनाला तेवढाच दिलासा मिळतो, की मी तूझ्या इच्छा पूर्ण करत आहे.

आता तू मोठा झाला आहेस. तुझं हित तुला समजतं. तुझी काळजी स्वतः घेऊ शकतो. त्यामुळे तुला तुझे निर्णय घेण्याचं पुर्ण स्वतंत्र आहे."

शुभदा म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
काही वेळ शांत राहीली. मग म्हणली,

" अरे विराज गंधालीला सांग मला ती सुन म्हणून पसंत आहे. उगाच तिचा जीव नको खाऊस, माझ्या आयुष्याचे सगळे निर्णय माझी आई घेते. लग्ना सारखा महत्वाचा निर्णय पण तिच्या होकारावर अवलंबून आहे." तिने त्याला छेडल.

" आई तुला गंधाली बद्दल कस काय माहिती ?"
तिच्या प्रश्नाने तो दचकला. पण स्वतःला कसबस सावरत तो शुभदाला विचारतो.

" आई आहे तुझी. मला सगळं काही समजत." ती नाटकी आवाजात म्हणाली.

" गंधालीच्या आईने सांगितलं. तिचे वडील दादाचे चांगले मित्र होते. त्यामुळे दिपीका वहिनी आणि माझी चांगली मैत्री आहे. वहिनी मागच्या आठवड्यात भेटली होती. तेव्हा तिनेच सांगितलं." शुभदा म्हणाली.

त्याला त्याच्या कानावर विश्र्वास बसत नव्हता. आई इतक्या पटकन राजी होईल या लग्नासाठी. डॉक्टर बनल्याचा आनंदापेक्षा त्याचं प्रेम त्याला मिळालं याचा आनंद जास्त होता की त्याची आई त्याला तिच्या मूळ स्वरूपात मिळाली याचा आनंद जास्त होता तेच त्याला समजेना. तो पटकन उठून शुभदाच्या गळ्याला मिठी मारतो.

" थँक्यू.. थँक्यू सो मच. आई. सँडविच मस्त झाले होते. आता माझ्या हातची कॉफी."

असं म्हणत तो कॉफी करत होता. शुभदा खुर्चीवर बसून त्याला न्याहळत होती. मस्त फेसळती कॉफी एन्जॉय करत ते दोघं गप्पा मारत होते. इतक्यात विराजचा फोन वाजला. ' गंधा कॉलिंग.' असं नावं फ्लॅश होत होते. त्याने शुभदाला गप राहण्याचा इशारा केला.

" हॅलो मॅडम आज कशी काय या बिचाऱ्याची आठवण झाली ?"

तिकडे ती त्याच्या फोनची आतुरतेने वाट बघत होती. आणि हा इकडं निवांत होता.