" राज तु बोलला का शुभदा आत्याशी आपल्या बद्दल ? तिने काय सांगितलं ? तिला मान्य आहे ना ?" तिला टेन्शन आलं होतं. ते तिच्या घाबरलेल्या आवाजामुळे कळत होत.
" अग तिच्याशी काय बोलणार ? तिनेच मला सर प्राईज केलं आहे. तिने माझं लग्न ठरवल आहे. तुला माहीत आहे माझ्यासाठी ती काय आहे. मी तिच्या इच्छे विरुद्ध नाही वागू शकत. माझी तर बोलतीच बंद होते तिच्या समोर." तो नटखट पणाने बोलतं होता.
" असं काय करतो रे ? थोडा तरी प्रयत्न कर ना तिला मनवण्याचा. मी तूझ्या शिवाय नाही राहू शकत." तिचा आवज रडवेला झाला होता.
तिचा रडवेला स्वर ऐकुन त्याला तिला छेडायला मज्जा येत होती.
" गंधाली मला वाटतं आपली सोबत इथ पर्यंतच होती. आता आपले रस्ते वेगवेगळे आहेत. आई जिथं म्हणेल तिथं मी लग्न करणार. तू पण चल माझ्या लग्नाला." तो तिला त्रास देत म्हणाला.
" विराज का तिला त्रास देत आहेस. खबरदार माझ्या लेकीला त्रास दिलास तर. आता तुला जी सूट दिली आहे ना ! कदाचित मी माझा निर्णय बदलू शकते." त्याला दटावत शुभदा म्हणाली. तिने त्याच्या डोक्यात टपली मारली.
शुभदा ने विराज कडून मोबाईल घेतला. ती म्हणाली,
" गंधाली इतके दिवस विराजची जबाबदारी माझ्यावर होती. आता ती तूझ्यावर सोपवत आहे. छान राहा. सुखी रहा. आशा आहे की तु मला निराश नाही करणारं ! " शुभदाचा आवज भावूक झाला होता.
आत्या कडून असं बोललेल ऐकुन तिला काही बोलायला सुचलं नाही. विराज कडे फोन देत शुभदा म्हणाली,
" विराज आजच तिच्या आई वडीलांना बोलावं. म्हणजे आम्हा मोठ्या मंडळींना पुढची बोलणी करता येतील. तसचं गुरुजींना पण फोन करुन बोलवून घे. म्हणजे मुहूर्त काढता येईल."
हे सगळं बोलणं पलीकडे फोनवर गंधाली पण ऐकत होती. तिच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. सगळं सुख देवाने तिच्या ओंझळीत टाकलं होतं. तिला काही बोलायला सुचत नव्हतं. ती फक्त आनंदाने ऐकत होती.
" विराज गुरुजींना बोलवून घे. मी आई बाबांना पण सांगते."
" हो गुरुजींना पहिले बोलवायला हवं. थोड सेटिंग पण करायला हवे नाहीतर ते पत्रिका जुळत नाही किंवा सध्या मुहूर्त नाही असं काहबाही खुटपत काढतील." विराज मजेत म्हणाला.
" चूप काहीही काय बोलतो." ती लाजत म्हणाली.
" अरे खरं तर पत्रिका कशाला पहायची. मन जुळली आहेत मग पत्रिका कशाला पहायची ?"
" मनाची शांती करण्यासाठीं. गुरुजींना फोन करुन बोलवून घे. मी आई बाबांना सांगते."
" तू फोन ठेवला तर काका काकूंना सांगशील ना " विराज तिची खेचत म्हणाला.
" चल बाय. मी फोन ठेवते. आधी आईला संगते." असं म्हणत तिने फोन ठेवला.
" ओ माय लव्ह. आता अजून धीर नाही धरला जाणारं. मी लकवरच तूझ्या सोबत विवाह बंधनात अडकणार. तो पर्यंतचा एक एक क्षण खूप मोठा असल्या सारखं वाटतं आहे. " फोन वर ओठ टेकवत तो म्हणाला. त्याला खूप आनंद झाला होता.
गंधालीचा फोन ठेवल्या नंतर त्याने शुभदाला घट्ट मिठी मारली. इतक्यात पुन्हा गंधालीचा फोन वाजला. तिच्याशी बोलायला तो बाहेर रूम मध्ये गेला. शुभदा त्याच्या कडे बघून हासत होती. डोळ्यात आलेले अश्रू तिने पदराला पुसले. मग सांजवात करायला देव घरात गेली.
आज ते दोघं गंधाली आणि तिच्या कुटुंबा सोबत होटेल मधे गेले होते. खूप एन्जॉय केलं. लवकरच लग्नाची बोलणी करायचं ठरवलं. रात्री ती तिची डायरी लिहीत होती. टेबल वर एका तरुण जोडप्याचा फोटो ठेवला होता. विराजचे कपाळ त्याच्या वडिलांन सारखे होते तर गालाचा गोलवा त्याच्या आई सारखा होता. शुभदा ने त्या फ्रेमला हातात घेतलं नी म्हणाली,
" दादा वहिनी मी आज तुमचं स्वप्न पुर्ण केलं आहे. आपला विराज आता डॉक्टर झाला आहे. लवकरच त्याचे दोनाचे चार हात होतील. गंधाली खुप चांगली मुलगी आहे. आपल्या विराजला सांभाळून घेइल.
वहिनी मी माझं वचन निभावल आहे. माझ्या कडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर.. तुमच्या दोघांचे आशीर्वाद कायम विराज सोबत असु दे.
वहिनी मी विराजला आई वडीलांच प्रेम देण्याचा प्रयत्न केला आहे." ती बोलतं होती. आणि तिच्या डोळ्यांतून अखंड अश्रू वाहत होते. त्यांना ती टिपत पण नव्हती.
हे सगळं बोलणं दारात उभ राहून विराज ऐकत होता. पटकन तो तिच्या जवळ आला. तिच्या हातातली फ्रेम टेबल वर ठेवली. तिचे डोळे पुसले. अश्रू बोटाच्या टिचकीने उडवले.
" आई तु माझ्या साठी कायम आईच आहे. आत्तु नाहीस.मला तूझ्या डोळ्यात पाणी आलेलं आवडत नाही."
" विराज " तिला हुंदका फुटला होता. विराज तिला सांभाळत होता.
विराजचे आई बाबा शुभदाच्या लग्नाची पत्रिका कुलदेवतेला ठेवायला गेले होते. तेव्हां परत येताना त्यांच्या कारला अपघात झाला. त्यात तिचे आई वडील आणि भाऊ गेले. वहिनीला वाचवण्यात यश आले. शुभदाला जेव्हा ती बातमी समजली तेव्हां ती धावतच हॉस्पिटल मधे गेली होती. तेव्हां वहिनीने एका बाळाला जन्म दिला होता. त्याची जबाबदारी सोपवली. नी पंधरा दिवसांत तिने जगाचा निरोप घेतला. शुभदाच्या सासरची मंडळी त्या तान्हा बाळा सह तिला स्वीकारायला तयार नव्ह्ते. शुभदा ने लग्नाला नकार दिला. तिचं सगळं आयुष्य विराजचे पालन पोषण करण्यात घालवलं. त्यामुळें विराज तिला कायम आत्तु न म्हणता आई म्हणायचा.
समाप्त
© ® वेदा
कथा आवडल्यास कॉमेंट मध्ये सांगा.
या कथेचा वापर यू ट्यूब किंवा इतर कुठेही आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
तुमचं मत कॉमेंट मध्ये सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा