कवितेचे शीर्षक- जगावेगळं असं काय करते

Life of every woman

कवितेचे शीर्षक- जगावेगळं असं काय करते

कहाणी ही घराघरातली,

प्रत्येक स्त्रीच्या मनातली,

पुरूषप्रधान संस्कृतीतली,

प्रत्येक नव-याच्या तोंडातली,

जगावेगळं असं काय करते,

भारतात आहे स्त्री पुरुष समानता,

पण फक्त बोलण्यासाठीच आहे महानता,

कोणतीही स्त्री असो,नोकरी करणारी की घरी राहणारी,

प्रत्येकीलाच ऐकावा लागतो हा टोमणा,

जगावेगळं असं काय करते.

नोकरी करणारी असेल तर......

ब-याच स्त्रीया नोकरी करतात,

घर सांभाळून सगळं करतात,

दमछाक त्यांची होतच्ं नाही,

कारण त्या माणूसच नाही,

त्यांची तारेवरची कसरत,घरच्यांना दिसत नाही,

सगळं करताना मात्र ,आपलं मन मारत असते,

वर टोमणा ऐकायला लागतो तो वेगळाच,

जगावेगळं असं काय करते.

घरी राहणारी असेल तर........

घरीच तर असते,

एवढं पण करायला जमत नाही,

तू करत तरी काय असते,

की तुला मुलांकडे लक्ष द्यायला पण जमत नाही,

नोकरी करत नाही म्हणून,आपल्या इच्छा मारत असते,

वर टोमणा ऐकायला लागतो तो वेगळाच,

जगावेगळं असं काय करते.

लॉकडाऊन मधली परिस्थिती

नोकरी करणारी असेल तर......

घरात रहाणारे दोघेही बांधील नोकरीचे,

पण स्वयंपाक बनवणारे हात मात्र तिचे,

लादी ,भांडी,आवराआवर हे काम सगळं तिचे,

मुलांची शी,सू ,जेवायला घालणे हे कर्तव्य मातेचे,

जेवणात वेगवेगळे प्रकार करणे हे परम कर्तव्य तिचे,

पण थोडीशी चिड चिड केली की ,

वर टोमणा ऐकायला लागतो तो वेगळाच,

जगावेगळं असं काय करते.

घरी राहणारी असेल तर........

सगळे ऑफिसला आणि शाळेला गेल्यावर,

वेळ मिळायचा स्वत:साठी थोडाफार,

आता सगळेच आहे घरात तर,

कामाचा पडतो एकटीवर भार,

खाण्यापिण्याच्या नवीन फर्माइशी,

सगळा वेळ जातो किचन पाशी,

बाकी वेळात करते कपडे,भांडी आणि फरशी,

पण थोडीशी चिड चिड केली की ,

वर टोमणा ऐकायला लागतो तो वेगळाच,

जगावेगळं असं काय करते.

यावर ती स्त्री उत्तर देते,

नाही करत मी काही जगावेगळं,

पण मला स्वत:साठी करावं वाटत काही तरी वेगळं,

मला नेहमीच गृहीत धरता सारे,

माझ्या मनातही आहेत काही मनोरे,

मीही एक माणूसच आहे,

माणूस म्हणून मला जगायचं आहे,

ही आर्त साद ऐका सारे,

माझ्या मनाचे फुलू द्या पिसारे.

रुपाली थोरात