भाग -4
हळू हळू सान्वी च्या ट्युशन्स वाढत होत्या.त्यासोबत तिचा कॉन्फिडन्स ही, उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये काय एक्सट्रा ऍक्टिव्हिटी चे क्लासेस घ्यायचे यासाठी तिचे पुढले प्लॅन्स ठरले होते, चित्राला तिची घरकामात तर मदत व्हायचीच पण लेक सोबत आल्यामुळे कर्ज फेडण्यात सुद्धा भरपूर मदत होत होती.सान्वी आता कमावती होती सतत व्यस्त असायची त्यामुळं तिच्याकडे आजी काय बोलते, काय वागते,त्रास देण्याचा प्रयत्न करते, ह्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. अमेयने चित्रा ला कितिही त्रास दिला तरी लेकीसोबत त्याचं नातं खूप गोड होतं, आणि त्यांची लेक हा एकच दुवा होता कि त्यांच्या नात्याचा धागा अजूनही कुचका झालेला नव्हता.
आज का कुणास ठाऊक कधीही फार वेळ झोपून न राहणारी चित्रा 8वाजले तरी उठली नव्हती एव्हाना तिचं अंगण सडा रांगोळीनी स्वच्छ झालेलं असायचं,आणि मायलेकी चहा चा आनंद लुटत असायच्या. पण आज चित्र वेगळं होतं. सान्वी न रूम मध्ये जाऊन चित्रा ला आवाज दिला, तिची उठण्याची हिम्मत च होतं नव्हती, विचारल्यावर तीन सांगितलं कि पाठीत उसन भरली असावी, आज सान्वीनच सगळी काम आटोपली आणि अर्धा दिवसाची ठरलेली काम रद्द करून ती आईला नेहमीच्या डॉक्टरांकडे घेऊन गेली, परत घरी येऊन चित्रा न आराम करायचं ठरवलं,३-४ दिवसानंतर तिला जरा आराम वाटू लागला, तीन परत काम सुरु केलं. म्हणावा तितका आराम तिला झालेला नव्हता आज ४ महिने झाले तरी थोडया थोडया दिवसानंतर तीच दुखणं डोकं वर काढायचंच.
सान्वी ची एक जवळची मैत्रीण होती रेवा तिचा नवरा मेडिकल फील्ड शी रिलॅटेड काम करायचा त्यामुळं त्याला एक वेगळी शंका आली म्हणून त्यानं डॉक्टर बदलावायचा सल्ला दिला, आणि काही टेस्ट स्वतःच करायला सांगितल्या, नव्या डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट करून घेतल्या, चित्रा ला अजूनही आराम नव्हताच, रिपोर्ट्स आल्यावर सान्वीला दवाखान्यातून कॉल आला आणि तिला बोलावण्यात आलं, डॉक्टरांचा चेहरा बघून तिला आता थोडी काळजी वाटू लागली होती आणि तिची भीती खरी ठरली, दुर्दैव असं कि आई बापाच्या लाडात वाढलेल्या लेकीला एकटीनं या सगळ्याला समोर जायचं होतं, डॉक्टर जे बोलतील ते धीराने ऐकून घ्यावं लागणार होतं, रिपोर्ट्स कळल्यावर सान्वी च्या पायाखालची जमीनच सरकली होती जणू आभाळ कोसळला होतं तिच्यावर, कुणीतरी सारखे वार करून तिचा मेंदू बधिर केल्यासारखं वाटतं होतं तिला,चित्राला थर्ड स्टेज हाडाचा कॅन्सर झालेला होता.
त्या दिवशी दुपारपासून सान्वी जी घराबाहेर पडली ती रात्री खूप उशिरापर्यंत घरी गेलीच नाही, स्वतःला सावरत मैत्रिणीच्या घरी कशी पोहचली ते फक्त तिचं तिलाच ठाऊक, शरीराच्या वेगवेगळ्या आवयवांवर घाव होऊन त्राण जावा इतक्या वेदना ती सहन करत होती, शुद्ध हरपलेली सान्वी, तिचं जग च क्षणात उध्वस्त झालं होतं, बर जे सत्य तिला पाचवायला कठीण ते चित्रा ला कसं सांगायचं हा प्रश्न होताच तिच्यासमोर, खूप वेळ सान्वी घरी न परातल्यामुळं चित्रा ला आता काळजी वाटू लागली, म्हणून तिनं कॉल करायचं ठरवलं तर तितक्यात तिची लेक दारात उभी होती, तिचा चेहरा बघूनच चित्रा ला कल्पना आली कि सगळं काही ठीक नाहीये सान्वी नं किती ही लपवण्याचा प्रयत्न करायचं ठरवलं,तरी ते शक्य नव्हतं कारण चित्रा ची ट्रीटमेंट लगेच सुरु करायची होती, किमोथेरपी सुरु होणार होत्या, म्हणून शक्य तितक्या कमी वेळात चित्रा ला सगळं सांगणं गरजेचं होतं, इतक्या सगळ्या विचारांनी सान्वी चं डोकं चक्रावलं होतं, तिनं अमेयला घरी बोलावून घेतलं आणि आई बाबा दोघांनाही सगळं शांतपणे समजावून सांगितलं.
चित्रा कुठेही पॅनिक झाली नाही उलट तिनं शांतपणे सान्वी व अमेय दोघांना समजावलं, आयुष्यात आजवर इतके कष्ट घेतले, अडचणीतून मार्ग काढले, तुझ्या आजीचे शिव्या शाप ऐकले, चोरीचे आळ सहन केले जेव्हा त्या सगळ्या परिस्थितीत माझं हरणं अपेक्षित होतं तेव्हाच मी जिद्दीने जगायला शिकले मग हा तर साधा आजार आहे, आपण तिघही याला सहज सामोरे जाऊ, मला काहीही होणार नाही,हा विश्वास तिनं अमेय आणि सान्वी दोघांच्याही मनात रुजवला, त्या रात्री मात्र घराचे तिनं कोपरे वेगवेगळ्या दिशेने अश्रूनीं चिंब झाले होते. अमेय नं आई वडिलांच ऐकून चित्रा ला कितीही त्रास दिला असला तरी तिच्याशिवाय त्याचं अस्तित्वाला पूर्णतः नाही ते तो जाणून होता, सान्वी बिचारी आईला काही झालं तर... डोळ्यातले अश्रु थांबत नव्हते, मनातल्या भीतीच्या वादळाला अंत नव्हता, आणि आईशिवाय आयुष्य नकोच होतं, आईची कुशी सोबत नसणार हा विचारही भयानक होता, आई घरात नसली कि फक्त घराच घरपण हरवणार नसतं तर तिच्या लेकराचं आयुष्य होरपळून निघणारं असतं... सान्वी शून्यात अस्तित्व शोधत होती आणि त्यात तिला आईसाठी खंबीर व्हायचं होतं. चित्रा ला मृत्यू समोर दिसत होता आणि तिचा छोटासा संसार ही, फक्त रिपोर्ट्स मुळे अमेय नी सान्वी वर काय परिस्थिती ओढवली आहे, जर मी नसेन तर यांचं काय होईल याची कल्पना ही ती करू शकत नव्हती, तिनं च त्या दोघांना हिम्मत दिली होती म्हणून तिला त्यांच्यासमोर रडता ही येणार नव्हतं तिची उशी मात्र चिंब भिजली होती, ती रात्र अशीच अश्रूनीं वाहत राहिली, कुणाच्याही पोटात अन्नाचा कण नव्हता कारण विचारांच्या वनव्याने डोक्यात इतके काहूर माजले होते कि पोटातल्या अग्नीला शांत करण्याची गरज च ते घर त्या रात्री विसरून गेलं होतं.
दुसऱ्या दिवशी तिघांनीही प्रसन्न सकाळ अनुभवली अर्थात ते सान्वी मुळंच कारण आईची ट्रीटमेंट साठी आर्थिक मानसिक शारीरिक सोबत ईश्वरी सोबतीची सबळता ही लागणार हे ती जाणून होती म्हणून तिनं पारायण सुरु केले, तिघांनाही त्यामुळं बळ मिळत होतं, घराबाहेर पाय ठेवतांना तिघेही बिथरलेले होते तरीही एकमेकांसाठी हिम्मत तुटू द्यायची नाही ह्याच विचारानं तिघे दवाखान्यासाठी निघाले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा