Login

जगण्याचा मंत्र

ही एक छोटीशी कविता आहे
*जगण्याचा मंत्र*
कवि तर नाही मी, पण कविता करत राहते..
जेजे दिसतंय समोर, ते कागदावर उतरवत राहते..
मनावर होंतात आघात, तेही त्यालाच सांगत राहते..
ज्या पण होतात छान छान गमती, त्या पण त्यालाच सांगत राहते..
येतात जेव्हा अडचणी ते गाऱ्हाणं पण तिथेच मांडते
सोबत असतो पेन माझा, तोच माझा सोबती..
शेवटी काय आलोत एकटे जाणार एकटे..
कोणाला कोणाची असते का काही काळजी?
जेव्हा आवाज उठवता येत नाही, तेव्हा कलमच साथ देते..
जे तोंडाने नाही सांगू शकत ते तिथूनच साधून येते.
आज मिळाली संधी मला..
कागदावरील प्रत्यक्ष मांडायची..
जीवनाचा एक गुरुमंत्र तुम्हाला सांगायची..
कधीच मनात झुरु नका.. जे आहे मनात ते कागदावर उतरवत चला..
मनातली मळभ त्या कागदाला सांगत चला ..
मग येणार नाही नैराश्य कधी.. मार्गही त्यातूनच शोधत चला..
मन मोकळं झालं ना, की मार्ग ही गवसत जातो..
बरका माझ्या दोस्तांनो सुखी जगण्याचा हा पण एक मंत्र असतो..
हा पण एक मंत्र असतो..
©पूनम पिंगळे