नंदिनीने कार पार्क केली आणि कारचा दरवाजा उघडला तेव्हा मागच्या सीटवरून अद्वैत खाली उतरला.
"नंदिनी डिस्चार्ज मिळाला का अद्वैतला?"
"हो साने काकू डिस्चार्ज मिळाला.", अद्वैत आणि नंदिनी कारमधून उतरून लिफ्टची वाट पाहंत उभे असतात इतक्यात त्यांच्याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या साने काकू नंदिनीला प्रश्न विचारतात तसे नंदिनी त्यांना उत्तर देते.
"बरं झालं बाई. अद्वैत आता आराम कर जरा. काळजी घे गं नंदिनी त्याची. मी येते. ", नंदिनीला अद्वैतची काळजी घ्यायला सांगून साने काकू मार्केटमध्ये जाण्यासाठी निघतात.
"नंदिनी तु साने काकूंना कशाला सांगितले? "
"अद्वैत अरे तुला माहित नसेल त्या दिवशी साने काका आणि काकूंनीचं तर मला धीर दिला म्हणून मी तुला हॉस्पिटलमध्ये नेऊ शकले आणि चिन्मय ही त्यांच्याकडे होता दिवसभर. त्या दोघांनी चिन्मयला सांभाळले. ते आपले शेजारी आहेत, समोर तर राहतात त्यांना सांगितले तर कुठे बिघडले ", अद्वैतच्या प्रश्नांना नंदिनी उत्तर देते.
" फाईन बट अजून कोणाला सांगितले नाहीस ना? हे लोक उगीचचं काही कारण नसताना काळजी दाखवतात आणि काळजी घ्या असे फुकटचे सल्ले ही देतात. कमॉन मी कायं लहान आहे का? मल्टीनॅशनल कंपनीचा एच. आर. आहे मी. ", अद्वैतचे बोलणे ऐकून नंदिनी चेहर्यावर आठ्या आणते आणि काहीचं न बोलता लिफ्टमध्ये शिरते.
पाचव्या मजल्यावर त्यांची लिफ्ट थांबते. अद्वैत आणि नंदिनी बाहेर येतात इतक्यात अद्वैतला दारात त्याचे आई आणि वडील उभे दिसतात. अद्वैतची आई त्याच्यावरून तुकडा ओवाळून टाकते.
दोघेही घरात येतात तशी अद्वैतची आई त्याची दृष्ट काढते आणि पदराने डोळे पुसते.
दोघेही घरात येतात तशी अद्वैतची आई त्याची दृष्ट काढते आणि पदराने डोळे पुसते.
"हे कायं आई? तु ना आता उगाचंच रडू वगैरे नको. काहीही झालेलं नाही मला मी ठीक आहे.", अद्वैत त्याच्या आईला समजावतो तेव्हा नंदिनी तिथून निघून जाते.
"आई चिन्मय कुठे आहे?"
"अरे तो तुमची वाट पाहून झोपला आहे आत्ताचं आणि सुमन पुरे करं आता तु सुद्धा रडणं. तो आत्ताच हॉस्पिटलमधून आला आहे. थोड्यावेळ आराम करू दे त्याला आपण रात्री बोलूयात.", अद्वैत बाबांचे बोलणे ऐकून आतमध्ये जातो आराम करण्यासाठी.
संध्याकाळी अद्वैतचे बाबा चहा घेण्यासाठी बाहेर हॉलमध्ये येतचं असतात तेवढ्यात त्यांना नंदिनीचा थोडासा चिडलेला आवाज कानांवर पडतो म्हणून ते थोडे पुढे येऊन नेमके काय घडतेय ते पाहण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना हॉलमध्ये सोफ्यावर अद्वैत लॅपटॉप घेऊन बसलेला दिसतो आणि नंदिनी त्याच्या बाजूला बसलेली असते.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा