" नंदिनी तु उगीचचं आईसारखं इमोशनल वगैरे नको होऊ. एवढं काळजी करण्याइतकं काहीचं नाही आहे."
"अद्वैत मी उगीचचं काळजी करतेय असं म्हणायचं का तुला? "
"हो.", नंदिनीच्या प्रश्नावर अगदी मोजकेचं उत्तर देऊन अद्वैत पुन्हा लॅपटॉपमध्ये डोके खुपसतो तशी नंदिनी त्याचा लॅपटॉप बंद करते.
" नंदिनी तु मुर्ख आहेस का जरा? लहान मुलींसारखी कायं वागतेयं तु?", अद्वैत नंदिनीवर ओरडतो.
" अद्वैत मी लहान मुलींसारखी वागतेयं आत्ता की तु? अरे नवरा आहेस तु माझा, मला तुझी काळजी वाटणार नाही का? हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन अजून काही तास सुद्धा झाले नाहीत आणि तु लगेचचं लॅपटॉप हातात घेऊन बसला आहेस. अरे डॉक्टरांनी तुला पुढचे दोन दिवस तरी पूर्ण आराम करायला सांगितला आहे. तुला माईल्ड हार्ट अटॅक येऊन गेला होता दोन दिवसांपूर्वी कळतंय का?
अरे जरा आमचा तरी विचार करं. तुला काही झाले म्हणजे कायं करायचे मी आणि चिन्मयने? किमान आतातरी ऐकं जरा माझं. ", नंदिनी अगदी पोटतिडकीने अद्वैतला समजावते.
अरे जरा आमचा तरी विचार करं. तुला काही झाले म्हणजे कायं करायचे मी आणि चिन्मयने? किमान आतातरी ऐकं जरा माझं. ", नंदिनी अगदी पोटतिडकीने अद्वैतला समजावते.
" नंदिनी मी लहान नाही आहे आणि तु चिन्मयची आई आहेस पण माझी आई होऊ नकोस उगीचचं आत्ता. हे बघं मला तुमची काळजी आहे आणि मी हे सगळं तुमच्यासाठीचं करतोय. मला काम करू दे. "
" अद्वैत अरे काम जीवापेक्षा महत्त्वाचे आहे का? आमच्यासाठी तु महत्त्वाचा आहेस अद्वैत."
"नंदिनी उगाचचं इमोशनल होऊन बावळटसारखं काहीही बोलू नकोस. मी फक्त काही मेल्स चेक करतोयं फक्त, एवढं काही होतं नाही. तुला ही माहित आहे मी सध्या एका महत्त्वाच्या प्रॉजेक्टचा चार्ज घेतला आहे आणि या हॉस्पिटलमुळे अगोदरचं तीन दिवस गेले आहेत माझे. हे प्रोजेक्ट यशस्वी झालं तर आपला निम्म लोन सहज भरता येईल तुला सगळे माहित आहे ना, मगं मला काम करू दे. ", अद्वैत नंदिनीवर ओरडतचं पुन्हा त्याचे काम करायला लागतो.
अद्वैत मला सगळे माहित आहे पण आत्ताच्या क्षणी मला तुझी तब्येत महत्त्वाची आहे हे इतकचं कळतंय मला.", नंदिनी अद्वैत जवळ जाऊन त्याला पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करते.
"नंदिनी मला डिस्टर्ब नको करू. तुला सांगितलं ना एकदाsss", अद्वैत नंदिनीला पुढे काही बोलणार इतक्यात त्याला बाबा हॉलमध्ये आलेले दिसतात तसा तो शांत बसतो. नंदिनी डोळयात आलेले पाणी पुसते.
"अद्वैत तु आजचं हॉस्पिटलमधून आला आला आहेस आणि एवढा रागराग तुझ्या तब्येतीसाठी ठीक नाही.", बाबा डोळ्यांनीच नंदिनीला आश्वस्त करतात ती किचनमध्ये चहा करण्यासाठी जाते.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा