Login

जगूनी घे जरा : भाग ३

आयुष्याचा नवा अर्थ सांगणारी गोष्ट!
"बाबाss", अद्वैत काम करतचं कॉफी घेत असतो इतक्यात त्याचा मुलगा चिन्मय मांडीवर येऊन बसतो.

"चिनू बाबा काम करतोय ना एक पंधरा मिनिटे थांब मगं आपण बोलू.", अद्वैतच्या बोलण्याने आतमध्ये जाऊन चिन्मय त्याच्या आजोबांच्या मांडीवर बसतो.

"अगं नंदिनी तु तरी सांगायचं ना अद्वैतला थोडा आराम करं म्हणून?"

"आई मी सांगितले नसेल असे वाटते का तुम्हाला? तो ऐकतचं नाही.
गेले सहा महिने तो चिन्मयशी किंवा माझ्याशी बसून निवांत बोलला आहे का ते विचारा त्याला? मध्ये बाबा आले होते त्यांनी पाहिले आहे सगळे, तुम्ही त्यांनाच विचारा. ", नंदिनी तिच्या सासूबाईंना उत्तर देऊन किचनमध्ये निघून जाते.

"अद्वैत मी आणि चिन्मय इथे शेजारी गार्डनमध्ये चाललो आहोत, तु येतोस का नाही म्हणजे तेवढाचं चेंज तुला. ", अद्वैत नुकतेचं काम संपवून मोबाईल घेऊन बसलेला असतो त्याचवेळी बाबा त्याला सहज विचारतात.

" हो चालेल ना बाबा असेही ते हॉस्पिटल वगेरै मला कंटाळा आलाचं आहे जरा. मी आलो चेंज करून. ", अद्वैत बेडरूममध्ये जाऊन कपडे वगैरे बदलतो आणि चिन्मय व बाबांसोबत गार्डनमध्ये जातो.

चिन्मयला त्याचे रोजचे मित्र दिसतात तसा तो आजोबांचा हात सोडून त्यांच्याकडे धाव घेतो.

" चिनू हळू अरेss ", अद्वैत चिन्मयला पळताना पाहून ओरडतो.

" तो ऐकणार नाही आता. तु बस.", शेजारीच असलेल्या बाकावर बाबा बसतात. अद्वैत त्यांच्या शेजारी बसतो.

"अद्वैत ठीक आहेस का?"

"बाबा तुम्ही केव्हापासून आईसारखं इमोशनल व्हायला लागला. मी ठीक आहे एकदम.", अद्वैत अगदी हसतं हसतं बोलतो.

"इमोशनल होण्याचा काही प्रश्नच नाही पण मला तर तु ठीक दिसतं नाही आहेस.", बाबा ही अद्वैतच्या हसतं बोलण्याला साजेसे उत्तर देतात.

बाबा रिपोर्ट दाखवतो तुम्हाला घरी गेल्यावर मगं चेक करून बघा. "

" मी तुझ्या तब्येतीबद्दल काही बोललोच नाही पण. कदाचित् तुला माझा प्रश्न कळला नसेल म्हणून पुन्हा विचारतो, तुझ्या आयुष्यात सर्व काही ठीक आहे ना? तु आनंदी आहेस ना?", बाबांचा प्रश्न ऐकून अद्वैत हसतो पण बाबांच्या चेहर्‍यावरचे भाव पाहून तो त्याचे हसू आवरते घेतो.

" बाबा मला माहित नाही पण तुम्हाला हा प्रश्न का पडला आहे म्हणजे ते सुद्धा आत्ता? आयुष्यात आत्ता मी सगळं काही मिळवलं आहे म्हणजे पुण्यातील ठिकाणी पर्वती पायथ्याशी असलेल्या सगळ्यात श्रीमंत सोसायटीमध्ये घर, नवीन कार, चिन्मयची नवीन शाळा. सगळे काही मिळाले आहे मी खूप आनंदी आहे. ", अद्वैत बोलताना यावेळी समोर खेळत असलेल्या चिन्मयकडे पाहतो.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all