Login

जगूनी घे जरा : भाग ४

आयुष्याचा नवा अर्थ सांगणारी गोष्ट!

" चिन्मय आणि नंदिनी आनंदी आहेत का? ",  बाबांचा हा प्रश्न ऐकून अद्वैत जरा गोंधळतो.

" बाबा आज तुम्हाला झालं तरी काय आहे? अहो चिन्मय शहरातील सगळ्यात छान शाळेत शिकतो आहे आणि नंदिनीचे म्हणाल तर तिला एवढं मोठं स्वतःचं घर, तिची कार आणि तिच्या स्वतःच्या बुटीकसाठी मी जागा ही घेतली आहे. ती आनंदीचं आहे खूप मला माहित आहे.", अद्वैत अगदी आत्मविश्वासाने बोलतो.

" ठीक आहे तु म्हणतोयस म्हणजे सगळे आनंदी असतील. ", असे म्हणून बाबा तिथून उठतात आणि चिन्मयसोबत जाऊन खेळतात थोडावेळ. अद्वैतला मात्र त्याच्या बाबांचं आजचं वागणं जरा विचित्रच वाटतं.

खेळून झाल्यावर चिन्मय आणि त्याचे बाबा अद्वैत बसला होता त्या बाकाजवळ येतात.
"चिन्मय निघायचं का आता? "

"हो निघूया पण बाबा मला आईस्क्रीमss हवं ", चिन्मय आईस्क्रीमचा हट्ट धरतो तेव्हा सुरूवातीला नको नको म्हणतं अद्वैत चिन्मयला आईस्क्रीम खायला देतो.

"अद्वैत तुला ही आवडतं ना आईस्क्रीम मगं तु सुद्धा घे.", अद्वैतचे बाबा त्यालाही आईस्क्रीम खाण्यासाठी आग्रह धरतात.

" नको बाबा अगोदरचं काम पेडिंग आहे आणि आत्ताच हॉस्पिटलमधून आलो आहे. आईस्क्रीम खाऊन उगाचचं पुन्हा सर्दी वगैरे व्हायची.", अद्वैत आईस्क्रीम खाण्यासाठी नकार देतो तेव्हा अद्वैतचे बाबा मुद्दाम त्याच्यासमोर स्वतःसाठी आईस्क्रीम घेतात. त्या दोघांना असे आईस्क्रीम खाताना पाहून चिन्मयला ही आईस्क्रीम खायचा मोह आवरत नाही.
तो स्वतः साठी सुद्धा आईस्क्रीम घेतो .

आईस्क्रीम खाऊन झाल्यावर ते तिघे चालत चालत घरी यायला निघतात.
"बाबा मला आज खूप मज्जा आली आईस्क्रीम खाताना तुझ्यासोबत. तु रोज येतं जा ना आपण अशीचं मज्जा करू.", चिन्मय अद्वैतला अगदी आनंदाने बोलतो.

चिनू अरे रोज कसे जमेल बाळा? ऑफिस असतं ना आणि रोज आईस्क्रीम खाल्लं तर तु आजारी पडशील.", अद्वैत त्याला समजावतो पण चिनूचा चेहरा मात्र उतरतो.

" चिन्मय अरे मला सांग तुला तुझं नवं घर, नवीन शाळा आवडते की नाही? तु मला अजून काही सांगितलेचं नाही त्याबद्दल.", अद्वैतला वाटतं त्याचे वडील विषय बदलायचा म्हणून चिन्मयला असे विचारतं असतील.

चिन्मय मात्र यावर फार काही बोलतं नाही.
"चिनू बाळा तुला तुझं नवीन घर आवडतं नाही का? "

" बाबा तुम्ही काहीही कायं विचारतायं? चिन्मयला त्याचं नवीन घरं आवडतं खूप कारण इथे त्याला त्याची वेगळी रूम आहे जिथे तो भरपूर खेळतो आणि अभ्यास करतो. हो ना चिनू?", अद्वैतला त्याच्या बाबांचा रागच येतो आणि तो चिन्मयला विचारतो, चिन्मय मात्र अजूनही गप्पचं असतो.

"चिनू तु तुझ्या आजोबांना नाही सांगणार का? ", अद्वैतचे बाबा मुद्दाम पुन्हा एकदा विचारतात.

" आजोबा मला नाही आवडतं हे घर आणि शाळा. "


का रे चिनू? "

" आजोबा ही नवीन शाळा आहे ना ती खूप दूर आहे घरापासून म्हणून मगं आई बाबांनी मला बस लावली आहे. जुनी शाळा घराजवळ होती तेव्हा मी रोज आई आणि बाबांसोबत जायचो कारमधून मज्जा यायची. आता आम्ही सोबत जातं नाही आणि मला हे घर नाही आवडतं कारण इथे आल्यापासून बाबा ना सतत चिडचिड करत असतो. त्याला माझ्याशी बोलायला आणि खेळायला वेळचं नसतो. ", चिन्मय अगदी निरागसपणे उत्तर देतो पण अद्वैत मात्र त्याचे बोलणे ऐकून इतका हैराण होतो की ते तिघे घरी पोहचले आहेत याचेही भान उरतं नाही त्याला.

" अद्वैत अरे कायं झालं? ", नंदिनी खांद्याला हात लावून हलवते तेव्हा अद्वैत विचारांमधून बाहेर येतो.

" नंदिनी त्याला काही नाही झालं बरं मला एक सांग तु आनंदी आहेस का बेटा?", सासर्‍यांकडून अचानक असा प्रश्न ऐकून नंदिनी देखील गोंधळते सुरूवातीला.

"बाबा तुम्ही असे का विचारतं आहातं? "

"ते कळेल मला फक्त एक सांग तु आनंदी आहेस का इथे येऊन? आणि हो खरं खरं उत्तर दे बघू. "

" बाबा पुण्यासारख्या ठिकाणी एवढं मोठं घर घ्यायचं स्वप्न बघायला ही पैसे मोजावे लागतात पण इथे आम्ही इतक्या लवकर रहायला आलो आहोत, खरं सांगायचं तर खूप आनंदी होते सुरूवातीला मी. प्रत्येक स्त्रीला शेवटी हक्काचं घर हवचं असतं ना पणsss ", नंदिनी एक श्वास घेते.

"पण कायं? ", नंदिनीचे सासरे तिला पुन्हा विचारतात.

" पण या घराची किंमत म्हणून मला माझा अद्वैत द्यावा लागेल हे माहित असतं तर मी अद्वैतला हे घर घेण्यासाठी कधीही साथ दिली नसती. ", एवढे बोलून नंदिनी एक उसासा घेते.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all