गैरसमज
भाग २
भाग २
©® सौ.हेमा पाटील.
कथेच्या मागील भागात आपण पाहिले,सप्तमीच्या तिथीला दोघांना लेकाकडे जेवायला जायचे होते, त्याविषयी गेल्यावर्षी आलेल्या अनुभवाबाबत दोघांमध्ये चर्चा सुरू होती.
"काय माहित ? गेल्या वर्षी केवढी फजिती झाली आपली ! आपण मारे सकाळपासून उपवास धरला होता. काहीही खाल्ले नव्हते. आणि तिथे गेलो तर काहीच तयारी नाही. दोन वाजेपर्यंत वाट पाहिली. शेवटी आपल्याला वाहून नेणाऱ्या कावळ्यांच्या हातापाया पडून त्यांना खिडकीपाशी जाऊन काव काव काव काव करून ओरडायला लावले. तरीही कुणीही ढुंकून बघितले नाही. उलट सुनबाई काठी घेऊन कावळ्यांना हाकलायला आली.
" काय उच्छाद मांडला आहे "असे म्हणत ! आणि तरीही आपण तेथून हलत नाही हे पाहून त्यांची मोलकरीणच म्हणाली,
" अहो ताई ,त्यांचा पंधरवडा सुरू आहे ना सध्या. त्यांच्यासाठी काहीतरी भाजी पोळीचा तुकडा टाका खिडकीत".
हे ऐकल्यावर टीव्हीवर पिक्चर बघत बसलेल्या लेकाला आठवण झाली. तो म्हणाला,
" अगं सुजा, म्हाळाचा पंधरवडा सुरू आहे का? आई बाबांचा म्हाळ सप्तमीला असतो ना"?
" अगं सुजा, म्हाळाचा पंधरवडा सुरू आहे का? आई बाबांचा म्हाळ सप्तमीला असतो ना"?
त्यावर सुनबाई गोरीमोरी झाली. लेकाने मोबाईल मध्ये कॅलेंडर उघडले. आजची तिथी बघितली आणि तो मोठ्याने ओरडलाच,
" अगं, आजच सप्तमी आहे".
हे ऐकल्यावर सून म्हणाली,
" म्हणजे ती खिडकीत येऊन बसलेली जोडी आपल्या आई-बाबांचीच होती वाटतं"!
यावर लेक म्हणाला,
" कसं असतं गं तुझं काम! तुला लक्षात ठेवता येत नाही का ? आता उपाशी गेले की नाही माझे आई बाबा"?
" हो का? तुमचे आई-बाबा होते ना! मग मी का लक्षात ठेवायची तिथी ? तुम्ही ठेवायची होती ना ? आणि मला सांगायचे होते .मी नैवेद्य बनवला असता. सगळं आपलं मीच करायचे.आणि वरुन ऐकून पण मीच घ्यायचे".
"यावर त्या दोघांचे चांगलेच भांडण जुंपले. आपण दोघेजण वाट पाहत होतो की, आता आजची तिथी समजल्यानंतर तरी निदान दहीभात तरी समोर येईल. पण कसचे काय ! त्या दोघांची भांडणे ऐकून ती काही लवकर बंद होईनात हे पाहून आपणच तेथून परतलो.दिवसभराचा उपवास होताच, परतल्यावर ही काही खायची इच्छा झाली नाही ".

"तुझीच आईची वेडी माया ! माझा आदु माझा आदु करत त्याच्याभोवती फिरायचीस.चार वर्षातच विसरला की नाही तुला तुझा आदु"?
"असे काही नाही हं ! कामाच्या व्यापात तिथी विसरला असेल.आणि आता मराठी महिने आणि तिथी कुणी रोज रोज पहाते का? त्यामुळे लक्षात आले नसेल. अजूनही किती बोलता हो माझ्या लेकाला"!
"बरं..चल आटप. आपले वाहक केव्हाचे येऊन थांबलेत. त्यांनी इथेच काव काव सुरू करावी अशी तुझी इच्छा आहे का "?
"नाही नाही.झाले.चला जाऊया".
स्थळ - आदित्यचे घर...
"हुश्श..पोचलो एकदाचे! यांच्या पाठीवर बसून येण्यापेक्षा आपण उडत उडत लवकर पोचलो असतो ना"?
"पण आज आपल्याला परवानगीच नाही ना स्वतः उडत येण्याची. हे काक आपल्यासाठी नेमले गेले आहेत".
"पण आज आपल्याला परवानगीच नाही ना स्वतः उडत येण्याची. हे काक आपल्यासाठी नेमले गेले आहेत".
"आज दाराशी बऱ्याच चपलांचे जोड दिसतायत. म्हणजे आज तिथी लक्षात आहे म्हणायची"!
"एवढे काही हिणवायला नकोय.एकच वर्ष माझा आदु विसरला होता ".
कावळ्यांना ढोणसून खिडकीपाशी आणले आणि तिथून दोघेही आत डोकावून पाहू लागले.
" अहो, तुमची बहिण बघा.. सोफ्यावर कशी फतकल घालून बसली आहे".
"आणि तुझा भाऊ तिच्या समोरच्या खुर्चीत बसलाय".
" दिसला हो! एवढे काही टोचून
बोलायची आवश्यकता नाही.माझ्यासाठी म्हणून आलाय तो".
बोलायची आवश्यकता नाही.माझ्यासाठी म्हणून आलाय तो".
"मग माझी बहिण काय श्राद्धाचे जेवायला आलीय"?
"तुम्ही सुधारणार नाही हे मलाच मेलीला समजायला हवे.अख्खे आयुष्य गेले तरी जो माणूस सुधारला नाही तो आता तरी काय सुधारणार म्हणा".असे स्वतःच्या मनाशी पुटपुटत ती म्हणाली,
"पुरणपोळीचा सुवास छान येतोय ना? तिने सुंठ पण घातलीय बरं का! मी नेहमी सांगायचे, अगं थोडी सुंठ घालावी.चवही लागते आणि पोळी बाधतही नाही.तर मला म्हणायची,
" घरात सगळ्यांचा कोठा दगड पचवण्याइतका जड आहे.कशाला हवी सुंठ ?
पण आज घातलीय हो"...
"सासुला खुश करण्यासाठी घातली असेल".असे तो म्हणताच ती म्हणाली,
" तुमच्या आवडीच्या बटाट्याच्या काचऱ्या पण केलेत तिने".
हे ऐकल्यावर तो अधिरतेने म्हणाला,
"सरक बाजूला..पाहुदेत मला".
ती मुकाट्याने बाजूला सरकून उभी राहिली.

तिचा मूड जातोय हे लक्षात आल्यावर तो म्हणाला,
" चल वर जाऊया.आदु ताट घेऊन वर निघालाय बघ".
लेकाकडे पाहून तिचे मन भरुन आले.काही न बोलता दोघेही कावळ्यांसोबत वर आले.आदु नैवेद्य दाखवून हात जोडून प्रार्थना करत होता.
" काही चुकले माकले असेल तर मान्य करुन घ्या".
आणि तो एकवार कावळ्यांकडे पाहून तेथून दूर झाला. क्रमशः
©® सौ.हेमा पाटील.
यंदा आदु काही तिथी विसरला नाही या आनंदात दोघेही नैवेद्याच्या जवळ पोहोचले. कथेत यानंतर अगदी वेगळाच कुठला ट्वीस्ट येतो ते जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा