जलपरी (सत्य कि कल्पना)

जलपरी बद्दल माहिती
जलपरी म्हटल की डोळ्यासमोर उभी रहाते एक सुंदर अशी लावण्यवती ...जीचे आर्धे शरीर हे एका सुंदर ललनेचे तर अर्धे शरीर मासाचे असते ...समुद्रतळाशी जलपरीचे अस्तित्व आहे हे आजही एक अद्भुत रहस्यच आहे....

समुद्र जितका विशाल तितकेच गहण आहे जलपरीचे रहस्य...समुद्रात वास्तवास असलेला जलपरीसारखा कोणता जीव आहे ,की ती फक्त एक कल्पना हा आजही एक आभ्यासाचाच विषय आहे.खरच जलपरी अस्तित्वात आहे का ?चला जाणुन घेऊयात....

कथा कांदब-या,कार्टुन ,काॅमेक्स व पिक्चरमध्ये आपण जलप-याबद्दल ऐकून असालच..जलपरीला इंग्रजीत "मोमेड" व हिन्दीत ,"मत्सकन्या असेही म्हणतात.
सुरवातीपासूनच जलपरी हा वैज्ञानिक व संशोधकांसाठी एक दिलचस्प विषय आहे ..

Papular कार्टुन सिरिज Arial मध्ये स्ञी व्यक्तीरेखा ही जलपरी दाखवण्यात आली होती. हि सिरीज साल १८३६ मध्ये डाॅनिश लेखक हाॅन्स क्रिटल आडल्सन ने लिहिली होती.

Marrim Webster's Collegiate Dictionary नुसार जलपरी एक रहस्यमय प्राणी आहे .ज्याच आर्धे शरिर स्ञीचे व आर्धे शरीर मासाचे असे सांगितले आहे ह्या डिशनरीत "Mel Merman "चाही उल्लेख आढळतो .ज्याचे आर्धे शरीर माणसाचे व आर्धे मासाचे असे सांगितले आहे.

इतिहासकारांच्या म्हण्यानुसार "Atarqatis"दुनियातील पहिली जलपरी होती.जिला प्राचिनकाळात पुजले जात होते.लोककथांनुसार Atarqatis एक जलपरी नसुन मनुष्यप्राणी होती.Atarqatis एक शक्तीशाली देवता होती पण ती एका सर्वसाधारण माणसाच्या प्रेमात पडली .दोघांच्या प्रेमात तो सर्वसाधारण व्यक्ती शारिरीक संबधादरम्यान तीच्या शक्तीला सहन करू शकला नाही त्यात त्याचा मृत्यु झाला .प्रियकराचा तो आघात Atarqatis सहन करू शकली नाही व तीने समुद्रात उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला .पण पाण्यात जाताच तीचे आर्धे शरीर मासाचे झाले आणि ती जलपरीच्या रूपात बदलून गेली .काही दिवसात तीने एका सुंदर जलकन्येला जन्म दिला . ती जलकन्या पुढे सिरीयर ची राणी बनली...तीचे नाव Semiramis ती सेमिरोमीस हाॅंगिग गार्डन बेबिलोनीसच्या निर्मितीस कारक आहे असे मानले जाते .आजवर असे अनेक उदाहरणे आहेत जे जलपरींचे अस्तित्व दाखवून देतात...

शोधकर्त्यांच्या मतानुसार मोसोपुतामध्ये एक जलपरी असल्याचे काही पुरावे भेटले होते जीच नाव इया होत . इयाला पाणी, आझादी,जादु व रचनेची देवी मानल जात होत .त्याबाबतीत एक कथा प्रचलित आहे.त्यात असे सांगितले आहे कि इयाने एका भयंकर प्रलयात मनुष्यजातीचे रक्षण केल होत. याचा उल्लेख " Epic of GILGAMESH" नावाच्या एका प्राचिन महाकवितेत मिळतो .

ह्याचप्रमाने जापानी लोककथांमध्ये "NINGYO" नावाच्या जलप्राण्याचा उल्लेख मिळतो.ज्याचे शरीर मासाचे ,चेहेरा माणसाचा व तोंड माकडासारख आहे .याच्यासंबधी एक मान्यता आहे की जर तुम्हाला हा मासा मिळाला व त्याचे सेवन केले तर,ते आपल्याला अमर योवनत्व व सुंदरता प्रधान करते.हे ऐकतांना आपल्याला एक काल्पनिक गोष्ट वाटते असे अद्धभुत वरदान मिळण्यासाठी कोणीही हा मासा खायला तयार असेल.

आफ्रिकेतही "MAMI-WATA"ह्या इष्टदेवीची पुजा होते .Mami -Wata चा इग्रजी अनुवाद Mommy-Water असा होतो म्हणजे "समुद्रमाता"..

आयरलाॅन्डमध्येही निळ्यारंगाच्या जलपर्यांची कथा प्रचिलित आहे. रोममध्येही Rosalka नावाच्या जलकथांचा उल्लेख प्रौराणिक कथात मिळतो.नार्वे व स्काॅटलॅन्डच्या काही भागात फिल्काॅक च्या बाबतीत काही किस्से प्रचलित आहेत .असे म्हणतात की ह्या जलप-या मानवाला आपले दास बनवत असत .

सुदर व अनोख्या रूपामध्ये असलेल्या ह्या जलपरींना आजवर कोणीच जिवंत व मृत्यु स्वरूपात पाहिलेल नाही .पण एका काल्पनिक रूपात सगळ्यांच्या मनात घर करून आहेत .याचा पुरावा आहे २०१३ मध्ये बनवल्या गेलेल्या Animal panet नुसार बनवली गेलेली डाॅक्युमेंटरी
Mermaids .The Body Found ही जवळपास ४० लाख लोकांनी बघितली.

१८४२ मध्ये अमेरिकेन शो मॅन R.T.Bratum ने माकडाच आर्ध शरिर व मासाच्या शेपटीला एकञ करून एक नकली जलपली बनवली होती .ज्याला त्याने "फेजी मरमेन"नाव दिल .त्यांनी असा दावा केला होता की ही जलपरी त्यांना फेजी आर्यलॅडजवळ मिळाली .अस सांगितल जात की कोलंबसनेही जलपरी बघितली होती पण तो नजरेचा धोका होता.वैज्ञानिकांच म्हणणं होत की ती जलपरी नसुन समुद्री जनावर होत जे जलपरीसारख दिसतं...

खरतर पृथ्वीचा ७१%भाग हा पाण्याने व्यापलेला आहे व २९ भाग जमिनीने .पण आजवर ह्या विशालकाय पाण्याखालचे जनजीवन व त्यातील जीवांच रहस्य हे कायम आहे .ते रहस्य अजुनही उलगडलेल नाही .जलपरी अस्तित्वात आहे हा पुरावा आजवर भेटलेला नाही .समुद्रात जलपरी असल्याचा पुरावा फक्त पौराणिक कथांमध्येच आजवर मिळाला आहे .जलपरी खरोखर अस्तित्वात असलेली कोणतीही घटना आजवर वैज्ञानाकांच्या नजरेस पडलेली नाही. त्यामुळे जलपरी ही पृथ्वीतलावर असल्याच सत्य नसून ती आजही एक कल्पनाच आहे.

©®वैशाली देवरे..