जाने अंजाने में भाग 1
दीर्घकथा लेखन स्पर्धा 25-26
रविवारची ती नेहमीसारखी सकाळ… पण आज या सकाळी एक वेगळंच मस्त वातावरण होतं...डिसेंबरची गुलाबी थंडी, हलकं ऊन, आणि थंड हवा..संपूर्ण दिल्ली जणू एखाद्या स्लो-मोशनमध्ये जागी होत होती...
पण सी पी नावाच्या एका फेमस जागेवर एक मुलगी, ऊन खात शांतपणे बसली होती...कानात हेडफोन घातला होता... आणि आनंदाने आपली लावलेली गाणी, ऐकत बसली होती...20-22 वर्षाची तर ती साधारण वाटत होती...
" एक्सक्यूझ मी, व्हॉटस दिज नॉन्सेन्स... " जगाची पर्वा सध्या करत नसलेली ती, अचानक ओरडते... तोच समोर एक मुलगा, जो साधारण 22-24 वर्षाचा असेल अंदाजाने, आपल्या गळ्यात लग्नाचा हार घातलेला तिच्यापुढे उभा होता.. जो तिलाच एकटक पाहत होता...
" हा मम्मी, काळजी करू नको, तुझ्या साठी मी सून शोधली आहे आणि तिच्याबरोबरच जस्ट मी लग्न ही केल आहे... " तो मात्र तिच्या रिऍक्शन ला जास्त भाव नाही देत... फक्त डोळ्यांनीच खुणावतो, एक मिनिट हा म्हणून आणि परत आपला फोन वर बोलायला लागतो...
" ओय, हे काय चाललेय आहे... " पण त्याच बोलणे फोनवरच ऐकून, तिचा मात्र रागाचा पारा हाय होतो आणि ती आपल्या गळ्यात जस्ट त्याने टाकलेला तो हार फेकत म्हणते..
" एक एक मिनिट हा मम्मी... " तो तिचा असा राग पाहून, मोबाईल वर समोरच्या व्यक्तीला म्हणतो, " हॊ तू तयारी करून ठेव... येतोच मी तुझ्या सुनेला घेऊन.. " असं परत मोबाईल वर म्हणतं त्या मुलीला डोळा मारतो...
" काय, काय चालले आहे..?? आणि कोण सून..?? कुणाची मम्मी...?? " पण त्याच्या बोलण्याने आणि या कृतीने तर ती जाम भडकते... आणि सरळ त्याचा मोबाईल हिसकावून घेत दुसऱ्या हाताने त्याची कॉलर पकडत बोलते... डोळ्यात सध्या राग आणि राग च दिसत होता...आग आणि धूर कशाला म्हणायचं ते तिच्याकडे आता पाहीले असते तर सहज कळाले असते...
" माझी मॉम आणि तू तिची सून बेबी.. " तो मात्र कूल अंदाजात बोलतो...
" बेबी...?? कोण बेबी..?? " पण ती अजून ही रागात बोलते, " आणि मी का होईल तुझ्या आई ची सून...?? रादर मी तर तुला ओळखत ही नाही... " ती त्वेषाने बोलते...
" परत परत का बोलत आहेस, बेब..?? अर्थात तूच बेबी ना... इथे अजून कुणी आहे का तुझ्या आणि माझ्या शिवाय.. " तो अजून ही कूल होता, पण आवाज आता सिडक्टिव्ह वाटत होता...
क्रमशः
कोण आहेत हे दोघे... आणि काय असेल यांची कहाणी..?? हे जाणून घ्या ह्या कथेतून... कथेचा पाहिला भाग कसा वाटला कंमेंट करून नक्की सांगा... जाने अंजाने में, सदर कथा न्यू जेनेरशन ची आहे.. I होप तुम्हाला आवडेल...
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा